जादुची सुई
जादुची सुई या चित्रमालेमधुन माझे क्रोशेकाम शेअर करनार आहे
जादुची सुई या चित्रमालेमधुन माझे क्रोशेकाम शेअर करनार आहे
ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले 
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले 
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
चेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.
फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .