जीवन

Submitted by पुरंदरे शशांक on 28 July, 2014 - 23:14

जीवन

ओसाड रान हे खुपते रुपते आत
भणभणतो वारा उगाच वेडा त्यात

नि:सार वाटते शुष्क शुष्क गवतात
तुटलेले जीवन व्यर्थ खुणावित जात

येताच सरी त्या माळ होत सुस्नात
सळसळते जीवन एकजीवसे संथ

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच शशांकजी. पूर्वी शाळेत वापरायच्या पट्टीवर एक चित्र असायचं. पट्टी हलवली की बदलून खालचं दुसरं चित्र दिसू लागायचं, तसा हळूवार चित्रबदलाचा आनंद दिला या कवितेने. खास.

क्या बात है शशांक जी... खुपच छान.

ही रानफुले इवलीशी गिरक्या घेत
वार्‍यावरी गाणे गाती मस्त मजेत
हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास++++ १००%
अमेय उत्तम प्रतिसाद.. Happy

very nice ..cool

मस्त !

हा निसर्ग वेडा खुळावितो जीवास
जगण्याचे देतो कारण खासेखास;...ऋतूलुब्ध मनांसाठी ...
छान कविता.