लहानपण

बाळ होऊनी पुन्हा जन्मावे...

Submitted by अक्षय समेळ on 9 November, 2021 - 06:57

सोडूनी चिंता उद्याची सारी
बाळ होऊनी पुन्हा जन्मावे
अन् पदराच्या अभायाखाली
डोळे घट्ट मिटून पुन्हा निजावे

वाटता भीती जराशी अंधाराची
ओढुन घ्यावी रजाई जरतारीची
अन् धडधड तुझ्या हृदयाची
ऐकत गुपचूप पडून रहावे

घरभर बागडावे इवल्या पावलांनी
मनसोक्त हसावे खोड्या करुनी
अन् मिळता ओरड जरासा
तुझ्या पाठीमागे हळूच लपावे

- अक्षय समेळ.

आठवण

Submitted by रणजित चितळे on 9 May, 2012 - 04:26

आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.

गुलमोहर: 

आठवणी आजोबांच्या

Submitted by आशयगुणे on 9 April, 2012 - 17:37

सकाळचे ९ - ९.३० वाजले आहेत. मी बेडरूम मधून डोळे चोळत चोळत बाहेर येतो. आईने 'तोंड धु' असा आदेश दिलेला आहे. परंतु मी जातो हॉल मध्ये. हॉल सुरु होतो तिथल्या भिंतीआड उभा राहून मी कोपऱ्यातल्या सोफ्याकडे बघतो. सोफ्यावर पायांचा त्रिकोण करून पेपर वाचत एक व्यक्ती बसलेली आहे. पेपर इतका पसरलेला आहे की कंबरेपासून डोक्यापर्यंत सारे काही त्याच्या आड गेले आहे. मी गालातल्या गालात हसतो....हळूच तिकडे जातो...आणि पेपरवर हात मारून तो उस्कडून टाकतो. आपल्या वाचनात विघ्न आणू पाहणाऱ्या ह्या राक्षसाला शिक्षा न करता ती व्यक्ती त्याला उलट प्रश्न विचारते, " काय!

गुलमोहर: 

पनिशमेन्ट

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 23 June, 2011 - 09:32

''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''

आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंगीत लहानपण (कथाबीज ३ साठी लिहिलेली)

Submitted by सावली on 27 September, 2010 - 21:41

मायबोली वरच्या कथाबीज ३ साठी लिहिलेली ही कथा. तिथे ५०० शब्दांचे बन्धन होते त्यामुळे काहि गोष्टी नीट लिहिता आल्या नव्हत्या. म्हणुन परत लिहितेय. अशा प्रकारच्या कथेचा, भाषेचा हा पहिला प्रयत्न आहे. चुका असतील तर दाखवुन द्या. Happy
मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, कपड्याचे दुकान, आईस्क्रीम
****************************

"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.

"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."

गुलमोहर: 
Subscribe to RSS - लहानपण