क्रोशा

क्रोशा कलाकृती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 December, 2013 - 04:08

अवलच्या ऑनलाईन क्लास मध्ये नव्याने खालील प्रकार विणले.

१) अननसाच्या डिझाईनचा रुमाल.

२) खास पुतण्याच्या फर्माईशने बनवलेले हातमोजे.

विषय: 
शब्दखुणा: 

शांकलीची गुरुदक्षिणा

Submitted by अवल on 14 December, 2013 - 02:36

शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी Happy

घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.

एक नवा प्रयोग : जाकिट

Submitted by अवल on 5 July, 2013 - 10:29

प्रिया७ ने इथे एका मॉल मधल्या जाकिटाचा फोटो पाठवला होता. तो करायचा प्रयत्न केला. मॉल मधले जाकिट दो-याचे होते. आपल्याकडे फाईन दोरा मिळत नसल्याने मी लोकरीचे केले. अनायसा बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला देता येईल, प्रिया खूप खूप धन्यवाद ग Happy
हा तिने पाठवलेला फोटो
photo2.jpg

आणि हा माझा प्रयत्न ( सध्या मॉडेल नसल्याने उशीला चढवलाय, त्यामुळे शेप जरा नीट दिसत नाहीये )

1373028636072.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

ओटी

Submitted by अवल on 13 May, 2013 - 07:59

मैत्रिणीच्या लेकीच्या डोहाळे जेवेणाला तयार केलेली; मलई दो-याने विणलेली बॅग, "संगोपन - बाळ गोपाळांचे" हे पुस्तक आणि ओटी

bag.jpg

हा नुसत्या बॅगेचा फोटो

bag_1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

अननसाचा व्हि नेक/ बोट नेक पोंचू

Submitted by अवल on 18 March, 2013 - 00:08

वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला

1363165008292.jpg

आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात Happy
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.

1363165008444.jpg

क्रोशाचे दागिने (ब्रेसलेट सह )

Submitted by अवल on 13 March, 2013 - 12:49

क्रोशाचे अगदी सोपे, प्राथमिक टाक्यांनी,दो-याचे विणलेले हे काही नमुने
हे ब्रेसलेट

BR_9.jpg

हे छोटे इयारिंग

earing_1 copy.jpg

हे थोडे मोठे

earings_2 copy.jpg

हे नाजूक गळ्यातले

neck less_2 copy.jpg

हे मोठ्या पदकाचे

परीचा फ्रॉक आणि डायमंड जाकिट

Submitted by अवल on 23 February, 2013 - 12:21

प्रसिद्ध अननसाच्या डिझाईनचा क्रोशाने विणलेला लोकरीचा फ्रॉक

DSC_0870.jpg

आणि हे एक डायमंड जाकिट

jakit_ dimond.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - क्रोशा