Indoor झाडं

Submitted by अक्षता08 on 5 July, 2020 - 01:15

Indoor आणि Outdoor झाडं ह्यांच वर्गीकरण मुख्यत्वे त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या गरजेवरून होतं. ज्या झाडांना प्रखर सूर्यप्रकाशाची (direct sunlight) गरज नाही ती झाडं आपण घरातीही लावू शकतो. जर आपण निसर्गाजवळ जाऊ शकत नाही तर किमान या काँक्रिटच्या (concrete) जंगलात आपल्या घरातला छोटासा कोपरा हिरव्या सजीवांना नक्कीच देऊ शकतो. ज्यात फायदाही आपलाच आहे. Indoor झाडं म्हणजे जी झाडं आपण घराच्या आत लावू शकतो. त्यातही खूप प्रकार आहेत (हवा शुद्ध करणारी झाडं, कीटक/ डास दूर ठेवणारी झाडं, इत्यादी). syngonium, cymbidium goeringii, eranthemum pulchellum ही झाडं काळजी घेण्यास अगदी सोप्पी आहेत. ही तिन्ही झाडं आपल्याला जास्त त्रास देत नाहीत फक्त ह्यांची काळजी घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
१) उन्हाळ्यात रोज पाणी द्यावे लागते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एक दिवस सोडून पाणी दिले तरी चालते. आपण कुंडी ( प्लास्टिक किंवा माती) कोणत्या वस्तूची वापरतो त्यावरही पाण्याची मात्रा अवलंबून असते.
२) ह्या तिन्ही झाडांना प्रखर सूर्यप्रकाशाची गरज नसली तरी indirect/medium सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे खिडकीजवळ या झाडांची वाढ चांगली होते.
३) Regular misting. म्हणजेच त्या तिन्ही झाडांना किमान ४ ते ५ दिवसांनी एकदा पाण्याचा फवारा मारावा आणि पानांवरील धूळ साफ करावी.
वरील सांगितलेल्या झाडांचे बरेच उपप्रकार आहेत. म्हणजेच ती झाडं विविध रंगातही (पानांचे रंग)उपलब्ध आहेत.
Indoor झाडांना महिन्यातून एकदा liquid fertilizer (खत) द्यावे. Liquid fertilizer घराच्या आतील झाडांसाठी जास्त सोयीस्कर असतात.

ह्या तिन्ही झाडांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पानांचे रंग अगदी सुरेख आणि रंगीबेरंगी असतात. त्यांना बघितल्यावर त्यांना आपल्या घरी न आणण अगदी अशक्य होतं.

CollageMaker_20200704_225524318.jpgCollageMaker_20200705_082303374.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आवडली माहिती .
मला थोड़ा नाद आहे पण आळशीपणा मुळे घरातली झाडं वाळून गेली. शिवाय मिस्ट स्प्रे इतके महत्त्वाचे आहे हे माहिती नव्हते. आता पुन्हा आणावे वाटतं आहे.
धन्यवाद.

मला इनडोअर झाडं खूप आवडतात. आणि माझ्या घरात हवीच अशी वाटणारी म्हणजे ‘स्विस चीज प्लांट किंवा माँन्स्टेरा डिलीसिओसा‘ आणि ‘सेलोम’. दोन्ही ट्रॉपिकल वातावरणात वाढणारी आहेत. डायरेक्ट सूर्यप्रकाश चालत नाही.

कृपया प्रत्येक प्रकारातील काही झाडांची नावेही देत चला, म्हणजे जर घ्यायची असतील तर नर्सरीमध्ये सांगता येईल. तिथल्या कामगारांना खूप माहिती असत नाही.

वाव्ह. घरातील बागकाम. द्रवखतां बद्दल थोडी माहिती द्या. नावे आणि प्रमाण. कल्याणच्या पाठारे नर्सरी मध्ये मिळतील का?

@मी_अस्मिता
धन्यवाद Happy
नक्की (आता पुन्हा आणावे वाटतं आहे.)

@सायो
व्वा ! माँन्स्टेराची पानं खुप सुरेख असतात. मलाही माँन्स्टेरा हवं आहे पण कुठे मिळत नाही आहे

@भरत.
Group audience मधुन select करायच का ?

@सुहृद
होय !! ह्यापुढे देत जाईन नावं
(कृपया प्रत्येक प्रकारातील काही झाडांची नावेही देत चला)

@किशोर मुंढे
मी seaweed liquid fertilizer(ह्याच प्रमाण बाटलीवर दिलेलं असतं )वापरते. हे नेहमी मी online मागवते. (पाठारे नर्सरीमध्ये कदाचित मिळत असाव). ह्याला पर्याय म्हणजे जीवामृत, कांद्यांच्या सालींच किंवा बटाट्याच्या सालींच पाणी.