Submitted by poojas on 6 May, 2012 - 10:52
रोज सकाळी रोजच्याच त्या वाटेवरुनी जाताना..
गर्दीमधले कित्येक चेहरे येता जाता पाहताना..
दिसली होती शाळेमधल्या गणावेशातील चार मुले..
भाषा त्यांची दुर्मिळ अवघी शब्दांनाही जी ना कळे..
चेहर्यावरती हसरे भाव.. उसंत नाही हातांना..
हृदयामधली शब्द-संपदा कळली होती बोटांना..
नजरे मधूनी सांधत होती संवादाचा सेतू जणू..
अबोल वाणी वदते - हसते.. या सार्याला काय म्हणू..
मला त्या क्षणी इतुके कळले.. कशास शब्दांची चाकरी..
भाषेमधले पंडीत आम्ही.. भावना तरी शून्य उरी..
धडधाकट मी.. अगाध वाचा.. तरी बोलूनी सुके गळा..
मी तर पंगू.. माझ्याहूनही सूज्ञ मुक्यांची ती शाळा..!!!
गुलमोहर:
शेअर करा
शब्दांविना बोलके व शब्दांसह
शब्दांविना बोलके व शब्दांसह मुके यांमधील दरी उत्तम साकारली आहे.
कविता खूप आवडली .
कविता खूप आवडली .
मी तर पंगू.. माझ्याहूनही
मी तर पंगू.. माझ्याहूनही सूज्ञ मुक्यांची ती शाळा..!!!>>>>
आम्ही सुद्धा...पंगू.
छान लिहिलिय.
आवडली !
आवडली !
मस्त
मस्त
खरच छान ! शब्दांविना बोलके व
खरच छान !
शब्दांविना बोलके व शब्दांसह मुके यांमधील दरी उत्तम साकारली आहे. >> +१