तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?

Submitted by सतीश देवपूरकर on 20 December, 2012 - 09:48

रसिकहो!
आमच्या ‘रानफुले’ या १९९२साली प्रकाशित झालेल्या प्रथम गझलसंग्रहातील आमची एक खूप जुनी गझल देत आहोत, जी आमच्या उमेदवारीच्या काळातील आहे. आपण समजून घ्यालच अशी आशा करतो.
..........प्रा.सतीश देवपूरकर
गझल

तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?
माझ्या नसानसा का झंकारल्या अचानक?

येऊन ठेपलेला होता वसंत दारी.....
स्वप्नातल्या कळ्या का कोमेजल्या अचानक?

मी हुंदक्यास माझ्या येऊ दिले न ओठी;
का पापण्या फुलांच्या पाणावल्या अचानक?

होते ब-याच वेळा त्यांना बजावले मी....
तुज पाहताच नजरा भांबावल्या अचानक!

हातात हात ज्यांच्या देऊन मी निघालो;
अर्ध्यावरीच वाटा त्या लोपल्या अचानक!

हा सूर्य ऐन दिवसाढवळ्या कुणी दडवला?
दाही दिशा कशा या अंधारल्या अचानक?

खाणाखुणा कुणाच्या पाहून पावलांच्या,
जखमा जुन्यापुराण्या गंधाळल्या अचानक!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सुरेख गझल

गंधाळल्या... हा परिचित शब्द आहे माझ्यासाठी Happy तुम्ही ९२ साली वापरलेलं का हे यमक ? ग्रेट !
झंकारल्या, गंधाळल्या, भांबावल्या.. सुंदर. अशीच एक आणखी गझल वाचल्यासारखी वाटतेय. Happy

हिमांशु!
धन्यवाद! साधाराणपणे १९८८/८९मधे लिहिलेली ही गझल आहे!
अवांतर.........
रानफुले हा गझलसंग्रहही महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान देवून छापून घेतला आहे.(रुपये १५,०००/)
कविवर्य श्री. सुरेश भटांनी या गझलसंग्रहास प्रस्तावना लिहिली आहे. (बहुतेक त्यांची प्रस्तावना असलेला पहिलाच गझल संग्रह असावा!)

आयुष्यात पहिल्यांदा जाणीवपूर्वक लिहिलेल्या गझलेतील दोन शेर देतो...........
बोल तू सारे उद्या पण, आज नाही!
आज माझाही मला अंदाज नाही!!

ऐकण्यासाठी जिवाचे कान केले;
पाहिजे तो नेमका आवाज नाही!!

........प्रा.सतीश देवपूरकर

तारा कुणी मनाच्या या छेडल्या अचानक?
माझ्या नसानसा का झंकारल्या अचानक?<<< ठीक मतला. उमेदवारीच्या दृष्टीने बर्‍यापैकीच!

येऊन ठेपलेला होता वसंत दारी.....
स्वप्नातल्या कळ्या का कोमेजल्या अचानक?<<< स्वप्नातल्या कळ्या म्हणजे काय असते? फुलांच्या कळ्या स्वप्नात येतात की तरुण मुलींना कळ्या म्हणत आहात? या शेरावर भटांच्या 'फुलावया लागलीस तेव्हा'ची छाप स्पष्ट जाणवते. 'होता वसंत दारी' असे बोलताना बोलतात का? भट तर म्हणाले होते 'शेर आपण बोलतो तसा सुलभ असावा'. होता वसंत दारी हे निव्वळ वृत्त निभावण्यासाठी आहे. अगदी उमेदवारी म्हणालात तरी इतके जाणवणे अपेक्षितच आहे.

मी हुंदक्यास माझ्या येऊ दिले न ओठी;
का पापण्या फुलांच्या पाणावल्या अचानक?

फुलांच्या पापण्या? ही कोणती फुले ब्वॉ? येथेही फुले म्हणजे प्रेयसी / स्या अपेक्षित आहे काय? निव्वळ 'मी हुंदका दिला नाही तरी तिच्या पापण्या अचानक का पाणावल्या' या विधानात असे काय महान काव्य दडलेले आहे म्हणे? ज्यात कलाटणी, कडेलोट, भाषिक सौंदर्य, गझलेचे सर्व नखरे, डौल, तोल, अटी, प्रस्थापित संकेत, रुढी इत्यादी पाळले गेलेले असून अगदी अजरामर झालेला खयाल आहे???

होते ब-याच वेळा त्यांना बजावले मी....
तुज पाहताच नजरा भांबावल्या अचानक!

कोणाच्या नजरा? नजर की नजरा? नजरा म्हणजे अनेकवचन झाले. म्हणजे अनेकांना बजावले होते की अनेकांच्या नजरांना बजावले होते? काय बजावले होते, की भांबावू नका? का भांबावत होत्या त्या? शेरातील कथानकाला काही आगा, काही पीछा आहे का? पब्लिक वाचतंय आणि प्रतिसाद देत आहे म्हणून इतके सुमार शेर पेरायचे? आता 'हाच शेर तुम्ही कसा केला असतात' हे विचारू नका. मी असले शेरच केले नसते.

हातात हात ज्यांच्या देऊन मी निघालो;
अर्ध्यावरीच वाटा त्या लोपल्या अचानक!

वाटा लोपल्या, पण हातात हात कोणाच्या दिले होते? त्यांचे काय झाले? वाटांच्या तर हातात हात कोणी देत नाही. तसेच म्हणायचे असल्यास ते पचूच शकत नाही. वाटांच्या हातात मी हात दिले म्हणजे काय बुवा? बरं दुसर्‍या कोणाच्या हातात हात दिले तर मग वाटा लोपल्या हे ठीक, पण ज्यांच्या हातात हात दिले ते कुठे उलथले या शेरात? आशयाची अचूकता, संप्रेषित होण्याची अंगभूत कुवत या पातळ्यांवर तर हा शेर निकामी झालेलाच आहे, पण यात काही खयालही असा नावीन्यपूर्ण नाही की जो नुसता ऐकून कोणी दाद द्यावी.

हा सूर्य ऐन दिवसाढवळ्या कुणी दडवला?
दाही दिशा कशा या अंधारल्या अचानक?

दिवसाढवळ्या या शब्दाने आनंदकंदाचा यती गिळलेला आहे हेही उमेदवारीचेच लक्षण काय? आणि आज तर उमेदवार नाही आहात ना? मग हा शेर बदलून का नाही प्रकाशित करू शकलात? तुमच्या व्यासंगाच्या प्रत्येक पायरीचे मायबोलीने साक्षीदार असावे अशी इच्छा आहे की काय? निदान दिवसा व ढवळ्या या दोन अक्षरसमुहात एक डॅश तरी लिहायचा. किरकोळ खयाल आहे, कोणीतरी दिवसा सूर्य दडवला आहे आणि त्यामुळे दाही दिशा अंधारल्या आहेत. आता सूर्य ऐन दिवसा कोणीतरी दडवल्यावर पुन्हा पुढच्या ओळीत दिशा अंधारण्याला 'कशा या' याची काय गरज? उत्तर पहिल्या ओळीत तुम्ही स्वतःच दिले आहेत की?

खाणाखुणा कुणाच्या पाहून पावलांच्या,
जखमा जुन्यापुराण्या गंधाळल्या अचानक!

हे जखमांचे सुगंधी होणे किंवा गंधाळणे मराठी गझलेला झालेले एक गळू आहे. च्यायला जखमा गंधाळणे ही किती विकृत आणि किळसवाणी पातळी असेल काव्याची! पावलांचा संबंध काय या जखमा गंधाळण्याशी? 'त्या कोणाच्यातरी' कसल्याही खाणाखुणा, जसे काही वस्तू, काही आवाज (पैंजण, बांगड्या इत्यादींसारखे), काही विशिष्ट जागा (पूर्वीची भेटण्याची जागा इत्यादी) यातील काहीही पाहून ते होऊ शकते की? पावलांना साजेलसे काही पुढच्या ओळीत घेण्याची चिंताही कवीला भासत नाही हे औरच आहे.

एवढे सगळे करून पुन्हा कामयाब शेरांची वैशिष्ट्ये तुम्ही बोल्ड अक्षरात पन्नासवेळा लिहिता, ही दुटप्पी आणि भोंदू भूमिका सोडून द्या आता. लोक 'यडे' नाहीयेत इथे!

>>>-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१<<<

तुमचा हुद्दा, पेशा, त्यातील स्थान, अवाक करणार्‍या उपाधी आणि संपर्क क्रमांक यांचा गझलेशी वा कोणत्याही साहित्यप्रकाराशी काहीही संबंध नाही. जे बोलते ते गझल बोलते. मेडिकल डॉक्टर असलेले तीन गझलकार (अनंत, ज्ञानेश, कैलास) व एक अर्धे गझलकार (जामोप्या) आत्ता मायबोलीवर आहेत. पी एच डी असलेले एक गझलकार (समीर - प्रोफेसरही आहेत हे) आत्ता मायबोलीवर आहेत. ते आपली क्वालिफिकेशन्स येथे झळकवत नाहीत. त्यांचे साहित्य त्यांच्याबद्दल बोलते.

भूषण कटककर,
अत्यंत हास्यास्पद,अपरिपक्व कव्यबोध व अधू काव्यदृष्टीचे प्रदर्शन या पिसे काढण्यात दिसून आले!
उपस्थित केलेले प्रश्न तर पिसे काढणा-याच्या काव्यजाणीवांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वाटले!
प्रतिकांची भाषा, त्यांची कलात्मक गुंफण, शब्दांचे/प्रतिमांचे लाक्षणिक व ध्वन्यार्थ, दोन ओळींतील अव्यक्त जागा इत्यादी ब-याच काव्याच्या मूलभूत बाबींची वानवा पिसे काढणा-यात दिसून आली!

बहुधा पिसे काढणा-याला गद्य पद्यात लिहिलेले हवे होते! यात त्यांच्या एकंदर काव्यप्रगल्भतेचे लक्षण दिसून येते!
काव्य ही वक्रोक्ती असते याच मूळ जाणीवेचे अज्ञान स्पष्टपणे दिसून येते!
गझल/कविता समजावून सांगणे (आपल्या भाषेत पिसे काढणे) या तोंडच्या गप्पा नव्हेत, हेच खरे!
शेरातील व्यामिश्रता तर खूपच दूरची बाब, जिचा गंधही पिसे काढताना दिसत नाही!
टीप: अशा एकांगी, व्यक्तिद्वेषमूलक, अतार्किक, अकाव्यात्मक पिसे काढण्याच्या बालिश खेळाला आमचा हा शेवटचा प्रतिसाद!
असल्या चिल्लर व बिनबुडाच्या बालिश क्रीडांमधे घालवायला आमच्याकडे फावला वेळ नाही!
आपण पिसे काढायला सिद्ध झाल्याची भीष्मप्रतिज्ञा जाहीर केल्यावर आम्ही आमच्या प्रांजळ भावना सशक्त मनाने लिहिल्या होत्या. आपण वाचले की वाचून सोयिस्कर दुर्लक्ष केले ते देवास ठाऊक!
............प्रा.सतीश देवपूरकर
.....................................................................

बेफीजीना बोलता आहात ?...तुम्ही पिसे कढताना वेगळे काय करता मग ??
बेफीजी करत आहेत ते बरोबरच आहे तुम्हाला आरसा दाखवत आहेत ते !

वैभवा!
बेफीजीना बोलता आहात ?...तुम्ही पिसे कढताना वेगळे काय करता मग ??
बेफीजी करत आहेत ते बरोबरच आहे तुम्हाला आरसा दाखवत आहेत ते !
<<<<<<

आम्ही कुणाशी बोलत आहोत हे चांगलेच जाणतो......
भूषण कटककर नावाच्या मायबोलीच्या स्वयंघोषित ठेकेदाराशी!
पातळी सोडून बोलणा-याशी कसे बोलायचे हे समजायला कुणाची शिकवणी लावावी लागत नाही!
ज्याच्याकडे मुळात पिसेच नाहीत स्वत:ची, त्याने दुस-यांच्या गझलांची पिसे काढायची म्हणजे कमालच झाली!
ज्या माणसाने स्वत:ला कधी आरशात पाहिले/न्याहाळले आहे का अशी शंका यावी असा माणूस दुस-यांना काय आरसा दाखवणार?

अवांतर: पूर्वी तुला या माणासाने दिलेल्या धमक्या, दाखवलेली अरेरावी, तू या माणसाला दिलेली उत्तरे तू सोयीस्करपणे विसरला असशील, आम्ही नव्हे! आम्ही म्हणजे वैवकु नव्हेत, याचा या माणसाला विसर पडला!

त्याचवेळी या माणसाचे खरे रंग आम्ही ओळखले होते!

पण जोवर आमच्या वाटेला कोणी जात नाही, तोवर आम्ही डोळेझाक करतो! पण आता नाही!
या माणासाच्या पहिल्या आलेल्या विक्षिप्त प्रतिसादावरचे आमचे उत्तर वाच! आम्ही काबूत ठेवलेला संयम तुला दिसेल! हसण्यावारी न्यायचे ठरवून त्यांना आम्ही एक आव्हान केले होते! त्याचे उत्तर राहिले दूर तोच हा बिनपिसांचा माणूस पिसे की काय ती काढू लागला!

आपल्या फोनवर झालेल्या संभाषणात आम्ही तुलाही सांगितले होते की बनावट नाव धारण करून बुरख्यातून लिहिणा-याची आम्हास चीड आहे ते ! कोण म्हणे गंभीर समीक्षक बिनबुडाचा, बिन चेह-याचा, भ्याड व कावेबाज!
आम्ही का म्हणून त्याने केलेल्या वेडगळ प्रश्नांना उत्तरे देत बसावे? सोडून दिले! असो.
अजूनही कोण हा गंभीर विदूषक आम्हास माहीत नाही आणि जाणून घेण्याची पण इच्छा नाही!
पण सगळेच मायबोलीकर काही अशा माणसाच्या ताटाखालचे मांजर नसतात. ते काय काय सांगत असतात आम्हास फोन करू करू! तरीही अजून आम्ही कुणाच्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवलेला नाही! म्हटले सत्य एक ना एक दिवस बाहेर येईलच!

तू नाही का क्ष.य.ज्ञ. नावाने काहीबाही आम्हास लिहायचास! तू निदान खुल्या दिलाने कबूल तरी केलेस! आवडला आम्हास तुझा प्रामाणिकपणा! तू वयाने आमच्या मुलापेक्षाही लहान आहेस, म्हणून आम्ही माफ केले!
पण हा प्रामाणिकपणा प्रत्येकात असेलच असे नाही!

आम्ही नवीन असताना देखिल वैवकु समजून तोच प्रयोग आमच्यावरही हा माणूस करू पहात होता. तुमची अजून कुणीच टवाळी केलेली नाही असे काही तरी धमकीवजा म्हणत होता. तेव्हाच मनाच्या कोप-यात त्याचे हे शब्द कोरले गेले. पण वैभवा तुला सांगतो आम्ही खूप आयुष्यात डोळेझाक करायाल शिकलो!
आम्हास भांडण, तंटे, बखेडे आवडतच नाहीत. स्नेह आम्हास आवडतो! असो.

पण आताचे या माणसाचे वागणे, बोलणे पाहिल्यावर आमचा नाईलाज झाला!

आम्ही म्हटलेच आहे एका गझलेत..........

मी असा दिसतो नको जाऊस त्यावर.......
जाण की, पडली कुणाशी गाठ आहे!

समझनेवालेको इशरा काफी होता है!

पण या माणसाचा विक्षिप्तपणा समजण्यापलीकडील आहे! असो.

शेवटी इतकेच सांगतो व थांबतो.............

राग ना माझा कुणावर, मी जगावर प्रेम केले!
जा! तुलाही माफ केले, मी तुझ्यावर प्रेम केले!!

ही आहे आमची तबीयत! वैभवा!

नफरतही सही मगर रिश्ता न तोडिये
दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिये!.
.......निदा फाजली
थांबतो! सावध रहा रे बाळा! देव तुझे रक्षण करो!
प्रा. सतीश देवपूरकर

वैभवा! आमच्या वरील प्रतिसादातील, तुला लिहिलेल्या, स्मरणपर ओळींवर सोयिस्कररित्या काहीही बोलला नाहीस ते? घाबरलास की, काय?

मी घाबरत नाही गैरसमज नसावा

अपण सगळेच इथे जे वागतो बोलतो आहोत त्याचा लोक गांभीर्याने विचार करतात व त्यांच्या मनावर कुठेतरी काहीतरी दुष्परिणाम होतो हे पाहून विचारमग्न झालो आहे

आता मी निदान स्वतःशीतरी अधिक संयमाने जबाबदारीने वागले पाहिजे असे माझे मत होवू लागले आहे

ज्या स्मरणीय गोष्टीबाबत आपण उल्लेख केला अहे त्याबाबत मी त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटून बोललो आहे

प्रत्यक्ष भेटल्यावर माणसे नक्कीच जास्त चांगल्यातर्‍हेने समजतात असे मला सल्ले मिळाले होते ते मी पाळले
एक मिसरा होता तरहीचा<<<<< तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला >>>>> मी तरही केली<<<<<<<तुला दुरून भेटणे प्रशस्त वाटते मला>>>> प्रत्यक्ष भेटीत त्या शायराने विचारले की असे का केलेत म्हणून ? माझ्या तर ही बाब लक्षातही आली नव्हती .........मग ते शायरच म्हणाले की तुमच्या आयुष्यात भेटणे महत्त्वाचे असेल माझ्या आयुष्यात पाहणे म्हणून तसे झाले असावे !!!!
या वरून आठवले की मी तुम्हालाही भेटायचे आहे असे म्हणून तुमच्या मागे लागलो होतो .........पण आता पुनर्विचार करीत आहे

माणसाने जीव कुठे लावायचा हे त्याला स्वतःस समजायला हवे ...माझ्यामते मला ते बर्‍यापैकी समजते

आपल्या माझ्याबरील प्रेमाबद्दल लाख लाख धन्यवाद
पण माझ्यावर /इतर शायरांवर प्रेम केले नाही तरी चालेल आमच्या गझलेवर करा ती जशी आहे तसे तिच्या गुण दोषासकट

असो
भेटी अंती बोलूच !!!

वैभवा! आमचे तुझ्यावरचे प्रेम, स्नेह कधीही कमी होणार नाही!
आम्हास कुणाशीही भाडण आवडत नाही!
माझे अता कुणाशी कसलेही भांडण नाही!
माझ्या विषण्णतेला कुठलेही कारण नाही!!

बेफिकीरजी नी केलेले डिसेक्शन वाचले.

देवपूरकर यान्च्या कवितेची इतक्या तार्किक पातळीवर केलेली चिरफाड वाचून वाटले, गेले द्यायचे राहुन या कवितेला इतकीच तर्काची कात्री लावली तर त्या कवितेत काय बाकी राहील?

ग्रेस यान्च्या तर बहुधा सर्व कविता शून्यावर बाद होतील.

ता.क.

सुनील दान्डेकर हे सतीश यान्चे दुसरे नाव नाही.

त्यांनी 'डे वन' पासून प्रत्येकाच्या प्रत्येक गझलेची मोठी सखोल चिरफाड केलेली आपल्याला दिसून येईल. आपल्यावर उलटले की इतके मनाला लावून घेणे योग्यही नाही. गझल जर म्हंटलीच तर तिची अशी चिरफाड होऊ शकते हे नित्य चिरफाड करणार्‍याला स्वतःलाही माहीत असायला हवे.

खुरटलेल्या ऋतूंचे वेच तू प्राजक्त थोडेसे

या माझ्या गझलेवरील प्रतिसादातील त्यांच्या या ओळी वाचा, म्हणजे कोणत्या पातळीला चिरफाड केलेली आहे हे आपल्याला आढळेलः

वेचतात ती साधारणपणे प्राजक्ताची फुले.....
प्राजक्त वेच.......जरा खटकले.

आता प्राजक्त वेच म्हणणारा कवी काय प्राजक्ताचे झाड वेच म्हणणार आहे?

पटत आहे का मी काय म्हणतो ते?

अशी 'य' उदाहरणे आहेत त्यांनी केलेल्या चिरफाडीची! (मायबोलीवरच)

एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले

या शेरात म्हण वापरायची आहे म्हणून हा शेर केला म्हणे व असे गझलेला चालत नाही वगैरे वगैरे ......
स्वतः नाक शब्द असलेल्या ७-८ शेराना शिंकल्यावर म्हणतात की म्हणी वाक्प्रचार कसे वापरायचे हे शिका माझ्या कडून वगैरे

अशी असंख्य अगणित उदाहरणे आहेत

अरेरे तीन वेळा सेव झाला. असो. तर एका युगात एकच महामानव होऊ शकतो. आणि आजकाल तो म.मा. कोण हे ठरविण्याचा अधिकार लोकांचा राहिला नसून म.मा. ने पुर्णतः स्वतःकडे घेतला आहे!!

हबा मी ही ओळ अशी वाचली

चरावयाचे असेल तर हे कुरण तुझ्या सोयीचे नाही.
इथे दुधाच्या जनावरांना चरावयाला नकार आहे.

उत्तम!... अस्सल जातिवंत शेर !!

'फळावयाचे' चा एक अश्लील अर्थ आमच्या गावात काढला जातो म्हणून तो शब्द बदलून वाचत आहे