भंडारदरा

'रतनगड' :सह्याद्रीचे आभुषण !

Submitted by Yo.Rocks on 5 November, 2012 - 21:32

पावसाळ्यातील आहूपे घाटाचा ट्रेक झाल्यानंतर मोठ्ठा ब्रेक होता.. गणेशोत्सव, नवरात्री झाली.. नि आम्हाला वेध लागले पुढच्या ट्रेकचे.. खरे तर ऑक्टोबर हिट मध्ये ट्रेक करण्यासाठी नाक मुरडतोच.. पण संध्याकाळची थंड हवा जाणवू लागली नि साहाजिकच गडावरची रात्र आठवू लागली.. ही ओढ वाढत असतानाच विन्याने 'हरिश्चंद्रगड नाळीच्या वाटेने' या ट्रेकचा नारा सुरु केला.. नि मागे- पुढे करता करता दिवस ठरला.. २७-२८ ऑक्टोबर.. नेहमीच्या येणार्‍या मायबोलीकरांना कळवले.. Proud सगळे राजी झाले..

"भंडारदरा" - हम भी कुछ कम नही!!!

Submitted by जिप्सी on 17 September, 2012 - 01:14

"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!
=======================================================================
=======================================================================

ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात...

जीव होतो ओलाचिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतू पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात

रतनगड... प्रवरेच्या साथीने...

Submitted by सेनापती... on 31 July, 2011 - 11:06

३ वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात मी आणि माझे काही मित्र-मैत्रीणी असे एकूण १० जण रतनगड़ला गेलो होतो. रतनगड़ माहीत नसेल असा कोणी डोंगरवेडा असेल अस नाही मला वाटत. १ तारखेला रात्री शेवटच्या, म्हणजे खरतर २ तारखेला पहाटे आम्ही कल्याणहून निघालो. प्रचंड पाउस पडत होता. इतका की इगतपुरीला पोहचेपर्यंत आम्ही जवळ-जवळ पूर्ण भिजलो होतो. पहाटे ३ च्या आसपास तिकडे पोचलो आणि स्टेशनवर बसून होतो. उजाडल की शेंडी गावची बस पकडून आम्हाला रतनगडाकड़े सरकायचे होते. पहाट व्हायला लागली तशी स्टेशनवर वर्दळ वाढायला लागली. आम्ही मस्तपैकी कटिंग चहा मारला आणि बसस्टैंडकड़े निघालो.

"सांधण दरी"

Submitted by Yo.Rocks on 12 June, 2011 - 15:37

उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग ३ - मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

Submitted by सेनापती... on 6 September, 2010 - 03:53

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण सुळका' समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग २ - जंगलातली रात्र

Submitted by सेनापती... on 3 September, 2010 - 01:37

पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. Lol एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते.

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड - भाग १

Submitted by सेनापती... on 1 September, 2010 - 22:48

दिनांक : २०-८-२००० ठिकाण : कोलेजचा कट्टा.

Subscribe to RSS - भंडारदरा