काव्यलेखन

----तुला कधी कळलेच नाही..-----

Submitted by Sangeeta Kulkarni on 21 December, 2012 - 13:00

----तुला कधी कळलेच नाही..-----

मी कळीचे फुल झाले
ते तुला कळलेच नाही..
पाकळ्यांना स्पर्श करणे
तुला जमलेच नाही..
तुला पाहुन थोडे झुकावेसे वाटते पापण्यांना
गालीच्या गाली हसावे वाटते या खळीला
हे वेड तुला कसे दिसलेच नाही..
मोकळ्या केसात माझ्या
तु फुले माळू नकोस
लाज-या ह्रद्यास असा तू जाळू नकोस
मखमलीच्या वेदना सांगायला तुला धजावलेच नाही...
बोलक्या मौनामधुनी मी केले इशारे
अन् गाण्यामधुनी नवे हितगुज केले
पण अरसिका ....
तुझ्या काळजाला कसे उमगलेच नाही
मी कळीचे फुल झाले....

शब्दखुणा: 

शब्दब्रह्माचाच मी आहे पुजारी!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 December, 2012 - 06:54

गझल
शब्दब्रह्माचाच मी आहे पुजारी!
मी तुझ्या दारातला आहे भिकारी!!

जाहले पाहून जे पाहू नये ते.....
माझिया डोळ्यांसही आली शिसारी!

तो दुरावा, अन् तुझा त्यावर अबोला....
शस्त्र हे आहे तुझे अगदी दुधारी!

वाटतो, जातो तिथे, आनंद कोणी;
तर, कुणाची सावली सुद्धा विषारी!

का न व्हाव्या दंगली अन् जाळपोळी?
भाषणे असतात नेत्यांची विखारी!

केवढा गोंगाट! हे कळणार कोणा?.....
फुंकतो प्राणांतुनी कोणी तुतारी!

हात शिवशिवतात, हृदयी रक्त उसळे!
डाव खेळायास सळसळतो जुगारी!

दुर्विचारांनी न जावो जन्म वाया;
व्हायचा माणूस केव्हा सद्विचारी?

दुर्दशेला तूच तुझिया फक्त कारण;

सच्चा मित्र

Submitted by Vishal Kulkarni 005 on 21 December, 2012 - 06:51

-सच्चा मित्र...-

अजय आहे माझा मित्र
रक्ताचे नाते नसातानाही
जवळ आहे सर्वांपेक्षा जास्त..
वाचनाच्या छंदामुळे जमलेले बंधन
गेले ओलांडून पलिकडे..
मनाच्या ओल्या मातीत
आपसूकचं रुजले..
आठवणीच्या रुपात
अधिकच बहरले..
मातीत घट्ट रुजुन
इन्द्रधनुष्यासारखे आभाळापर्यंत पोहोचले...

शब्दखुणा: 

धागा काढणे, वर टिकवणे ही कला आहे

Submitted by वर्षा_म on 21 December, 2012 - 04:49

सकाळी सकाळी सरांची गझल उघडली.. म्हटले एव्हडे प्रतिसाद.. म्हणजे छानच असेल... तर अरे देवा....... Uhoh

http://www.maayboli.com/node/39853

==========================================
धागा काढणे, वर टिकवणे ही कला आहे!
ही हवीशी वाटणारी शृंखला आहे!!

ते कुठे वृत्त? मतला कोठे?
आज माबोच्या मानगुटीला गझला आहे?

का न व्हाव्या चित्रदर्शी माझिया गझला?
ही न नुसती लेखणी, हा कुंचला आहे! >>> नो चेंज.. गझल स्मायलींनी चित्रदर्शी केली आहे Proud

घडी पानाची विस्कटली, ना नयन शांती.....
आयडी माझाच फक्त चांगला आहे!

कोणताही खेळ खेळी मायबोली आता.....
सगळ्यांना छळण्याचाच झाला फैसला आहे!

हिशोब

Submitted by आर.ए.के. on 21 December, 2012 - 03:26

आज मला एक हिशोब करायचाय,
बर्‍याच जणांचे देणे चुकते करावे लागणार असं वाटतयं!
होकाराची वाट पाहणार्‍या तुझ्या भोळ्या ह्रदयाचे,
पाठलागाने दमलेल्या तुझ्या राकट पावलांचे,
वाट पाहून दमलेल्या गहिर्‍या तुझ्या डोळ्यांचे,
शंकेच्या काहूरात अडकलेल्या तुझ्या अलवार मनाचे,
तुझ्या सोबत अडकलेल्या, तिष्ठलेल्या वाटेचे,
श्वासांसोबत तुझ्या, थबकलेल्या वार्‍याचे,
होकाराने माझ्या, तुझ्या ओलावलेल्या पापण्यांचे,
आनंदाने ओथंबून, थरथरणार्‍या त्या ओठांचे
तुझ्यासोबत आनंदाने खुलणार्‍या त्या सांजेचे,
अन स्वप्नांची उधळण करणार्‍या, कृष्णवर्णी रात्रीचे!
तूचं सांग आता हे देणं कधी फिटेल का?

देव कोण ते माणूस तू, मी

Submitted by जयदीप. on 21 December, 2012 - 00:08

कुणा न कळते
कोण दिशेने
पाखरे ही जाती

कोलाहल ते
कोण करविती
नुरेच काही हाती

फोल कधी ते
विषय संपती
कधी संपती नाती

देव कोण ते
माणूस तू, मी
असे शेवटी माती

राजधानी

Submitted by pradyumnasantu on 20 December, 2012 - 23:35

राजधानी
अंगणात विखरून माझ्या मंजिरी पडावी
तयांवरी वर्षा होता तुळस अंकुरावी
अशी ती हसावी आणि तशी ती रुसावी
उन्हां पावसाची तिजला तमाही नसावी
सूर्यदेव किरणे तिजला खेळण्यास देती
थेंब थेंब वर्षा ऋतूचे स्नान घालताती
सासुरासी जावी कन्या म्हणून लग्न केले
तुळशीच्या लग्नामध्ये फटाके उडवले
रूप मनी साठवले मी हळद माखलेली
लाडाची कन्या आमची जपून राखलेली
आणि अचानक तो शत्रू चाल करून आला
डुकरांनी साधून संधी घातलाच घाला
नाजूक मम रोपावरती धसमुसले पाय
तुळस चिखल होऊन जावी हाच तुझा न्याय?

-प्रद्युम्नसंतु

शब्दखुणा: 

तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?

Submitted by सतीश देवपूरकर on 20 December, 2012 - 09:48

रसिकहो!
आमच्या ‘रानफुले’ या १९९२साली प्रकाशित झालेल्या प्रथम गझलसंग्रहातील आमची एक खूप जुनी गझल देत आहोत, जी आमच्या उमेदवारीच्या काळातील आहे. आपण समजून घ्यालच अशी आशा करतो.
..........प्रा.सतीश देवपूरकर
गझल

तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?
माझ्या नसानसा का झंकारल्या अचानक?

येऊन ठेपलेला होता वसंत दारी.....
स्वप्नातल्या कळ्या का कोमेजल्या अचानक?

मी हुंदक्यास माझ्या येऊ दिले न ओठी;
का पापण्या फुलांच्या पाणावल्या अचानक?

होते ब-याच वेळा त्यांना बजावले मी....
तुज पाहताच नजरा भांबावल्या अचानक!

हातात हात ज्यांच्या देऊन मी निघालो;

रान

Submitted by वैशाली अ वर्तक on 20 December, 2012 - 09:03

रान
निसर्ग किमयेने,
मेघांच्या वर्षावाने,
धरणी अंकुरली,
सृष्टी हिरवळली . ...
हिरव्या सृष्टी त
फोफावली राने,
राने तर असती,
निसर्ग संपदेची वने. ...
कधी दरी खो-यात ,

बुडूंगबुडाबुडबुडबुडबुड ढस्स्

Submitted by संदीपसमीप on 20 December, 2012 - 06:12

येनेको तो बार बार हम आते रहे है
अजून दुख्खके गाणे चार-दोन गाते रहे है
सावलीयोमे झाडोके बैठे बंदर फटीचर
मूठभरके चणे तोंडमे घाले बराबर
बाटली की आबरू आज नंगी होनी है
आन् जेबभी साली कुतीया खाली होनी है

ढेकर देकर हे कर ते कर
मारकर कोंबडीको तू पण साले मर
मरहूम की यादमे फिर उलटी उंगली कर
कोई अगर बघे तो हसके टाटा कर

आ राही है शुद्ध तो बेशक और एक मार
तेरेकु रोड पे लिटाने लाखो है तय्यार
निकाल तुझा फोन आणि बनव उसे हतियार
लाव नंबर भूतनिके और शिकव दोस्ती, दुश्मनी, प्यार

सिगरेट के धूरमे तू चार कमळ बना
सध्याच्या काळ्या स्थितीपे तू चार शब्द सुना
आडवा हात मार तरी ज्यादा मत खाना

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन