प्रकाशचित्रण

मुळशी - ताम्हिणी वर्षा-विहार_२९.०७.२०१२ (वेमा गटग पश्चात)

Submitted by अतुलनीय on 4 August, 2012 - 03:32

मागील रविवारी सकाळी वेमांबरोबर गटग संपन्न झाले. त्यानंतर दिवसभर आराम करायचा विचार होता. पण देव आणी दैवाच्या मनात तसे नसावे. माझ्या सर्व आते भावंडांचा मुळशी - ताम्हिणी येथे वर्षा-विहारासाठी जाण्याचा प्लॅन ठरला होता. मी गटग असल्याने तसेच काही कामे राहिली असल्याने सुरुवातीला मला यायला जमणार नाही असे सांगीतले होते. पण त्या लोकांना निघण्यास तसा उशीर झाला, तसेच इतके दिवस वाट पहायला लाऊन पावसाची रिम्-झीम सुरुवात झाली. त्यामूळे माझ्यासारख्या कट्टर निसर्गप्रेमीला घरी स्वस्थ कसे बसवले असते? त्यामुळे त्यांचा परत एकदा चाचपणी करण्यासाठी फोन आल्याबरोबर मी बायकोला आपण तिकडे जात आहोत असे सांगून टाकले.

पुरंदरची पुर्नभेट

Submitted by आशुचँप on 1 August, 2012 - 12:23

गेल्या आठवड्यात जिप्सीचा फोन आला पुरंदरला कसे जायचे विचारायला. तेव्हा माझा वेगळाच प्लॅन ठरत होता. पण ऐन वेळी बरेच बदल झाले आणि सरते शेवटी पुरंदरला जाण्याचा योग आला. वाटेत एकेठिकाणी मस्त चमचमीत मिसळ चापली आणि धुंद पावसाळी वातावरणात थेट गडावर गाड्या दामटल्या.
जिप्सीबरोबर जाण्याचा माझा हेतू होता त्याच्याकडून काही फोटोग्राफी टिप्स घेणे...पण का कोण झाले मी त्याची फोटोग्राफीची तंद्री मोडूच शकलो नाही. आख्ख्या ट्रेकमध्ये मी त्याला विचारलेला एकमेव प्रश्न म्हणजे...व्हाईट बॅलेन्स कुठला ठेवला आहेस रे एवढाच होता....:)

"हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स

Submitted by जिप्सी on 1 August, 2012 - 00:47

"हुस्न-ए-कश्मीर"च्या आजच्या भागात भेटु देऊया श्रीनगरमधील चश्मेशाही, निशात बाग, शालिमार बाग या सुप्रसिद्ध मुघल गार्डनला. आमच्या या भटकंतीत पहिला आणि शेवटचा असे दोन दिवस श्रीनगरसाठी राखुन ठेवले होते. दल सरोवर, चारचिनार, हरीपर्बत, सर्व मुघल बगिचे, हजरतबल मशिद, शंकराचार्य मंदिर, परीमहल हे सगळं व्यवस्थित पहावयाचे असेल तर कमीत कमी दिड ते दोन दिवस हाताशी असले पाहिजे. सर्व मुघल बगिच्याची प्रवेश फि दहा असुन प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंगसाठी २०-३० रूपये द्यावे लागते. सर्व मुघल बगिचे साधारण एकाच धाटणीचे वाटले पण प्रत्येकाचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे.

रेशमी....

Submitted by गिरिश सावंत on 27 July, 2012 - 06:21

पावसाळा म्हटला की..धबधबा ओघाने आलाच..
आमच्या फोंडा घाटातील हे सोंदर्य....रेशमी..लडीवाळु..

प्रचि १
IMG_8249 copy

प्रचि २

IMG_8329 copy

प्रचि ३

शब्दखुणा: 

विचित्र मश्रूम्स

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बागेत या विचित्र प्रकारच्या मश्रूम्स पहायला मिळाल्या. कोणाला यांचं नाव माहीती आहे का?

IMG-20120723-00878_small.jpgIMG-20120723-00879_small.jpg

प्रबळ ट्रबल

Submitted by मुरारी on 24 July, 2012 - 07:30

शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण