मैत्रिणीचा वाढदिवस: अशोक भेके

Submitted by ASHOK BHEKE on 14 December, 2023 - 00:16

*मैत्रिणीचा वाढदिवस*

जास्वंदीचा वाढदिवस होता. सकाळी सकाळी सजली होती. नवीन ड्रेस तिच्यावर उठून दिसत होता. मध्यम अंगाची, उंचीणे बर्‍यापैकी, गोरीपान, हसर्‍या डोळ्याची, भडक ड्रेस मध्ये अप्सरा वाटणारी... नवर्‍याने रात्रीच बाराचा ठोका झाल्याबरोबर तिला शुभेच्छा दिल्या होत्या. नवीन ड्रेस भेट म्हणून दिला. आनंदी चेहर्‍याने तिने स्वीकारला होता. तीने मैत्रिणींना अगोदरच संगितले होते. मित्रांना नको म्हणून तीने सांगितले नाही. मैत्रिणी आल्यातर घरात जागा उरणार नाही. त्यामुळे मित्रांना सांगण्याचे टाळले. मैत्रिणी मैत्रिणी पूष्कळ दिवस झाले आपण एकत्र आलो नाहीत. आता दिवाळी सुट्टी देखील आहे. कमल,जाई, जुई, फुलवंती, मंजिरी, लिली आदि मैत्रिणी तयार झाल्या. एकत्र आल्या आणि तिच्या घरी गेल्या. सोबत केक होता. औपचारिक गप्पा सुरू झाल्या.
कोण काय काय करतंय...
यावर खल झाल्यावर अचानक आपला तो गं....
आपल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसायचा तो गं...
काय गं नांव त्याचं...
बघ पाहिलं आताच आठवत नाही.
हा हा तो ना.. एकाच वर्गात तो दोन वर्षे होता. अखेर तिसर्‍या वर्षी त्याला प्रमोट केले. नाही गं...
अगं तो शाळा सुटल्यावर सायकल चालवायचा.
हा हा तोच. त्याचे नांव... मला आठवू दे गं जरा. माझ्या लक्षात आलंय.
आता तो विषय बाजूला राहू दे. पहिला आपण केक कापून घेऊ या...
दिलखुलास गप्पा झाल्यावर. आलेल्या मैत्रिणी खवय्या कंपू होत्या. तीने मैत्रिणींना आवडेल अशी मासोळी बाजारातून आणली होती. नवर्‍याच्या ताब्यात किचन देऊन ती गप्पात सामील झाली होती. स्वयंपाकघरातून खमंग स्वाद नाकात घुमत होता. बाहेर एक बोकोबा येरझार्‍या मारीत होते. चवताळले होते. म्यांव म्यांव करीत होते. सोबत मैत्रिणींची वासाने जीभखवळू लागली होती. सुरमई, बांगडे तळत होते. तरीही त्या वासाने लिलीने म्हटले अगं प्यायची व्यवस्था काही केली आहे की नाही.
काहीतरीच काय. माझा नवरा काय म्हणेल...
मग जाऊ दे. पण सुरमई बरोबर हवं होतं गं...
नको गं.. काहीतरीच तुझं. आता पूरे झालं. मला चक्रीवादळात सोडते की काय.. जास्वंदी ने सरळ ना चा पाढा गुणगुणला. ऐकून लिली हिरमुसली.
जुईने तिच्या नाराजीवर तोडगा सुचविला. अगं आपण पिकनिकला जाऊ ना.. तेव्हा थोडी थोडी घेऊ. लिली खुश. पुन्हा गप्पा रंगल्या.
स्वयंपाक घराकडे जास्वंदी हळूच नजर तिकडे टाकत होती. अधून मधून ती गप्पा सोडून नवर्‍याच्या मदतीला जात होती. स्वयंपाक होत आला होता. नवर्‍याने डायनिंग टेबलवर मांडामांड सुरू केली होती. तेव्हा तीने आवाज दिला. जेवण तयार झाले आहे. मैत्रिणी सर्व सज्ज झाल्या. पण पहिला आपण केक कापून घेऊ म्हणजे निवांत जेवण करू...
हो ना.. पहिला केक कापून घेऊ. सर्वांनी सुर आळवला. केक मांडण्यात आला. नवर्‍याने देखील एक केक आणला होता. दोन केक टेबलवर ठेवण्यात आले. जास्वंदीने एक सूरी हातात घेऊन त्या केकचा कापताना हॅप्पी बर्थडे टू जास्वंदी अगदी सुरात गायले. जास्वंदीने एक तुकडा हातात घेत शेजारी उभ्या असलेल्या कमलच्या तोंडात भरविला. मैत्रिणींनी पूढे होत एकेक तुकडा काढत जास्वंदीच्या तोंडात भरविला. पण जेव्हा फुलवंती जवळ आली. तिने केक हातात घेतला. तिच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते. पण कुणाच्या लक्षात येत नव्हते. फुलवंतीने केक जास्वंदीच्या तोंडपूढे नेला पण तोंडात न भरविता तिच्या लालबुंद चेहर्‍यावर फासला.गुलाबी रंगाच्या केकमुळे जास्वंदी गुलाबी झाली होती. अचानक हल्ला झाला होता जास्वंदीवर. तरीही तीने आनंदाने या हल्ल्याला सामोरी गेली होती. केक फासण्याचे दृश्य जास्वंदीच्या मुलाने असे टिपले की त्याचे त्याला हसू आवरेना. शेवटी ही मस्ती तर होणारच. केक भरवाभरवी संपली. सर्वच किचनसमोरच्या डायनिंग टेबलवर झेपावले. सुरमई बांगडे सजून तयार होते. मैत्रिणींच्या नाकपूडया खालीवर होऊ लागल्या होत्या. तोंडातून लाळ गळते की काय, या हेतूने हातातला रुमाल सारखा तोंडावर जात होता. डायनिंग टेबल पूरेसा नाही म्हणून काहीजणी सोफ्यावर हातात ताट घेऊन बसल्या. जेवण सुरू झाले आणि मंजिरीच्या घश्यामध्ये बांगड्याचा काटा अडकला. मंजिरी ओरडली. काटा अडकला गं.. मैत्रिणीने तिच्या पाठीत हळूच बुकयाने ठोकून पाहिले. अखेर मंजिरीने घश्यात बोट घालून काटा काढला. पण तोवर तिच्या चेहरा घामाने थपथपला होता. कसाबसा तो काटा तीनेच बाहेर काढला. सुटका करून घेतली. बांगडा नकोच, तिने सुरमईला पसंती दिली. सर्वांची जेवणे झाली. तसे घरचे विचार मनात घोळू लागले. आता निघायला हवे... म्हणून सर्वांनी जास्वंदीचा निरोप घेतला. जास्वंदी खुश झाली होती. आपल्या बालमैत्रिणी सोबत वाढदिवस साजरा केल्याचा आनंद काही केल्या तिच्या चेहर्‍यावर लपत नव्हता. नवर्‍याला थोडी मेहनत करायला लागली होती पण तिच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून त्याच्या चेहर्‍यावर आनंद दाखवत त्याने तिचे अगदी मनापसून वाढदिवस अभिष्टचिंतन केले होते.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा.
मला सुद्धा मैत्रिणींचे वाढदिवस लक्षात राहतात, पण हा दुर्मिळ गुण बायकोला बिल्कूल आवडत नाही.

सायकल चालवता का अजून? Wink

मैत्रिणींच्या नाकपूडया खालीवर होऊ लागल्या होत्या. तोंडातून लाळ गळते की काय, या हेतूने हातातला रुमाल सारखा तोंडावर जात होता.>> खुप पोटेन्शियल आहे या धाग्यात. शतकी प्रतिसाद येतील असे वाटले होते.
पुर्वीची माबो राहिली नाही हेच खरं..

मैत्रिणींची नावं छान आहेत.

पण तिच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहून त्याच्या चेहर्‍यावर आनंद दाखवत त्याने तिचे अगदी मनापसून वाढदिवस अभिष्टचिंतन केले >> आणि तो म्हणाला, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको" (हे तुमचाच दुसरा वरती काढलेला धागा बघून सुचले गंमत म्हणून Wink . वाढदिवस हा तीन धाग्यांमध्ये एक समान धागा म्हणून आढळला हे एक विशेष निरीक्षण नोंदवतो. )

छान

आजच आमच्याकडे मजेशीर घटना घडली.
आज बायकोच्या मैत्रीणीचा वाढदिवस होता.
आमच्या घरी येणेजाने असल्याने माझ्याकडे सुद्धा तिचा whatsapp नंबर आहे.

तर बायकोने मला आठवडाभर आधीच सांगितले होते की तिचा या या तारखेला वाढदिवस आहे तर तू मला आठवण करून दे. गेल्या वर्षी मी विसरलेले तर तिला राग आलेला.

मी बरे म्हटले आणि आज सकाळी उठल्या उठल्या मीच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बायकोला ना सांगता.. ते देखील छान इमोजीमधील केक आणि बदाम टाकून..

तासाभराने तिचा बायकोला फोन...
तुझ्या नवऱ्याने शुभेच्छा दिल्या आणि तू कसला मुहूर्त बघत आहेस. त्याच्या लक्षात आहे. पण तू विसरलीस बघ Proud

धन्यवाद मित्रांनो
आपला प्रतिसाद लाखमोलाचा >>> हाच प्रतिसाद सर्वच कथांवर एकाच वेळी दिल्याने त्या मायबोलीच्या पहिल्या पानावर तरंगू लागल्या आणि मायबोलीचे पहिले पान अशोक भेकेमय होऊन गेले. सर्वच भेकेसाहित्य वर आले तरी त्याने मायबोली एकदशांगुळे देखील व्यापली नाही. तरी भेकेसरांनी मनावर घेऊन आणखी साहित्य प्रसवावे आणि आधीचे साहीत्य व नवे साहीत्य असे मिळून त्यावर एकाच वेळी धन्यवाद मित्रांनो, आपला प्रतिसाद लाखमोलाचा हा प्रतिसाद देऊन वर आणावे. मायबोलीची भेकेबोली होईल तोच सुदिन !