आजकाल फेसबुकवर फिरताना कुठल्या कुठल्या अॅक्ट्रेस्/अॅक्टर्सचा फॅनक्लब, किंवा मी मराठी अभिमान गर्व, किंवा गडकिल्ले किंवा काय वाट्टेल ते नाव असलेल्या फॅनपेजवर गणपतीचा फोटो सापडतो. गणेशोत्सव चालूच आहे त्यामुळे सगळीकडे लोकांना बेस्ट गणपतीचा फोटो टाकायची इच्छा असतेच.. लोकं आपले टाकतात कुठून तरी ढापून. पण आपण मायबोलीकर हुश्शार! लगेच कळते तो फोटो कोणाचा?
विकांताला एअर बलून शो नंतर झालेल्या फायरवर्क्स मध्ये मी केलेली मोबाईल फोटूगिरी 
१.जल्लोष रोषणाईचा
२. राजा अन प्रजा !
३.डबलबार !!
जुलै २०१२ चा महिना होता आणि नुकतेच एक मोठे रीलीज झाले होते त्यामुळे नुकतीच काळ्या पाण्यावरून सुटका झाल्यासारखे वाटत होते. त्यातच २०११ मध्ये आमचे युवराज अगदीच लहान असल्यामुळे फारसे कुठे जाणे (मुंबई - पुण्याच्या खेपा सोडल्या खेरीज) झाले नव्हते. त्यामुळे आता श्रमपरिहारासाठी कुठेतरी जावे असे वाटू लागले होते.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणांची भटकंती करताना दिसलेले बापांचे हे लोभसवाणे रूप. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मायबोलीकर आशुचँम्प याने दुर्ग गणेश मालिका सादर केल्याने किल्ल्यावरचे श्री गणेश येथे नाही देत. तुम्हीही तुम्हाला भेटलेले बाप्पा (शक्यतो महाराष्ट्रातील) येथे शेअर करा. 
=======================================================================
=======================================================================
श्री गिरीजात्मज (लेण्याद्री, जुन्नर)