बाप्पांच्या गावाला जाऊया....

Submitted by जिप्सी on 22 September, 2012 - 00:01

महाराष्ट्रातील विविध ठिकाणांची भटकंती करताना दिसलेले बापांचे हे लोभसवाणे रूप. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मायबोलीकर आशुचँम्प याने दुर्ग गणेश मालिका सादर केल्याने किल्ल्यावरचे श्री गणेश येथे नाही देत. तुम्हीही तुम्हाला भेटलेले बाप्पा (शक्यतो महाराष्ट्रातील) येथे शेअर करा. Happy
=======================================================================
=======================================================================

श्री गिरीजात्मज (लेण्याद्री, जुन्नर)
श्री धुंडिविनायक (पाली, रायगड)
रेडीचा गणपती (रेडी, सिंधुदुर्ग)
श्री दशभुज लक्ष्मीगणेश (हेदवी, चिपळुण)
श्री सिद्धलक्ष्मी गणेश (जांभूळपाडा,रायगड)

जय गणेश मंदिर (मालवण, सिंधुदुर्ग)

पुई येथील एकवीस गणेश मंदिर (पाली, सुधागड)
आवळीच्या झाडातुन प्रकटलेला "आवळी गणेश" (पावस, रत्नागिरी)
कड्यावरचा श्री गणपती (आंजर्ले, दापोली)
अंबरनाथ येथील शिवमंदिरातील श्री गणेश (अंबरनाथ, ठाणे)
(गणेशगुळे, रत्नागिरी)
गणेशगुळे – गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते. अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते.
कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरातील श्री गणेश (कांदळगाव, मालवण)
गिर्ये येथील रामेश्वर मंदिरातील श्री गणेश (गिर्ये, विजयदुर्ग)
प्रवरेच्या काठावर पहुडलेले श्री गणेश (भंडारदरा, अ.नगर)
श्री अमृतेश्वर मंदिर पुष्करणी आणि प्रांगणातील श्री गणेश (भंडारदरा, अ.नगर)
शिवथरघळ येथील श्री गणेश
श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या निसर्गरम्य शिवथरघळ जवळील हा श्री गणेश.
आसुद गावातील श्री व्याघ्रेश्वर मंदिर परीसरातील श्री गणेश (आसुद, दापोली)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे.... जिप्सी, तू फोटो पोतडीतून काय काय बाहेर काढशील पत्ताच लागत नाही....

क्लीको भव .... Wink (आयुष्मान भव च्या चालीवर)

सह्ही गिरी,
मी लिहिणारच होतो कुणीतरी वाईच्या गणपतीचा फोटो टाका. Happy माझ्याकडे मंदिराचा आहे पण गणपतीचा नाही.

सुंदर धागा!!

मावळंगे हे गाव पावस पासुन ६-७ किमी अंतरावर आहे. तिथे एका आमराईत डागडुजी करताना एक गणेशमुर्ती सापडली. अतिशय शांत, रम्य आणि छोटेसेच मंदिर आहे. गावकरी मंडळी सोडुन विशेष कोणी येत नाही.

हे बाप्पा

हे मंदिर

हे तिथेच एका झाडाच्या खोडात प्रकटलेले बाप्पा