पिटुकला कृष्णकन्हैय्या

Submitted by अवल on 28 July, 2014 - 03:44

फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .

IMG_20140728_124644.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मैत्रिणी, विद्यर्थिनींच्या सुचनांमुळेमला खुप मदत झाली हा कृष्ण, बनवताना धन्यवाद मैत्रिणींनो Happy

हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे.>>>> हे लिहिले आहेस त्यामुळेच कळले...

ग्रेट, ग्रेट ....

धन्यवाद सर्वांना:-)
आर्या, अग बाळकृष्ण नाहीये ना, सो राहिला उभा Wink जोक्स अपार्ट दोन पावलं आणि मागे भींतीला टेकवला , मग राहिला उभा

खुप सुंदर !

( अवलच्या कलाकौशल्यात किचकट, अवघड या शब्दांना स्थान नाही बरं ! )

सख्यारे, अशी साद घातलिस की जनीला दळायला लागायचा तसा तो तुझ्या हातात आणि मेन्दुत शिरुन काम करतो.उपजत प्रतिभा आणि मग चिकाटी.सलाम तुला.

Pages