कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:58

प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रंगढंग रोज तुझे नव-नवे बरसत होते
मत्सराचे आम्लपित्त असावे...समजत होते

का हा अचानक उलटे उसासे सोडू लागला
का त्याला रदीफ्-काफीया एव्हढेच अवगत होते?

त्याचा राग होता कशावर कोठे काही कळेना
त्याचे ताळतंत्र सुटले यावर मात्र सार्वमत होते

तो स्वताला यौवनाचा जालीम जाणकार म्हणवतो
घरच्या घरीच हाय त्याची केव्हढी फसगत होते

त्याचे विचारणे-बोलणे-लिहीणे बेलगाम इतके
साध्या सौजन्याचीही चटकन केव्हढी फारकत होते

बरे झाले त्याचा कुठेही संचार मोजकाच असतो
नाहीतर त्याचे विष सारेच पिक नासवत होते

अजूनही त्याचे बेबंद ओरबाडणे सुरुच राहाते
कसले काजळ कसल्या दिशा ती जुलूमी हुकूमत होते

एव्हढा अत्याचार झाला तरी तिचे तिला कळेना
रंग-गंधाचे गीत नवे हॄदयात कोण गिरवत होते ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy