सलीम... अन अनेक मित्रांसाठी...!!!

Submitted by Girish Kulkarni on 27 July, 2009 - 21:54

********************************

चुकलेल्या इतिहासाची बहकलेली साक्ष घेवून
तू वर्तमानाची जी वाताहत लावलियस
........ती जरा समजून घे मित्रा
अशान माणूसपण मिळवण्याच्या तुझ्या झुंडींच्या वल्गना
किती अक्राळ-विक्राळ आहेत
........ते जरा समजून घे मित्रा
झंझावाताचे इशारे देवून तूला पेटवणार्‍या ....
त्या तूझ्या म्होरक्या मशालींना जरा विचार......
तुरूंग बदलल्याने क्रांती होत असते का म्हणून ....!!!!!!!

*********************************

गुलमोहर: 

प्रचंड ताकदीची कविता. सुंदर !! अति सुंदर !!!! बढिया बॉस ! Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

प्रचंड ताकदीची कविता.
सहमत.

क्या बात है ! जबरदस्तच.
______________________________________________
प्रकाश

वजनदार.... आणि कुठेही ढेपाळली नाही ती!!!
विस्तारही किती मोजका!!!
खूप छान!!:स्मित:

वाह, मोजक्या शब्दात सगळं काही सांगुन गेलात, आवडली.

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!

अज्ञात्,अमोल्,प्रकाश,श्रीकांत्,विशाल अन सानीका....

मन:पूर्वक आभार!!!!

सस्नेह : गिरीश
रेहने दे आसमां इस जमीं की बात कर...
हर चीझ यहीं है तो बस यहींकी बात कर...
सब कुछ मिल जाय जिंदगीमे तो जीनेका क्या मझा...
जीनेके लिए बस इक कमीं तलाश कर.....

झंझावाताचे ईशारे देवून तूला पेटवणार्‍या ....
त्या तूझ्या म्होरक्या मशालींना जरा विचार......
तुरूंग बदलल्याने क्रांती होत असते का म्हणून ....!!!!!!!

खूपच बोलकं लिहीत तूम्ही.....काळजाला हात घालणारं लिखाण असत तूमचं......मस्त आहे...

जुलै महिन्यवर क्लिक केल्यावर.. जुन महिन्याच्याच कवित ओपन होत आहेत.. Sad असे का?

Pages