गिनिज रेकॉर्ड भारतीय स्त्रियांच्या खिशात (डोनेट केलेल्या काही फोटोंसह),(इबुक लिंक सह)

Submitted by अवल on 31 January, 2016 - 10:33

ऑगस्ट 2015पासून सुरू असलेले प्रयत्न आज साजरे झाले Happy
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातील सर्वात मोठे ब्लँकेट भारतीय स्त्रियांनी आज पूर्ण केले. 11148 स्क्वेअर मीटर इतके मोठे ब्लँकेट आज भारतीय स्त्रियांनी विणून पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई इथे हे रेकॉर्ड गिनिजच्या माननीय सदस्यांनी जाहीर केले Happy
मला खूप आनंद होतो सांगायला की मी, माझी आई, माझ्या बहिणी, मैत्रिणी, येथील निर्मला, संपदा आणि हजारो भारतीय महिलांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला होता. ऑगस्ट पासून जानेवारी पर्यंत हा उपक्रम चालू होता.
मनात आणलं तर महिला काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. चेन्नईच्या सुबश्री नटराजन यांचे समर्थ नेतृत्वाखाली आणि अत्यंत कुशल प्रशासनाखाली अनेक अनोळखी महिला एका झेंड्या खाली एकत्र आल्या; मदर्स इंडिया क्रोशे क्विन्स! फेसबुक, व्हॉट्स अप अशा माध्यमांतून आणि प्रत्यक्ष गाठीभेटीतून हा समान धागा गुंफला गेला, आणि त्यातून विणले गेले हे जगातील सर्वात मोठे, महाप्रचंड ब्लँकेट!
सुरूवातीला केवळ 5000 स्क्वेअर मीटरचा टप्पा अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा टप्पा सहज ओलांडला गेला, नव्हे दुपटीपेक्षा जास्त संख्येने पार पडला.
या सोहळ्याची ही काही क्षण चित्रे!
सुबश्री मॅम, चेन्नईची टीम आणि जगभरातील सर्व सख्यांना खूप खूप अभिनंदन आणि खुप सगळे धन्यवादही___/\___ Happy
IMG-20160131-WA0023.jpgIMG_20160131_210701.jpgIMG-20160131-WA0019.jpg

आणि ही काही प्रकाशचित्रे मोठे ब्लँकेट डिटॅच्ड करून डोनेट करतानाचे Happy
IMG-20160201-WA0066.jpgIMG-20160201-WA0065.jpg

दान केलेल्या संस्थांचे तपशील
12654109_465844260274772_4125609257434619208_n.jpg
अधिक फोटो फेसबुकवरती पाहू शकता.

या गिनिज रेकॉर्डचे इबुक इथे बघता येईल:

https://www.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fdrive.google.com%2Ffile%2...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके.
I remember what i said on the other thread, but let me be the second one to say, congratulations!

सर्व संबंधितांना मनःपूर्वक सलाम! ही गोष्ट घडवून आणणे अजिबात सोपे नाही. लेखातील भावनांशी सहमत! अवल, तुम्ही, तुमचे कुटुंबीय व मैत्रीणी ह्यांचे विशेष अभिनंदन!

मात्र, 'महिला एकत्र आल्या तर काय करू शकतात' ह्याचे हे उदाहरण वाटत नाही. ह्या उपक्रमाला 'महिलाशक्ती' वगैरे स्वरूप दिले जाणे अनावश्यक वाटते.

भारतीय महिलांनी गिनीज रेकॉर्ड जसे हे ब्लँकेट तयार करून मिळवले आहे तसेच ह्या आधी वेगळ्या उपक्रमाद्वारे मिळवलेले आहे.

तरीही, खूपच मोठे संघटन आणि सहभाग नक्कीच असणार ह्या सगळ्यात. पुन्हा एकदा अभिनंदन!

-'बेफिकीर'!

ज्यांनी ज्यांनी ह्या उपक्रमाला आनंदाने हातभार लावला त्या हातांना सलाम ! अभिनंदन!

अभिनंदन गं.
एवढे मोठे काम करताना संयोजक म्हणून सुबश्री नटराजनना कित्येक अडचणी आल्या असणार, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आले कि त्या सगळ्यांना एकत्र ठेऊन कायम उद्देशाच्या दिशेने motivate करत नेणे सोपे काम नाही. सुबाश्रीनि ते करून दाखवले याबद्दल त्यांचे आणि त्यांना यात साथ देणार्या सर्व भारतीय महिलांचे अभिनंदन. मी जरी स्वतः भाग घेतला नाही तरी ग्रुपची मेम्बर आहे, त्यामुळे सुबाश्रीनी घेतलेले कष्ट पाहिलेले आहेत.

सर्व कलाकारांचे (पडद्यामागचे आणि पुढचे दोन्ही) हार्दिक अभिनंदन ! भारीच दिसतंय Happy
मटा मधे पण बातमी आलीये:-

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/world-record/articleshow/5...

Pages