Plagiarism of Images/Photos व त्याविरोधात आपण काय करू शकतो?

Submitted by बस्के on 27 September, 2012 - 15:17

आजकाल फेसबुकवर फिरताना कुठल्या कुठल्या अ‍ॅक्ट्रेस्/अ‍ॅक्टर्सचा फॅनक्लब, किंवा मी मराठी अभिमान गर्व, किंवा गडकिल्ले किंवा काय वाट्टेल ते नाव असलेल्या फॅनपेजवर गणपतीचा फोटो सापडतो. गणेशोत्सव चालूच आहे त्यामुळे सगळीकडे लोकांना बेस्ट गणपतीचा फोटो टाकायची इच्छा असतेच.. लोकं आपले टाकतात कुठून तरी ढापून. पण आपण मायबोलीकर हुश्शार! लगेच कळते तो फोटो कोणाचा? आपल्या मायबोलीचा द ग्रेट फोटोग्राफर 'बित्तुबंगा' उर्फ अभिजित धर्माधिकारी याचा हा फोटो इतक्या ठिकाणी फिरला आहे की त्या सगळ्याची रॉयल्टी जर त्याला मिळती तर तो millionaire होईल एव्हाना!! Happy (जिकडे तिकडे हा फोटो विदाऊट क्रेडीट दिसेल तिथे मी व अजुनही फ्रेंड्स कमेंट्स टाकतो, पण लोकं निर्लज्ज असतात! एका महाशयाने सुनावले की 'मग फोटोग्राफरने तो फोटो असा ओपनली वेबसाईटवर का टाकलाय?! (टाकला म्हणजे ढापायचा का?? Angry )

कॉपीस्केप.कॉम जसे तुम्ही टाकलेल्या मजकुरावरून तो मजकुर अजुन कुठे वापरला आहे हे सांगते तसे गुगलवर फोटो टाकून सर्च करता यायला हवे असे मला फार काळ वाटत होते.
काल अचानक फोटोग्राफी प्लॅगिआरिझ्म बद्दल शोधताना सापडले. http://images.google.com/ वर तो पर्याय आहे उपलब्ध! (कधीपासून कोण जाणे.)
गुगल इमेजेसला गेले, की त्या बॉक्समध्ये कॅमेर्‍याचा आयकॉन येतो. त्यावर क्लीक केले की तुम्ही एकतर ब्लॉग/वेबसाईटवरील इमेजचा पत्ता(इमेज युआरएल) देऊ शकता किंवा आपल्या कंप्युटरवरून इमेज अपलोड करू शकता. असे केल्यावर गुगल विविध सर्च रिझल्ट्स दाखवते. त्यात 'व्हिज्युअली सिमिलर इमेजेस' असा ऑप्शन आहे. त्यात तुम्हाला कळेल किती लोकांनी तुमचा फोटो ढापला आहे. Sad

वर दिलेला बित्तुचा फोटो किती लोकांनी ढापला आहे ते बघा(च)!! http://goo.gl/ZN4Uq

आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन निषेध नोंदवणे यापलिकडे काय/काही करू शकतो का? इतके सुंदर फोटो काढणार्‍याला क्रेडीट मिळालेच पाहीजे असं मनापासून वाटते. कुठलाच कायदा, काहीच संरक्षण नाही का आपल्यापाशी? लोकं स्वतःच्या वेबसाईववर डाउनलोड करायला ठेवत आहेत तो फोटो, कोणी बित्तूने काढलेला पोर्ट्रेट फोटो ग्रीक, तुर्की वेबसाईटवर टाकलाय.

बित्तुबंगाचा फोटो एक उदाहरण म्हणून घेतले आहे. तुम्ही गुगलची ती लिंक वापरून चेक करू शकता आपले फोटोज सुरक्षित आहेत ना? एकंदरीतच कसा आळा बसायचा याला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Oh! Tyacha aahe hoy ha photo!
2 mahinyanpurvee jaagune kaadhalela ek photo asach eka pagevar sapaDala mala.
Tila kaLavale, tine pathpurava kela hota.meehee tya pagevar aaNi malakala tase sangitale pan kahee uttar aale nahee! Sad

बस्के....

आर्टिकल्सची चोरी आणि फोटोंची चोरी.... ??? Angry

ती लिंक बघितली... किती लोकांनी तो बित्तु ने काढलेला फोटो ढापलाय... बाप रे!!!! Uhoh

गुगल इमेज सर्च बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्स Happy

हा बित्तुचा फोटो आहे , कसला भारी काढलायस यार , इथे का टाकला नव्हता , की मीच मिस केला ?
बादवे त्या सिमिलर सर्च मध्ये शारुक खान कतरिनाची पप्पी घेताना दिसतो Proud

Sad

एका महाशयाने सुनावले की 'मग फोटोग्राफरने तो फोटो असा ओपनली वेबसाईटवर का टाकलाय?>>> त्यासाठी करावे लागणारे कष्ट माहिती नसतात. त्याना वाटत केल क्लिक कॅमेर्‍यात की येतो चांगला फोटो.
त्याने विचारलेल्या प्रश्नावर खर तर उत्तर म्हणुन एक कोल्हापुरी शिवीच येवु शकते...

असो.
माझ्या मते फोटोचं रिजॉल्युशन कमी केल तर प्रिन्ट नाही काढता येणार.
फोटो डाउनलोड करुन लोक सोफ्ट कॉपी युज करतील पण त्याना प्रिन्ट क्वालिटी चांगली येणार नाही एवढच एक समाधान.
आता फेबु वै वर दुसर्‍याने काढलेले फोटु ढापुन तिसर्‍यांवर इम्प्रेशन मारणार्‍याची कीव येते दुसरं काय.

एक उदाहरण सांगतो.
मी त्यावेळी नवीन्च कॅमेरा असल्याने सगळ्याचे फोटु काढत सुटायचो.
जास्त सेटिन्ग माहिती नव्हते आणि लक्षातही रहायच नाही कधी कधी.
एकदा नशीबाने जोतिबाच्या (आमच्या कुलदैवताच्या) मंदिरात देवाचा फोटो काढायचा चान्स मिळाला.
मी फोटो काढला. चांगला आला होता. पण त्याच्या आधी मी इमेज साइजचे सेटिन्ग मी व्ही जी ए केलेल. ते तसच राहिलेलं.
ते मला खुप नंतर कळाल.
मी फोटो अपलोड केले. पिकासावर.
एका महाशयाने तो फोटो डाउनलोड करुन त्याची प्रिन्ट घेवुन पाहिली होती.
अर्थात व्हीजीए वर काढलेल्या फोटोची प्रिन्ट नीट आली नाही.
मग त्याने मला मेल केला होता ह्याचा ओरिजिनल फोटो हवाय त्यासाठी मी पैसे द्यायला तयार आहे म्हणुन.
फुकटमध्ये प्रिन्ट नीट नाही आली म्हणुन मेल. Proud

आपले माबोकर मात्र ह्याबाबतीत खुपच सौजन्यशील आहेत.
लालुला सेम फोटो आवडलेला. तिने मला विचारल होत हाच फोटो मोठ्या आकारात तुझ्याकडे आहे का?
असेल तर देशील का? अर्थात माझ्याकडेच व्हीजीए साइजचा फोटो असल्याने मी तिला मोठा फोटो नाही देउ शकलो. Sad

गुगल इमेज सर्चच्या माहितीबद्दल थॅन्क्यु Happy

मी काढलेला मिसळपावचा एक फोटु मटाच्या एका पुरवणीत छापलेला. Sad
न्युज पेपर्स तर लयी मोठे ढापु आहेत इमेजेसचे.

या गणपतीच्या चित्रावर वॉटर मार्क आहे, तो कुणाचा आहे?

समजा, आज एखाद्याने फोटो काढला , नेटवर चार लोकानी तो कॉपी केला. आता पहिल्या माणसाने सिद्ध कसे करावे की त्याचाच फोटो पहिला आहे, त्यानेच तो क्यामेर्यावर काढला आहे ते?
डिगिटल क्यामेर्‍यात कुठलाही फोटो कॉपी पेस्ट , डिलिट करता येतोच ना? मी दुसर्‍या माणसाला कसे म्हणणार की तू हा फोटो काढलेला नाहीस , म्हणून?

फोटो काढला, काम्युटरात कॉपी केला की नंतर क्यामेरातून तो डिलिटच करतात ना?

बस्के, माहितीसाठी धन्यवाद.

कॉपीस्केप आणि गूगलच्या या पर्यायाबद्दल माहित नव्हते

अभिजीतने काढलेला हा फोटो तर फेसबुक वर दिमाखात मिरवला जातोय.

पण चोरी ती चोरीच. ज्याने फोटो काढला असेल, त्याचे श्रेय त्याला आणि फक्त त्यालाच मिळायला हवे.

- पिंगू

जरी फोटॉ कॅमेर्‍यातून डिलीट केला तरी त्याचे सगळे डिटेल्स फोटो बरोबरच असतात... फोटो कुठल्या कॅमेर्‍यातून काढलेला आहे.. त्याचे बाकीचे सेटींग्स डिटेल सगळे स्टोअर होते.. त्यामुळे मूळ फोटो कोणी काढला आहे ते कळतेच कळते.

एक-दुसर्‍याने जर असे केले तर तक्रार करून दाद मागू शकतो, पण जेव्हा अनेकांनी तसे केले तर कोणा-कोणाची तक्रार करणार? आपला फोटो/लेख इतक्या लोकांना आवडला यात आनंद मानून गप्प बसावे झाल्ं! Happy क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सनुसार फोटो/लेख डिस्ट्रिब्यूट करू शकतो, पण फोटोची मोडतोड, व्यावसायिक उपयोग करू शकत नाही. सद्यस्थितीत आपण जर फोटो पब्लिकली पोस्ट केला तर तो आज ना उद्या इतरत्र विनापरवानगी पोस्ट्/शेअर होणारच अशी मानसिक तयारी करूनच फोटो/लेख पोस्ट/शेअर केले तर त्रास कमी होतो.

डिजिटल क्रांतीमुळे आणि सोशल मिडीया साईट्सच्या वाढत्या रेट्यापुढे पूर्वीचे सर्व नियम्/कायदे एक तर शिथिल होत जातील; किंवा काळानुरूप नवीन कायदे बनवले जातील.

माबो आयडी सेनापतीच्या कोणत्यातरी धाग्यावर ही चर्चा चांगली रंगल्याचे आठवते आहे.

या विषयाला पुन्हा वाचा फोडल्याबद्दल बस्केचे आभार!

मी अभिजीतच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो. जो पर्यंत व्यावसायीक वापर होत नाही तोपर्यंत लोकानी दिलेली दाद समजुन गप्प बसावे हेच उत्तम. नाहीतर इतक्या सार्‍या स्टॉक फोटो साईट्स आहेत तीथे आपले फोटो ठेवावेत म्हणजे वापराबद्दल पैसे मिळतील .अर्थात त्या लायकिचे फोटो असतील तरच;)
खर म्हणजे फ्लिकर /ब्लॉग वरची मंडळीना परवानगी मागितली तर बहुतेक वेळा सहज मिळते. मी अभिजीत /यो रॉक्स चे येक दोन फोटो पेंटींग रेफरन्स म्हणुन त्यांच्या परवानगीने वापरले आहेत. माझे काही फोटो वेबसाईट्सवर माझ्या परवानगीने वापरले गेलेत.

जो पर्यंत व्यावसायीक वापर होत नाही तोपर्यंत लोकानी दिलेली दाद समजुन गप्प बसावे हेच उत्तम. >>>
पाटील आधी मी ही असंच समजत होते.. पण दाद देणारी लोकं असती तर ओरिजिनल फोटोग्राफर कळल्यावर त्याचं क्रेडीट मान्य करतील. असं आगाऊ उत्तर देणार नाहीत.. Happy

बस्के ,

कॉपीस्केप आणि गूगलच्या या पर्यायाबद्दल च्या माहितीसाठी धन्यवाद.
बित्तू चा कूल प्रतिसाद आवडला..
पण बस्के शी ' ओरिजिनल फोटोग्राफर्'ला क्रेडिट देण्याबद्दल सहमत !!!

पेढ्या प्रत्येक फोटोसोबत त्याच फोटोचा युनिक आयडी तयार होतो.
त्यावरुन तर लगेच कळेल. शिवाय इतर माहिती असतेच. फोटो काढण्याची वेळ सेकंदापर्यंत अचुक असते.
कॅमेरा कोणता सेटिन्ग काय अशी सगळी माहिती फोटोसोबत सेव्ह होते.

बस्के माहितीबद्दल धन्यवाद.
स्वताची कलाकृती कोणी ढापल्यावर तळपायाची आग मस्तकात जात असेल.
या विषयावर बोलून बोलूनच प्रबोधन होइल. इथे मायबोलीवर सुद्धा कितीतरी लोकं कॉपीराइटचा भंग करणे हक्क समजतात. असो.
ही खालची लिंक पहा.
http://stevemccurry.wordpress.com/tag/copyright-violation/

http://www.exif.org/Exif2-2.PDF
EXIF chyaa Tags madhe मालक, कॉपीराईट, युनिक आय डी एम्बेडेड असते. ती ओव्हरराईट करता येते.
इंटरनेटवर आपण जेपेग फाईल वापरतो , ओरिजिनल रॉ फाईल सांभाळुन ठेवली तर कदाचीत पुरावा म्हणुन कामाला एईल .

झकासराव,

>> कॅमेरा कोणता सेटिन्ग काय अशी सगळी माहिती फोटोसोबत सेव्ह होते.

म्हणजे jpg फायलीत ही माहीती साठवलेली असते? तसं असेल तर jpg editor वापरून ही माहीती पुसणे शक्य आहे. Sad

आ.न.,
-गा.पै.

जोपर्यंत स्क्रीनवर दिसणारी इमेज, कॉपी पेस्ट करता येतेय, तोपर्यंत या चोरीला आळा बसेल असे मला वाटत नाही. आजकाल मायबोलीवर पण अमक्याच्या परवानगीने, आणखी तिसर्‍याचाच लेख पोस्ट केला जातोय. माझ्या बाबतीत माझे जूने लेखच, मलाच इमेलने येत असत.

वॉटरमार्काचाही तसा उपयोग होत नाहीच कारण लोक त्याच्यासकट कॉपी करतात, त्यामूळे जोपर्यंत फोटो कॉपी करणे अशक्य व्हावे, असे सॉफ्टवेअर येत नाही, तोपर्यंत याला आळा बसणे कठीण आहे.

अगदी वैयक्तीक मत सांगायचे, तर मी माझ्या नेटवर टाकलेल्या सर्वच फोटोंबद्दल आणि लेखांबद्दल, निरीच्छ् आहे. ( मी कधीही वॉटरमार्कही टाकत नाही.) फोटो निसर्गातला असला काय किंवा मी केलेल्या पदार्थाचा असला काय, त्यात मी स्वतः फार काही केलेय, असे मला कधी वाटत नाही, आणि तो एकदा पोस्ट केला, की मला त्याबद्दल विरक्ती येते.
नेटवर पोस्ट केलेले सर्वच, सार्वजनिक मालमत्ता झाली, असे मी गृहितच धरतो. अगदी खास आणि खाजगी फोटो, केवळ विश्वसनीय मित्रमैत्रिणींनाच पाठवतो.

सर्वांना हे मत पटावे, असा अजिबात आग्रह नाही.

इंटरनेटवर आपण जेपेग फाईल वापरतो , ओरिजिनल रॉ फाईल सांभाळुन ठेवली तर कदाचीत पुरावा म्हणुन कामाला एईल .

हेच तर. म्हणूनच मी तो प्रश्न विचारला होता. फाइल जे पी जी करुन रिनेम केली आणि सेव केली की क्यामेर्‍यातील नंबर, वेळ वगैरे सगळे पुसले जाईल ना?

बित्तु यांचा तो फोटो मी कॉपी केला.

जे पी जी करुन सेव केला. त्याला रिनेम करुन जी ( किंवा कोणतेही ) नाव दिले.

राइट क्लिक करून प्रॉपर्टी चेक केल्या.

त्यात कॉपी राइट मध्ये त्यांचे नाव आहे.

1.jpg

पण त्याखाली remove properties and personal information असाही ऑप्शन आहे. तो वापरून त्यांचे नाव घालवले.

2.jpg

त्यात कॉपी राइट ओनर म्हणून माझे नाव घातले.

3.jpg

क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सनुसार फोटो/लेख डिस्ट्रिब्यूट >>
जर फोटो नेटवर देताना क्रीएटिव्ह कॉमन लायसेन्स नुसार डिस्ट्रीब्युशन असे लिहिले असेल तर कोणालाही तो डिस्ट्रिब्युट करता येतो. फक्त पैसे कमावण्यासाठी वापरता येत नाही.
पण जर कॉपिराईट्स प्रोटेक्टेड ठेवले असतील तर मात्र कुठेही फोटो / लेख / चित्र वापरण्याआधी परवानगी घ्यावीच लागते. मी आधीही 'सेनापती' च्या धाग्यावर कॉपिस्केप आणि इमेज शोधणार्‍या वेबसाईटबद्दल वगैरे लिहीले होते. कॉपीस्केपने लेख शोधता येतो.
tineye.com या वेवसाईट वरुन सिमिलर इमेजेस कुठे वापरल्या आहेत का हे शोधता येते. याच वेबसाईटवर शोधुन माबोवर अजुन एक दोन जणांचे फोटो शोधले आहेत.

कोणी परवानगी घेत नाहीत, कोणा कोणाला बोलणार हे खरे असले तरी त्याविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय, सारखे सांगितल्याशिवाय बदल होणारच नाही. हतबल होऊन आनंद मानत राहिलो तर असे करणे 'हि चोरी आहे' हेच कुणाला लक्षात येणार नाही.

विषेशतः जेव्हा इतर कलाकार लोक ( या केस मधे काही टिव्ही आर्टिस्ट) जेव्हा कॉपिराईटचा विचार न करता फोटो चिकटवतात तेव्हा कमाल वाटते. अशांनाही नक्कीच सांगायलाच हवे.

पेढा / इतर, जेपेग मधली माहिती काढता आली तरी खरोखर आपला फोटो असेल तर ते सिद्ध करण्यासाठी ओरिजिनल फाईल असतेच. आता या केस मधे काही नुकसान होत नसले तरी इतर केस मधे फोटोग्राफरने काढलेला फोटो एजन्सी विकत असेल आणि तो इतर कोणी शेअर केला तर त्याची एजन्सी केस करु शकते. ( असे एक उदा मी आधीच्या सेनापतीच्या धाग्यात दिले आहे. )

त्या धाग्याची लिंक
आंतरजालावर लिखाण चोरीला न जाऊ देणे बहुदा अशक्यच...

इमेजेस ना शेअर / एम्बेड करण्याचा ऑप्शन देता आला तर या प्रकाराला अटकाव होऊ शकेल का? उदा, यूट्यूबवरील व्हिडियोज तुम्ही लिंक देऊन, शेअर / एम्बेड करून वापरू शकता, त्याप्रमाणे.

ते व्हिडीओज पण डाऊनलोड करता येतात, flickr वर फोटो डाउन्लोड डिसेबल केले असले तरी डाउनलोड करता येतात. सगळ्यावर "जुगाड" असतो.

Pages