Vishal005

प्रेम...

Submitted by Vishal Kulkarni 005 on 15 June, 2013 - 13:46

प्रेम...

मोग-याच्या सुगंधी सुवासात
मी हरखून गेले होते...

तुझ्या आठवणीत
मी हरवून गेले होते...

तुला खूप प्रेम द्यायचे होते
प्रेमात तुला जग विसरायला लावायचे होते...

तुझ्या माझ्या निर्व्याज प्रेमावर
कुठलेही बंधन नको होते
कुठलेही बंधन नको होते....

शब्दखुणा: 

मृगजळ

Submitted by Vishal Kulkarni 005 on 4 February, 2013 - 11:08

मृगजळ.....

प्रेमाचे मृगजळ शोधतयं माझं जीवन
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण..

एक वेगळंच आयुष्य घडविणारी
तरीही जीवनात सुखाचा आसमंत फुलविणारी...

जीवनावर निर्व्याज प्रेम करणारी
अखंड तेवणारी ज्योत प्रेमाची...

शब्दखुणा: 

चकवा

Submitted by Vishal Kulkarni 005 on 18 January, 2013 - 13:16

चकवा..

लिहिता लिहिता लेखणी थांबते
भूतकाळाच्या आठवणीवर मोहोर उमटते
मनाच्या कप्प्यात दडलेल्या
आठवणी बाहेर येतात
बघता बघता त्यात हरवून जाते...

हिरव्यागच्च झाडीतून
एक पांढरा ठिपका दिसतो
तो एक चकवा असतो
त्यात मला हरवायचं नसतं
नकळत पणे एकाकी चालायचं असतं...

वादळवा-य़ाशी अखंड
तोंड देत जायचं असतं
आठवणींच्या कड्यावरुन
स्वत:ला झोकून द्यायचं असतं...

निसर्गाने शिकवले की
वनवास कपाळी आला
तरी मानाने जगायचं असतं
तोहि एक चकवा असतो
आणि त्यातुनही सहिसलामत सुटायचं असतं...

शब्दखुणा: 

Mobile Life

Submitted by Vishal Kulkarni 005 on 13 January, 2013 - 12:06

---Mobile Life---

सुख आहे सगळ्यांजवळ
पण वेळ नाही अनुभवायला...

Mobile मधे save आहेत नावे सगळ्यांची
पण वेळ नाही त्यांच्याशी चार शब्द बोलायला...

इतरांचं सोडा...
पण आपल्यालाच वेळ नाही स्वत:कडे बघायला
जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत वेळ नाही जगायला..

शब्दखुणा: 

सच्चा मित्र

Submitted by Vishal Kulkarni 005 on 21 December, 2012 - 06:51

-सच्चा मित्र...-

अजय आहे माझा मित्र
रक्ताचे नाते नसातानाही
जवळ आहे सर्वांपेक्षा जास्त..
वाचनाच्या छंदामुळे जमलेले बंधन
गेले ओलांडून पलिकडे..
मनाच्या ओल्या मातीत
आपसूकचं रुजले..
आठवणीच्या रुपात
अधिकच बहरले..
मातीत घट्ट रुजुन
इन्द्रधनुष्यासारखे आभाळापर्यंत पोहोचले...

शब्दखुणा: 

मैत्री

Submitted by Vishal Kulkarni 005 on 13 December, 2012 - 12:55

मैत्री म्ह्णजे....

ना किनारा समुद्राचा
ना क्षितिज आकाशाचे
ना हसू आनंदाचे
ना रडू दु:खाचे
ना तमा कशाची
ना भान जगाचे
स्वत:तच हरवलेली
खोलखोल समुद्रसारखी
मुक्त आकाशात भरारी घेणारी
अविरत अशी जळणारी
जळून पण मागे धूर आणि राख ठेवणारी
आठवणींच्या धूराने डोळ्यात पाणी आणणारी
सोबत असते वर्तमानात
जोडून ठेवते भूत भविष्याला
अस्तित्वातच मनसोक्त रमणारी ....मैत्री

शब्दखुणा: 

दोस्त

Submitted by Vishal Kulkarni 005 on 6 December, 2012 - 11:35

-दोस्त-

ईवलीशी अत्तराचि कुपी
दुःखावरची हळूवार जादुची झप्पी
न दिसणारा हातामधला हात
सुखदुःखात नेहमीच साथ
तु असल्यावर अवघं जीवन व्हावं गाणं
नेहमीच साठी तुझीच साथ...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Vishal005