Admiring beauties - गोकर्ण आणि गणेशवेल

Submitted by अक्षता08 on 19 July, 2020 - 01:07

आपण नर्सरीमध्ये जातो. आपल्याला सुंदर फुलझाडं दिसतात आणि आपण त्यांना घरी आणतो. त्यातली काही seasonal flowering plants असतात म्हणजेच वर्षातला काही काळच त्यांना फूलं येतात, काहींची बरीच काळजी घ्यावी लागते तर काही अचानक कोमेजून जातात. पण, काही अशीही फुलझाडं आहेत जी वर्षभर फुलतात काही काळजी न घेता. त्यातली दोन फुलझाडं म्हणजेच गोकर्ण आणि गणेश वेल.
हि दोन्ही फुलझाडं आळशी आणि beginer's साठी उत्तम आहेत. ह्या दोन्ही झाडांना कीड लागत नाही व ह्यांची निगा राखायचीसुद्धा गरज नसते. हि दोन्ही फुलझाडं वेली ह्या प्रकारात मोडत असल्याने कमी जागेसाठी उत्तम आहेत. लहान कुंडीतही ह्यांना छान बहर येतो. ह्या झाडांच्या बियांपासून आपण परत नव्याने सुरुवात करू शकतो. ह्यांची वाढही जलद आहे.

ह्या फुलझाडांचा मंत्र हाच : दररोज पाणी, प्रखर सूर्यप्रकाश आणि महिन्यातून एकदा खत.

थोडक्यात, 'सुगंध' ही बाब बाजूला सारल्यास दुसरी अशी कोणतीही गोष्ट नाही जी या दोन्ही फुलांमध्ये नाही. दोन अतिशय नाजूक सुंदर फूलं whose elegance & beauty can't be helped but adored..."

CollageMaker_20200719_010936811.jpgCollageMaker_20200719_011226397.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. फोटो सुंदर आलेत.

गोकर्ण मी कधी लावला नाही. पण गणेशवेल लावला होता. प्रचंड इन्वेजीव्ह आहे. आणि त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. कितीही काढून टाकल्या तरी कुठे न कुठे रोप येत राहतेच. शेजारीपाजारीही न देता पोचते. त्यामुळे काळजी घेऊन लावा.

कुंड्यांमध्ये अनेक वर्षं निळी आणि जांभळी गोकर्णवेल होती. खूप धुमारे आणि फुटवे फुटायचे. खाली जमिनीत लावली तर खूप पसरली. मी दोन तीन वर्षं उन्हाळ्यात पाणी देऊन जगवली. एक वर्ष नवा वॊचमन आला आणि खूप रान माजलंय म्हणून सगळीकडच्या वेली उपटून टाकल्या. त्याच्या अखत्यारीत नसूनसुद्धा. हिची मुळं तशी खोल असतात आणि तीन वर्षांत खोड मजबूत होतं. पण त्याने खुरप्याने उकरून उकरून नायनाट केला. बीमोडच झाला. आणि ही खुरपी, कुदळ, फावडे टिकाव वगैरे बागकामाची छोटी हत्यारे मीच सोसायटीच्या ताब्यात दिली होती, कुणालाही उपयोग व्हावा म्हणून. एक वॊचमन जाताना स्वतः:बरोबर घेऊन गेला म्हणून पुन्हा आणली होती. माझीच कुदळ माझ्याच पायावर!

गणेशवेलीबद्दल साधना ह्यांना अनुमोदन. मी तळजाईच्या जंगलात फिरायला जात होते तेव्हा तिथेही सगळ्याभर पसरलेली दिसायची.
गोकर्ण कुठे मिळते का बघायला पाहिजे.

Bhaari!

गणेशवेल की आकाशवेल? आम्ही लहानपणापासून तिला आकाशवेल म्हणून ओळखतोय. शाळेत असताना ती छोटी लाल फुलं खुडुन एकमेकांच्या शर्टवर त्याचा थप्पा करायचो. मस्त लाल छाप उठायचा. मग आईचा ओरडा मिळायचा, डाग लवकर जात नाही म्हणून.

@जाई., @साद, @मन्या ऽ
धन्यवाद Happy Happy

@साधना
धन्यवाद Happy Happy
सहमत! गोकर्णसुध्दा पसरते
(कितीही काढून टाकल्या तरी कुठे न कुठे रोप येत राहतेच. )

@अनया
नर्सरीमध्ये मिळण अवघड आहे. बीया मिळाल्या तरी सहज वाढते गोकर्ण

@मी चिन्मयी
अमरवेल आणि आकाशवेल सारख्या आहेत पण गणेश वेल आकाशवेल नाही.
(मस्त लाल छाप उठायचा. ) Lol मीसुद्धा केलं आहे शाळेत असताना...

@हीरा
अरेरे......
तुमच्याकडे तर अख्खा किस्सा आहे...

आमच्या कडे पांढरा गोकर्ण आहे.
नवीन नवीन रहायला आलो होतो तेंव्हा असा निळा होता... पण आईने काढुन टाकला...
मग मी कुठून तरी पांढर्‍य गोकर्‍अणाच्या बिया आणल्या आणि लावल्या.
एक लेख ' निशीगंधावर ' ? Happy

मी गणेशवेल आणुन लावला आहे...तो नुसताच वाढत सुटला आहे...१ महिना झाला जवळजवळ...त्याला कळ्या आणि फुले कधी येतील कोण जाणे.
याबाबतीत काही अनुभव आहे का कोणाचा ?

अगंबाई, परवाच गोकर्णीच्या बियांमधून फुटवा आलाय. आईकडून आणलेल्या शेंगामधील बिया असल्याने जरा जास्त आनंद झालाय मला.
एक ऐकीव गोष्ट म्हणजे गोकर्ण हळवं रोप असतं. दिशा बदलली तर वाढत नाही. माझा लेक लहान असताना मी त्याला ही गोष्ट सांगितली व "हा गोकर्णीचा एक गुण आहे" असा समारोप केला. तेव्हा तो म्हणाला की "आई, हा गुण कसा काय म्हणायचा? हा तर अवगुण आहे.. Happy

@मी_अस्मिता
धन्यवाद Happy
मलाही (गोकर्णाचा निळा जांभळा रंग फार आवडतो)

@ए_श्रद्धा
चहा पावडर खत म्हणून वापरतात झाडांच्या वाढीसाठी. गोकर्णसाठी पण वापरु शकता.

@प्राचीन
हे माहीत नव्हतं मला ....( एक ऐकीव गोष्ट म्हणजे गोकर्ण हळवं रोप असतं. दिशा बदलली तर वाढत नाही. )
हाहाहाहा Lol Lol (आई, हा गुण कसा काय म्हणायचा? हा तर अवगुण आहे.. )

@श्रवु्
मी कधी गुलाबी गोकर्ण बघितलं नाही आहे. बिया मिळायला हव्या.

@स्मिता श्रीपाद
गणेश वेलीला तशी पटकन फूलं येतात. पण कधी कधी वेल जरा वाढल्यावर फूलं येतात.

@प्रगल्भ
व्वा मस्त (पांढर्‍य गोकर्‍अणाच्या बिया आणल्या आणि लावल्या) पांढरा गोकर्ण सहसा पहायला नाही मिळत.
लवकरच लिहायचा प्रयत्न करेन Happy (एक लेख ' निशीगंधावर ' ? )

@विनिता.झक्कास
होय. खरंच फुलांचा लाल रंग मस्त दिसतो ( गणेशवेल माझी खूप आवडती Happy ती लाल भडक फुले)

@सामो
मलाही Happy (गोकर्ण फार आवडते.)

गोकर्ण आणि गणेशवेल ही दोन्ही अतिशय आवडती फुले. पुण्याच्या घरी गेली अनेक वर्षे आहेतच. पण आम्ही मागे अटलांटाला दोन्ही वेल ऑनलाईन बिया मागवून लावले होते. ही तेव्हाची फुले.

IMG_20170729_094836.jpg
*
IMG_20170810_070649.jpg
*
IMG_20170810_091601.jpg
*
IMG_20170825_073054.jpg
*
IMG_20170829_082420.jpg

ओह, काही फोटो परागने टाकले आहेत. मी स्क्रोल करत सगळ्यात शेवटी स्नेहा वाचलं.

पराग, तुमची बाग आणि फोटो पण खूप सुंदर दिसताहेत.

पराग ,
तुमचे फोटो सुंदर.
किती दिवस लागले वेलाला एवढे वाढायला. मलाही फेन्सवर लावायचाय कुठलातरी फुलांचा वेल. अतिशय गरम (Texas) वातावरणात टिकेल का ?
स्नेहा , सुंदर फोटोज.

छान फोटो आहेत पराग.
धन्यवाद, मीरा, वावे आणि अस्मिता.
अक्षता, तुमचे सगळेच लेख सुंदर आहेत !!

अस्मिता, गणेशवेल, गोकर्ण, कोणताही लावा. मीपण टेक्सास मधेच आहे.

गॅलरीत जांभळ्या गोकर्णाच्या दोन वेली छान वाढतायत.

पण कीड लागत नाही असं नाही हो... इथे एक अळी दिसते, नुसतं पाहिल्यावर अळी आहे हे कळतही नाही. आकार, लांबी अगदी वेलीच्या पानाच्या देठाइतकी.
अळीनं खाल्लेली पानं दिसली तेव्हा कळलं की अळी लागली आहे. ती शोधण्यात २-३ दिवस गेले.