...... मी एकटा ......

Submitted by मिलिंद महांगडे on 6 May, 2012 - 14:57

http://cdn.gamerant.com/wp-content/uploads/Limbo-Review.jpg

उधाणलेला समुद्र
रोरावता वारा
लाटांचे तांडव चाले
अन प्रतिकूल आसमंत सारा

दिशांचे ढळले तारे
घोंघावती वडवानल रौद्र
उदरी तयास घेण्या
आसुसला हा समुद्र

कडाडली विद्युल्लता
लख्खं प्रकाश चोहीकडे
पाठोपाठ ऐकू येती
नभांचे चौघडे

विरत चालला हा
दिपगृहाचा प्रकाश
अंधारून आले
निळेभोर आकाश

नाव डळमळे
शीडही तुटले
आप्तेष्ट म्हणविती असे
तेही मागे हटले

उरले न काही
ह्या वैराण आयुष्यात
आता मी एकटाच
आता मी एकटाच......

गुलमोहर: