कळले नाही

Submitted by अज्ञात on 2 June, 2009 - 23:55

कोण सुचवितो कळले नाही
कोण लिहवितो कळले नाही
विस्मय हा इतुकाच
खेळणे; युगे सरूनही गळले नाही

मी न मला आठवतो किंचित
कुणी तरी पण येतो अवचित

कोण कशास्तव धुक्यात फिरतो
ओळख अजून पटली नाही,....
अखंड हा झरस्त्रोत तरीही
नाळ गोत सापडले नाही,...
झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही.......

................अज्ञात

गुलमोहर: 

झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही.......
छान आहे

सुधीर

अज्ञातांना अज्ञाताची ओढ.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

कवितेची कल्पना सुंदर..

कोण सुचवितो कळले नाही
कोण लिहवितो कळले नाही
विस्मय हा इतुकाच
खेळणे; युगे सरूनही गळले नाही

वरील कडव्यातील 'युगे सरूनही गळले नाही' चा अर्थ समजला नाही..

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

एक नंबर कविता
नितीन

वरील कडव्यातील 'युगे सरूनही गळले नाही' चा अर्थ समजला नाही. ..

हे " खेळणे; युगे सरूनही गळले नाही" असं आहे.

हा लिहिण्याचा खेळ अनेक युगे होऊन गेली तरी अजून चालूच आहे ह्याचे आश्चर्य वाटते. Happy

ओहो...सहीच आहे अर्थ!..धन्यवाद..समजावून दिल्याबद्दल..:-)

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

लिहिण्याचा खेळ अनेक युगे होऊन गेली तरी अजून चालूच आहे
म्हणजे पेनातली शाई अजुन किती बाकी आहे हे कळले नाही.

सुंदर कल्पना आणि कविताही.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

अज्ञातजी ,

खूपच सुंदर. ही कविता वाचायची राहून गेली ह्याचे वाईट वाटले. ह्या महिन्यात कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक ला येणे होईल. (आपण बहुदा नाशिकलाच असता ना?) भेट घेण्याची इच्छा आहे. कळावे.. कळवावे

वैभव,
किती आनंददायक बोललात !! मी नाशिकलाच असतो. माझा मोबाईल ९८२३० ७५५३८. तुमचा काय कर्यक्रम आहे कुठे आहे केंव्हा आहे ते जरूर कळवा मी येईन तुम्हाला घ्यायला. तसा मी पुण्याच्या बस स्टॅंडच्या( ठक्कर्स बस स्टँड) अगदी जवळ म्हणजे १० मिनिटांच्या पायी अंतरावर रहातो, व्यवसायही तिथेच आहे. भेटू या. कितीही अडचण असली तरी संकोच करू नका. Happy वाट पहातो.

...............अज्ञात

झिजून गेले खडक
तळाशी; कितीक उरले कळले नाही....... व्वाह!!

वाह !

परागकण

जून महिन्यातील सर्वोत्तम कविता म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
ती दवंडी वाचल्यावरच ही कविता वाचली. तोवर वाचली नव्हती.
कविता उत्तम आहे.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अभिनंदन. कविता खरोखर उत्तम आहे.

कविता सुरेख आहे. सर्वोत्तम कविता म्हणून घोषित झाल्यावर वाचली गेली , निवड समितीचे आभार,
आणि तुमचे अभिनंदन. Happy
धनु.

सर्वांना, सुचविणार्‍या अज्ञाताचे, मनापासून धन्यवाद. Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद मायबोली प्रमाणेच मराठी किंवा इंग्रजीत नोंदवू शकता. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

अज्ञातातर्फे परिक्षक मंडळाचे मनःपूर्वक आभार !!

.............अज्ञात

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

अभिनंदन .कविता मस्त आहे .

मन:पूर्वक अभिनंदन! कविता खरच खूप छान आहे एकदम ओघवती वाटली

अज्ञात,

खुप छान कविता!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

अलिकडे ऑफीसमध्ये माबो बंद झाल्यामुळे बर्‍याच कविता वाचायच्या राहुन जातात. त्यात असे काही मोतीही हातातुन निसटुन जातात. हार्दिक अभिनंदन!
***********************************
एक नवीन सुरुवात : http://www.maayboli.com/node/9171

कविता खरंच छान आहे. 'philos०phical thought' असणार्‍या कविता एकूणच दुर्मिळ असतात, मा.बो.वर तर फारच. त्यामुळे ही कविता उठून दिसते.
बापू करंदीकर

व्वाह अज्ञातजी, अप्रतिम !

आभिनंदन ! Happy

मस्त कविता. फार आवडली

सर्वांचे पुन्हा एकवार आभार. Happy

..........अज्ञात

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

Pages