Container gardening- लेट्यूस

Submitted by अक्षता08 on 28 June, 2020 - 01:32

लेट्यूस हे जरी पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीरीसारखी रोज लागणारी गोष्ट नसली तरी सध्या ह्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. Burgers आणि salads मध्ये हे नसलं तर काहीतरी कमतरता नक्कीच जाणवते (निदान मला तरी...!). तर, हेच लेट्यूस आपण घरी देखील लावू शकतो. पुदिना, कोथिंबीर इतक लावायला सोप्पं जरी नसलं तरी अगदीच अवघडही नाही.
लेट्यूस मध्येही बरेच प्रकार आहेत. आपल्याला जो प्रकार आवडतो त्याच्या बियांपासून सुरुवात करावी. ( ह्याच्या बिया ऑनलाईन नर्सरीमध्ये मिळतात‌‌. स्थानिक नर्सरीमध्ये शक्यतो उपलब्ध नसतात). लेट्यूसची मूळं खोलवर जात नाहीत त्यामुळे उथळ आणि पसरट कुंडी ह्याला उत्तम आहे. अंतर ठेवून लेट्यूसच्या बिया लावल्यावर कुंडी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी ४ ते ५ तास प्रखर सूर्यप्रकाश ( direct sunlight) असेल. एकदा true leaves दिसले की त्यानंतर १० ते १५ दिवसांनी लेट्यूस थोडं आडोशाच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी ठेवावे जिथे लेट्यूसला प्रखर सूर्यप्रकाश लागणार नाही. लेट्यूसच्या बियांना germination साठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
लेट्यूससाठी खतं युक्त माती असणे गरजेचे आहे. { माती (६०) : खत (४०) }. दर सात दिवसांनी नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेले खत द्यावे. लेट्यूसला पाणी देताना काळजी घ्यावी लागते. पाणी जास्त झाल्यास मुळ कुजू शकतात. व कमी झाल्यास पानं मलुल पडतात. त्यामुळे अती पाणी देणे टाळलं पाहिजे परंतु मातीत नेहमी ओलावा असायला हवा. लेट्यूसची पानं आपण ३० ते ४० दिवसांमध्ये कधीही harvest करू शकतो.

थोडीशी काळजी आणि घरच्या घरी आपण लेट्यूस लावू शकतो !!

CollageMaker_20200628_103214884.jpgCollageMaker_20200628_102922870.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@Srd
मुंबईमधील दमट हवामानातपण लेट्यूस लावू शकतो

मी बर्‍याचदा विकत आणलेले लेट्युस वरची पाने हाताने खुडून घेउन त्याचा राहिलेला दांड्याचा भाग थोडा कापुन काढून पाण्यात काही दिवस घालुन ठेवते. थोडी मुळे दिसायला लागली आणि पाने फुटलेली दिसली की मातीत लावते. पण दरवेळी मातित लावल्यावर रोप सुकुन जाते. एकदाच छान पाने आली होती. पण प्रयोग करणे काही सोडले नाहीये.

काय मस्त हेल्दी दिसतंय लेट्युस. तुमची बागकामाची आवड अगदी जाणवते.>>>>+११
लेटस उन्हाळ्यात खायला छान वाटते, मी तर नुसते सुद्धा खाऊ शकते. मी ( गोल) लेटस हेड नियमित आणते.

@किशोर मुंढे, @मामी, @सावली
धन्यवाद Happy Happy

@निर्झरा
मी असं कोबी बरोबर करून बघीतल होतं. पण मातीत लावल्यावर तग नाही धरु शकल. पाण्यातून लगेच मातीत स्थलांतर होत तेव्हा रोपट्याला ते adopt करता नाही आलं तर ती सुकून जातात.

@मी_अस्मिता
धन्यवाद Happy Happy
मी सुद्धा !! (मी तर नुसते सुद्धा खाऊ शकते.)
त्या lettuce head पासून परत पान मिळू शकतात

मस्त दिसतंय.
सॅलड, बर्गरमध्ये लागतंच लागतं पण आमच्याकडे ह्याची कोशिंबीरही करतात. मस्त लागते ती ही.

@साधना
धन्यवाद Happy Happy
नक्की करुन बघा Happy

@सायो
धन्यवाद Happy
हे try करायला हवं (आमच्याकडे ह्याची कोशिंबीरही करतात. मस्त लागते ती ही.)