"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. २

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 07:45

स्पर्धेचे नियम :

१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.

२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.

३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.

४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

५. विडंबन करताना शक्यतो वृत्त्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!

६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.

८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.

९. एका आयडी तर्फे एकूण फक्त चारच एन्ट्री स्वीकारली जातील.

१०. विडंबन या अगोदर मायबोलीवर प्रकाशित झालेले नसावे.

११. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.

--------------------------------------------------------------------------------------
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :

१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.

२. तसेच इमेल पाठवताना Vidamban spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)

३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

४. प्रत्येक प्रवेशिकेला स्पर्धेसाठी क्रमांक (ID) देऊन ती प्रवेशिका संयोजकांतर्फे ह्या बातमी फलकावर प्रकाशित केली जाईल, तसेच स्पर्धकाला प्रवेशिका मिळाल्याची पोच इ-मेल द्वारे पाठवली जाईल.

५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.

--------------------------------------------------------------------------------------

मायबोलीकरांकडून आलेल्या सुचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणर्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

--------------------------------------------------------------------------------------

दुसरी कविता :

कविता - कवी झाड - मुक्तछंद

सुचूनही न लिहीलेल्या कविता
दाटूनही न बरसलेला पाऊस
उमलूनही न फुललेल्या कळ्या
या सा-यांचं आयुष्याच्या शेवटी
जेव्हा धुकं होईल,
तेव्हा तुझ्या चांदण बिलोरी हसण्याचं
सोनसळी ऊन पडेल आणि त्या धुक्यातही
मी पाहू शकेन थेट तुझ्या डोळ्यांत
मला कधीच न सुचलेल्या माझ्याच
कविता....

रचनेबद्द्ल:

कधीतरी अचानक उगवणारे पण आले की कायमच काहितरी नविन टवटवित घेऊन येणारे झाड ह्यांची ही मुक्तछंदातली कविता.
मुक्तछंद असल्याने वॄत्तांपासून मुक्त झालेत विडंबनकार. पण कविता नीट वाचली तर लक्षात येईल की त्यातही एक लय आहेच !
ती लय पकडा आणि लागा कामाला !

------------------------------------------------------------------------------------

आत्तापर्यंत आलेल्या प्रवेशिका :

१. फराळी कचोरी
२. यमकाचं गमक
३. असाध्य
४. हिशेब
५. ओझ्याचा बैल
६. बिलंदर
७. कार्टा
८. जॅकपॉट
९. माझी स्लीम झबी
१०. रहस्य
११. प्रतिभा

Group content visibility: 
Public - accessible to all site users