राजधानी

Submitted by pradyumnasantu on 20 December, 2012 - 23:35

राजधानी
अंगणात विखरून माझ्या मंजिरी पडावी
तयांवरी वर्षा होता तुळस अंकुरावी
अशी ती हसावी आणि तशी ती रुसावी
उन्हां पावसाची तिजला तमाही नसावी
सूर्यदेव किरणे तिजला खेळण्यास देती
थेंब थेंब वर्षा ऋतूचे स्नान घालताती
सासुरासी जावी कन्या म्हणून लग्न केले
तुळशीच्या लग्नामध्ये फटाके उडवले
रूप मनी साठवले मी हळद माखलेली
लाडाची कन्या आमची जपून राखलेली
आणि अचानक तो शत्रू चाल करून आला
डुकरांनी साधून संधी घातलाच घाला
नाजूक मम रोपावरती धसमुसले पाय
तुळस चिखल होऊन जावी हाच तुझा न्याय?

-प्रद्युम्नसंतु

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या डुकराने तुळस नासवली म्हणून तुळस चिखल होत नाही. ती पवित्र आहेच. मानणे न मानणे हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते, पण चांगल्या विचारांचा माणूस तसा विचार करणार नाही.
समयोचित आणि सुंदर काव्य. (बरेच दिवसांनी आलात, आमच्यासारखे.)