वाढदिवसाचे वर्णन काय करू....

Submitted by ASHOK BHEKE on 9 October, 2023 - 11:18

काल समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांचा वाढदिवस झाला. शेकडोने केक, शेकडो पूष्पगुच्छ हजारो माणसांची वर्दळ. सर्व क्षेत्र लोटले होते. कोणत्या पक्षाचा नेता, कार्यकर्ता नव्हता असे दिसले नाही. संस्था आल्या त्यांचे कार्यकर्ते होते. विभागातील सोसायटी प्रतिंनिधी यांची उपस्थिती होती. लहान होते आणि मोठे देखील होते. सारे पक्षभेद विसरून दिलीप वागस्कर यांच्या व्यक्तीगत स्ंनेहापोटी आवर्जून उपस्थिती दर्शवीत होते. या माणसाला ईश्वराने वरदान दिले आहे. जे आपल्याकडे आहे त्यातील काही भाग प्रेमाने त्यांच्यासाठी समर्पित करावा. काल ज्येष्ठ नागरिकांना घोंगडी तर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. गरजू माणसांना अपेक्षित मदत करीत चैतन्याची कारंजी फुलवीत सामाजिक भानाचे संचित घेऊन पूढे निघालेले खरेखुरे व्यक्तिमत्व म्हणून समाज आज त्यांच्याकडे आपूलकीने पाहत आहे.
दिलीप वागस्कर केवळ वाढदिवशीच काही वाटप करतात असे नव्हे तर वर्षभर त्यांच्याकडे सतत रिघ सुरू असते. कुणाला नाही म्हणणे नाही. येणारा कोण? कधी विचारणे नाही. सढळ हाताने मदत करणारा भायखळा विभागातील वल्ली म्हणून त्यांचे कौतुक तळागाळातील जनता करतेच शिवाय सामाजिक क्षेत्रात काम करणारे भलेभले त्यांच्या दातृत्वाचा झरा नियमित वाहू दे म्हणून ईश्वराला साकडे घालीत असतात.
पैसा अनेकजण कमवित असतात. जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करो हा दातृत्वाचा मंत्र जोपासणारी ही वल्ली श्रेयासाठी कधी अपेक्षा करीत नाही. केलेल्या उपकाराचे विस्मरण हे दातृत्वाचे मोठे लक्षण त्यांनी जोपासले आहे. काल काय केले, कुणासाठी केले. हे विसरून उद्यासाठी विचार करणारी माणसं क्वचितच. दिलीप वागस्कर एकमेव आहेत. पडद्याआड राहणे पसंत करतात. दिलीपचा उल्लेख बहुतांशी मित्र असो वा नागरिक, अरे तुरे करताना दिसतात. केवळ मायेपोटी. त्यांच्या डोळ्यात माणूस म्हणून प्रतिमा दिसून येते. तो सर्वार्थाने लोकसेवेसाठी झटत असतो. त्याला आपला माणूस म्हणून अरेतुरे बोलण्याचा अधिकार दिला आहे. काल शेकडो केक आले. काहींनी त्यावर उल्लेख करताना दिलीप केला होता तर काहींनी दादा, भाऊ, काका, भाई अनेक विशेषणे तेथे दिसून आली. काल समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांचा वाढदिवस झाला. शेकडोने केक, शेकडो पूष्पगुच्छ हजारो माणसांची वर्दळ. सर्व क्षेत्र लोटले होते. कोणत्या पक्षाचा नेता, कार्यकर्ता नव्हता असे दिसले नाही. संस्था आल्या त्यांचे कार्यकर्ते होते. विभागातील सोसायटी प्रतिंनिधी यांची उपस्थिती होती. लहान होते आणि मोठे देखील होते. सारे पक्षभेद विसरून दिलीप वागस्कर यांच्या व्यक्तीगत स्ंनेहापोटी आवर्जून उपस्थिती दर्शवीत होते. या माणसाला ईश्वराने वरदान दिले आहे. जे आपल्याकडे आहे त्यातील काही भाग प्रेमाने त्यांच्यासाठी समर्पित करावा. काल ज्येष्ठ नागरिकांना घोंगडी तर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. गरजू माणसांना अपेक्षित मदत करीत चैतन्याची कारंजी फुलवीत सामाजिक भानाचे संचित घेऊन पूढे निघालेले खरेखुरे व्यक्तिमत्व म्हणून समाज आज त्यांच्याकडे आपूलकीने पाहत आहे.
दिलीप वागस्कर केवळ वाढदिवशीच काही वाटप करतात असे नव्हे तर वर्षभर त्यांच्याकडे सतत रिघ सुरू असते. कुणाला नाही म्हणणे नाही. येणारा कोण? कधी विचारणे नाही. सढळ हाताने मदत करणारा भायखळा विभागातील वल्ली म्हणून त्यांचे कौतुक तळागाळातील जनता करतेच शिवाय सामाजिक क्षेत्रात काम करणारे भलेभले त्यांच्या दातृत्वाचा झरा नियमित वाहू दे म्हणून ईश्वराला साकडे घालीत असतात.
पैसा अनेकजण कमवित असतात. जोडूनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करो हा दातृत्वाचा मंत्र जोपासणारी ही वल्ली श्रेयासाठी कधी अपेक्षा करीत नाही. केलेल्या उपकाराचे विस्मरण हे दातृत्वाचे मोठे लक्षण त्यांनी जोपासले आहे. काल काय केले, कुणासाठी केले. हे विसरून उद्यासाठी विचार करणारी माणसं क्वचितच. दिलीप वागस्कर एकमेव आहेत. पडद्याआड राहणे पसंत करतात. दिलीपचा उल्लेख बहुतांशी मित्र असो वा नागरिक, अरे तुरे करताना दिसतात. केवळ मायेपोटी. त्यांच्या डोळ्यात माणूस म्हणून प्रतिमा दिसून येते. तो सर्वार्थाने लोकसेवेसाठी झटत असतो. त्याला आपला माणूस म्हणून अरेतुरे बोलण्याचा अधिकार दिला आहे. काल शेकडो केक आले. काहींनी त्यावर उल्लेख करताना दिलीप केला होता तर काहींनी दादा, भाऊ, काका, भाई अनेक विशेषणे तेथे दिसून आली.
साहेब म्हणजे जिंव की प्राण. याची मोजपट्टी साहेबांनी केली तरी त्यांना मोजता येणार नाही. कार्यकर्ते अनेक असतात पण दिलीप वागस्कर सारखे मौल्यवान रत्न साहेबांच्या गळ्यात असताना साहेब वेळेवर येणार, अशी समजूत सर्वसामान्य करीत होते. हजारो माणसांची वर्दळ होती. साडेआठ झाले होते. केक कापायचा होता. पण साहेब येणार मगच केक कापणार, असे दिलीपने सांगितल्यावर मात्र उपस्थितांची गोची झाली होती. कारण साहेबांना यायला किमान दिडतास लागणार होता. उपस्थितात सर्वच पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. आनंदाचा दीस होता. पण दिलीपचा चेहरा चिंताग्रस्त होता. काळवंडला होता. गर्दी वाढली होती. आजकाल ज्येष्ठ ९ वाजेपर्यंत घराबाहेर थांबतात. त्यांची औषधे वेळेवर घ्यावी डॉक्टरांची तंबी असते त्याप्रमाणे मुलेसुना देखील तेव्हढाच कुटुंबप्रमुखांना बोलण्याचा अधिकार जबाबदारीने पार पाडतात. पण आमच्या दिलीपच्या हृदयात साहेब श्रीराम म्हणून वसले आहेत. दिलीप हा दक्षिणमुखी हनुमान म्हणून त्यांचाच विचार सदैव करीत असतो. शेवटी भक्तांच्या सोहळ्याला देवांनी वेळेवर प्रकट व्हायला हवे होते. पण देवाला देखील अनेक भक्त असतात. एकाच वेळी अनेक ठिकाणी आधुनिक देवांना प्रकट होता येत नाही. हे आपण समजू शकतो. पण या प्रिय भक्ताला कोण सांगणार....? साहेबांनी देखील असे भक्त हवे असतील तर त्यांचे वेळापत्रक जरा बाजूला ठेवले पाहिजे. कसाबसा केक कापण्याचा कार्यक्रम झाला. केक भरवाभरवी झाली. शेकडो हवाई फुगे आकाशाकडे मार्गस्थ झाले. फटाक्याची आतषबाजी झाली. ऊंचीपेक्षा मोठा वजनदार पूष्पगुच्छ खास सहकार्‍याने आणला होता. पुष्पगुच्छ देणेघेणे सुरू झाले.
शेवटी गर्दी ओसरली आणि अर्ध्यातासात साहेबांच्या गाड्या सायरण वाजवित आल्या. काळवंडल्या चेहर्‍यावर तेजी आली. प्रसन्न चेहरा घेऊन दिलीप वागस्कर गाड्यांकडे धावले. पायाला स्पर्श करीत दक्षिणमुखी हनुमंताने दर्शन घेतले. पुन्हा विश्वमंगल सोसायटीचे प्रांगण गर्दीने फुलले. साहेबांनी देखील ध्वनीक्षेपक हातात घेऊन आपल्या सुमधुर आवाजात बार बार दिन ए आये... गीत गायले. जियो हजारो साल असे शुभर्शिवाद दिले. उपस्थितांनी टाळ्या वाजवित दाद दिली.
वाढदिवस अनेक होत असतात. काही स्वानंदासाठी असतात तर समाधानासाठी असतात. काहीजन उगीचच शक्तिप्रदर्शनासाठी वाढदिवसचा दिवस निवडतात. पण दिलीप वागस्कर यांचा वाढदिवस म्हणजे लोकानंदासाठी मेजवानी देणारा असतो.

अशोक भेके
घोडपदेव समूह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
शाल देण्यापेक्षा घोंगडी जास्त उपयुक्त

धन्यवाद मित्रांनो
आपला प्रतिसाद लाखमोलाचा

नावात काय आहे..... साहेब हा साहेबच