मिनिएचर

राधा ही बावरी, हरीची...

Submitted by अवल on 7 August, 2014 - 06:14

एकटा कृष्णकाही बरा दिसेना, शेवटी राधेला पर्याय नाहीच ना Happy

IMG_20140807_154250.jpg

पिटुकला कृष्णकन्हैय्या

Submitted by अवल on 28 July, 2014 - 03:44

फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .

Subscribe to RSS - मिनिएचर