फोटोग्राफि

सुंदर ते ध्यान...

Submitted by अतुल ठाकुर on 20 January, 2014 - 11:19

गावी गेल्यावर पहिला कार्यक्रम असतो देवळात जाण्याचा. गाव असा दांड्यावर वसल्याप्रमाणे. मध्ये रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजुला घरे. पलिकडल्या घरांच्या रागेच्या मागे समुद्र. तर आमच्या घरांच्या मागे शेती. गाव रस्त्याबरोबर पुढे सरकत गेलेला. घराबाहेर पडलो आणि शेताकडच्या रस्त्याला लागलो. जाताना तळं लागलं. सारं गुलाबी कमळांनी आच्छादलेलं. पूर्वी यातुन मासे काढले जात. अजुनही काढले जात असावेत. माहीत नाही. पुढे खाडी. पावसाळ्यात तुडुंब पाणी भरतं. आता पुल केला आहे. जाताना काही जण सायकल वरुन जाताना दिसताहेत. ह्या भागाला अजुनही सुधारणेची फारशी झळ लागलेली नाही. आदिवासींची घरे आहेत.

शब्दखुणा: 

Plagiarism of Images/Photos व त्याविरोधात आपण काय करू शकतो?

Submitted by बस्के on 27 September, 2012 - 15:17

आजकाल फेसबुकवर फिरताना कुठल्या कुठल्या अ‍ॅक्ट्रेस्/अ‍ॅक्टर्सचा फॅनक्लब, किंवा मी मराठी अभिमान गर्व, किंवा गडकिल्ले किंवा काय वाट्टेल ते नाव असलेल्या फॅनपेजवर गणपतीचा फोटो सापडतो. गणेशोत्सव चालूच आहे त्यामुळे सगळीकडे लोकांना बेस्ट गणपतीचा फोटो टाकायची इच्छा असतेच.. लोकं आपले टाकतात कुठून तरी ढापून. पण आपण मायबोलीकर हुश्शार! लगेच कळते तो फोटो कोणाचा?

Subscribe to RSS - फोटोग्राफि