काव्यलेखन

परत पाऊस येणार परत मन भिजणार

Submitted by मंदार खरे on 30 July, 2014 - 03:58

पावसाची माझी तशी जुनीच मैत्री
म्हणुनच बहुदा आधी रुसतो
आणि मग मनसोक्त बरसतो
अगदी खर्‍या मैत्री सारखा

तो आला की कसे अगदी
आपल्यालाही भरुन येते
मनातल्या गोष्टी सांगायला
अधीर असते तसे

मग आपसुक आठवण
पहिल्या प्रेमाची येणार
मन थोडं गलबलणार
परत भानावर येणार

आपल्यासाठीच शांत असल्यासारखी
रात्र पण त्याचीच साथ देणार
तो बरसुन जाणार
आपण मात्र तसेच जागे रात्रभर

परत पाऊस येणार परत मन भिजणार
कोरड्या आठवणी ओल्या होणार
आपल्यालाही मनसोक्त भिजायचच असत
पहिल्या पावसात भिजतो तस परत परत

जया एम च्या कवीता....

Submitted by कोकण्या on 29 July, 2014 - 14:35

जया एम..

फार पुर्वी म्हंजे ३/४ वर्शा पुर्वी हीच्या कवीता वाचल्या होत्या.. सुंदर शब्दाची मांडनी.. आशयाने परी पुर्ण अशा ह्या कवीता.. शब्दरचना एवढी मस्त आहे की पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते..भुरळ पाडते....

का कोणास ठावुक पन अचानक मार्च २०११ नंतर कुठलही साहित्य नाही.. कोनालाही उत्तर नाहि.. सगळच शांत....

काही दिवसापुर्वी एक कवीता वाचताना आठ्वन आली.. म्हनुन हीच्या कवीता शोधायच प्रयत्न केला.. पण काही ठाव ठिकाना लागेना. रोज नवीन प्रकारे सर्च, रोज नवीन सर्च की.. बर्‍याच जनाना संपर्कातसुन विचारना केली पण हाती शुन्य.... पुर्ण पणे विस्म्रुतित गेल्या होत्या ह्या कवीता ..

शब्दखुणा: 

" वडीलांस पत्र ..........."

Submitted by विनित राजाराम ध... on 29 July, 2014 - 10:17

प्रिय " बाबा " यांस ,

आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,

देहाधारी जीवा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 July, 2014 - 04:19

देहाधारी जीवा
देहाचीच ओढ
आसक्तीच गोड
सर्वव्यापी |
स्वयंभू खुंटाची
मुळे पाताळात
व्यर्थ यातायात
खेचण्याची |
अस्तित्वाच्या गळी
जाणिवेची दोरी
देखणी सोयरी
गाठ घट्ट |
पानोपानी गर्द
दाटले जीवन
तरी देठाधीन
सळसळ |
जैसे आहे तैसे
पाहतो डोळ्याने
वाहते जगणे
पाण्यावरी |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वाट बघतो श्रावणाची

Submitted by निशिकांत on 29 July, 2014 - 04:06

ओढ स्वप्ने पाहण्याची
वाट बघतो श्रावणाची

दूर चाहुल पैंजणाची
चलबिचल होते मनाची

तू न येणे एक नांदी
अंतरी कोलाहलाची

लाघवी पाहून हसणे
याद येते निर्झराची

आठवांनीही गवसते
रात्र प्रणयी चांदण्याची

लाट हो येण्याअधी तू
मी कहाणी वादळाची

मी तुझ्या स्वप्नात येता
भेट झाली काजळाची

मी जरी हळवा तुझ्याशी
जात माझी कातळाची

तुजमुळे "निशिकांत" लिहितो
शायरी हिंदोळण्याची

गती-ओढ

Submitted by अमेय२८०८०७ on 29 July, 2014 - 01:11

(सुनीत : मंदारमाला)

वेडा प्रवासी पुढे चाललेला दिसू लागती अंतराचे दिवे
आयुष्य जाळीत फोफावलेल्या तहानेतला जीव थोडा निवे
रक्तातला ताण दुर्दम्य आशा प्रयत्नांस घेऊन भाळी-शिरी
मांडून कोडे सुखाचे निघाला दिगंतातले लांघण्याला गिरी

कोठून आरंभ झाला दिशेला स्वत:शी हिशेबामधे गुंगला
स्वप्नांस कैसे नवे पंख आले पिढीजात साचा जुना भंगला
सातत्य चालीत ओठांत गाणे मुळे राहती लांब मागे कुठे
स्वातंत्र्य पाशाविना भोगताना उराशी जरासे निनावी तुटे

आता दिसे तेच गंतव्य की हा विसाव्यातला एक थांबा असे
पायांस बोचे गती-ओढ त्याच्या शरीरात ग्लानी श्रमाची वसे
श्वासांस देऊन ताजी उभारी विझू पाहता ध्यास जेव्हा जळे

जीवन

Submitted by पुरंदरे शशांक on 28 July, 2014 - 23:14

जीवन

ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात

नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात

येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास

रुळतात अंतरेही शब्दांमुळे कदाचित

Submitted by जयदीप. on 28 July, 2014 - 07:48

माझा अखेरचाही घेऊन श्वास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

उघडून पिंजर्याला घेणार मी भरारी
वाटे मला पुरेसा कायेत वास झाला

प्रतिबिंब वेगळेसे प्रत्येक आरशाशी
समजायला मला मी भलताच त्रास झाला

रूळतात अंतरेही शब्दांमुळे कदाचित
हळुवार अंतराचा आहे समास झाला

चाहूल पावलांची आली तुझ्या नव्याने
आलीस तू परत की नुसताच भास झाला

जयदीप

(एक जुनीच तरही होती, ती परत लिहिण्याचा प्रयत्न)

त्यात मतल्यात वास आणि प्रवास आले होते

मढे मोजण्याला

Submitted by अभय आर्वीकर on 27 July, 2014 - 18:45

मढे मोजण्याला

लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला

नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला

जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला

तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला

करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला

इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला

                        - गंगाधर मुटे "अभय"
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

फेसबुकवरील प्रेम

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 July, 2014 - 13:13

आजकाल माझे इंटरनेट
फक्त फेसबुक झाले आहे
आणि सारे फेसबुक
तुझ्याभोवती एकवटले आहे
लॉग ऑन केल्यावर
सर्वात आधी तुझा फोटो
त्या बाजूची हिरवी टिकली
दिसताच जीव हरखून जातो
तू हाय केलेला पहिला दिवस
तारीख वेळ ही याद आहे
स्माईली सकट तुझे सारे
उद्गार मला पाठ आहे ..

कधी कधी दिवसभर
खूप वेळा लॉगऑन करूनही
तू येवून गेल्याची
एकही खूण दिसत नाही
तुझ्या चॅट बॉक्स वर
मग ठेवतो काही लिहून
पुन्हा येतो पुन्हा पाहतो
अरे अजुनीही नॉट सिन
हिरमुसने तेव्हा मग
माझे सारे अस्तित्व होते
अन तो दिवस ती रात्र
माझे सदैव बिनसत राहते ...

तुझ्याशी मारलेल्या गप्पा

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन