घाटघर

जीवधन ते नाणेघाट : शेवट उन्हाळी भटकंतीचा

Submitted by Yo.Rocks on 9 June, 2013 - 14:31

एव्हाना भरधाव जाणारी गिरीची 'होंडा सिटी' आज मात्र कल्याण-जुन्नरमार्गे काळोख्या रात्री माळशेज घाटातून शांततेचा आस्वाद घेत अगदी आरामात चालली होती.. घाई आजिबात नव्हती तरीसुद्धा त्या डांबरी रस्त्यावरचे पांढरे पट्टे मात्र लगबगीने गाडीखाली येत असल्याचे भासत होते.. आतापर्यंतच्या प्रवासात गरमीयुक्त वाटणार्‍या हवेत एक प्रकारचा सुखद गारवा आला होता... गाडीत सुरु असलेल्या गुलाम अलीच्या गझलांनी तर वातावरण सुरमय झाले होते.. त्यातही गप्पागोष्टींची मैफल सुरुच होती... सारे काही निवांतपणे चालले होते... अर्थात सका़ळपासून कसे, कुठे, किती वाजता इत्यादी बर्‍याच गोष्टी चघळून झाल्या होत्या..

"सांधण दरी"

Submitted by Yo.Rocks on 12 June, 2011 - 15:37

उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..

Subscribe to RSS - घाटघर