विस्कळीत पलटे

Submitted by kaustubh004 on 7 June, 2009 - 06:26

... मग पुन्हा एकदा चढलो
बकरीच्या गळ्यावर
पण परत कड्यावरून डोकवणारे झाड़ दिसले ...

मग पुन्हा चपापलो.

मग पुन्हा झाडावर चढलो
बकरी गातच होती
पाय घसरला तर कड्यावरून खाली कोसळायची असं
क्षणभर वाटून .....
पुन्हा चपापलो.

मग पुन्हा एकदा कड्याच्या कडेपर्यन्त हलकेच पाय सरकवला ....
बकरीचा गळा झाडाच्या मुळावरच होता
पण झाडाच्या नजरेतून रोखलेल्या नखाला गळ्याचा आकार आलासा वाटलं आणि ...
पुन्हा चपापलो

मग पुन्हा एकदा ...

गुलमोहर: 

वाटेला नाही गेलात तरी चालेल. आवडण्याची शक्यता कमी आहे.
शंकांना उत्तरं देणं मला अवघड होईल आणि प्रतिकूल अभिप्राय वाचणं मला अवघड जाईल.

पुन्हा एकदा एवढं अवघड काही नको!
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

समजली नाही..त्यामुळे आवडली नाही..:-(

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

रोखलेल्या नखाला गळ्याचा आकार आलासा वाटलं >>>>>
जबरदस्त! खरोखर जबरदस्त!! Happy

जबराट कविता आहे कौस्तुभ...भयंकर आवडली...

माझ्या प्रिय मायबोलीकरांनो - मनापासून धन्यवाद. कौतुकरावांनी ज्या आस्थेने विचारपूस केली त्यासाठी सुद्धा.
मला आधी भीती होती की विषय बाजूला ठेवून नुसतीच मारझोड होते की काय. पण ती भीती फोल ठरल्यामुळे बरं वाटलं. या प्रांजळ प्रतिसादांनी जरा धीर आला आणि कवितेचा अर्थ नाही तरी पार्श्वभूमी सांगावी असं वाटलं. (मर्ढेकरांना स्मरून म्हणायचं तर तळटीपांचे पैंजण घालून कवितेला सजवण्यात अर्थ नाही तरीही)
ही पार्श्वभूमी बरीच मोठी होण्याची शक्यता आहे कारण त्यात माझी कवितेविषयीची भूमिका, कवितेकडून सामान्यतः प्रचलित अपेक्षा आणि ही किंवा अशा प्रकारची कविता अनुभवण्याची एक पद्धत अशा (आणि आनुषंगिक) गोष्टी असतील.
जाता जाता एकच सांगतो - रागाधारित पलटे हे रागाचं चलन मध्यवर्ती ठेवून केलेल्या स्वररचना असतात (माझ्या समजुतीप्रमाणे - चू. भू. द्या. घ्या.) तेच प्रमुख सूर "स्थानं" बदलत राहातात - अर्थात रागाच्या नियमांनुसार. हेच नियम जर धाब्यावर बसवले गेले तर सारी व्यवस्था नको तशी विस्कळीत होईल. त्याच सुरांचा आत कुठला जीवघेणा नवीन खेळ सुरू व्हायचा.

न्यूयॉर्कच्या चकचकीत पंचतारांकित हॉटेलच्या बेलहॉपच्या परीटघडीच्या आतून ढेकणाने वाकुल्या दाखवल्या तर तुम्ही चपापाल?

पुन्हा पुन्हा डोळे चोळून बंद डोळ्यासमोर येत असलेल्या चित्र विचित्र असंबद्ध आकृत्यांमध्ये काही समान धागा जाणवला तर तुम्ही चपापाल?

असो ... लहान तोंडी बरीच मुक्ताफळं उधळली.

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

कौस्तूभ, कवितेइतकेच विवेचन पटले, आवडले.
तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील. Happy

अप्रतिम कविता!
खरंतर आधी नीटशी समजली नव्हती पण विवेचनामुळे मदत झाली.
लिहीत रहा...

आधी वाचली नव्हती. नेहमी सगळं वाचतोच असं नाही म्हणून. शैलीच अगदी वेगळी आहे. अनेक अंगांनी आपोआप विचार करायला लावणारी. म्हणजेच ज्याला त्याला आपापली अनुभूती पडताळून पहायला लावणारी. मस्त आहे. निवड समितीच्या ह्या उपक्रमाचे मनापासून आभार. Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy