Submitted by सुप्रिया जाधव. on 6 May, 2012 - 11:51
.
हो!
त्रास होतोय मला...
तुझ्या नसण्याचा....
नाही, नाहीच सुचतय गझल...
तू असताना....
शेर सुचायचे ...एका पठोपाठ एक...
तू नाही बोललास म्हणुन...१
तू नाही पाहिलस माझ्याकडे म्हणून ...१
पाहून न पाहिल्यासारख केलस म्हणून ...१
जाम रागावलायस म्हणून...१
नि राग गेल्याचा १.....
गझल पूर्ण !
आता कफ़िये...रदीफ़....
नुसते घोंघावतात अवती भवती...
पण ...पण...त्यांचा शेर कसा बनणार
कारण शेरात आत्मा जगावा लागतो न?...
तोच हरवलाय रे केव्हाचा...
हो!
त्रास होतोय मला...
तुझ्या नसण्याचा....
नाही, नाहीच सुचतय गझल...
ए ! ऐकशील एवढ?
माझ्यासाठी नको...
पण पण माझी गझल पूर्ण करण्यासाठी तरी येशील?
तुझ्यावाचून ती....नि तिच्यावाचून मी...
अपूर्ण आहोत रे अगदी...
(आगतिक)
-सुप्रिया.
गुलमोहर:
शेअर करा
अगतिकता अतिशय आर्त साकारलेली
अगतिकता अतिशय आर्त साकारलेली आहे.
सुप्रिया.. अगतिकता अतिशय आर्त
सुप्रिया.. अगतिकता अतिशय आर्त साकारलेली आहे.+१
......... नि:शब्द.......
......... नि:शब्द.......
सुप्रिया, आपल्या दु:खात सर्व
सुप्रिया,
आपल्या दु:खात सर्व मायबोलीकर सहभागी आहेत. हे संकट कोसळायला नको होते, मात्र दुर्दैव की ते कोसळले.
आता चिरंजिवांच्या आयुष्याच्या जडणघडणीकडे लक्ष द्याल हे तर आहेच, पण कविता ही एक अशी स्वर्गलोकीची बाब आहे की ती स्वतःला तुमच्या या संकटातून धारदारपणे व्यक्त करून घेत राहील. कविता आता संपली असे त्या दिवशी म्हणालात व मी त्यावर तुम्हाला म्हणालो की 'कविता आता खरी सुरू झाली आहे'.
कवितेत मनसोक्त डुंबा आणि मनावरची औदासीन्याची घट्ट आवरणे हळूहळू त्यात विरवायला सुरुवात करा अशी प्रार्थना
-'भूषण कटककर'!
वेल्कम बॅक
वेल्कम बॅक सुप्रियाजी..
भूषणजी +१
सुप्रियाजी बेफ़ि... +१
सुप्रियाजी
बेफ़ि... +१
सुप्रियाजी, बेफिकीर्जींच्या
सुप्रियाजी,
बेफिकीर्जींच्या वरील लिखानातून असं दिसतयं की आपल्यावर फार मोठ संकट आलं आहे.ईश्वर आपणास त्यातुन बाहेर पडण्याची शक्ति देवो,आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.
कवितेत मनसोक्त डुंबा आणि मनावरची औदासीन्याची घट्ट आवरणे हळूहळू त्यात विरवायला सुरुवात करा अशी प्रार्थना>>>>खरं आहे बेफींच म्हणनं.
सुप्रियाजी, आपली ''एक रक्ताची
सुप्रियाजी,
आपली ''एक रक्ताची ओघूळ''कविता आठवली आणि प्रतिसादाला आपण दिलेला अभिप्राय>>
...जगलेय ही कविता मी.....
आपण कणखर आहातच.
आर्तता पोहोचली लिहीत रहा !
आर्तता पोहोचली
लिहीत रहा !
आह्ह!! भावनांशी पूर्ण
आह्ह!!
भावनांशी पूर्ण सहमत..
सॅड बट ट्रू!!
सुप्रिया, काळजी घ्या. बेफ़ींना
सुप्रिया, काळजी घ्या.
बेफ़ींना सहमत.
आह्ह!! भावनांशी पूर्ण
आह्ह!!
भावनांशी पूर्ण सहमत..
सॅड बट ट्रू!!
>>
+१
बेफी मला अगदी हेच म्हणायचं होतं पण सुचत नव्हतं
सुप्रियाताई काळजी घे
सोबतीला आम्ही आहोतच
सुप्रिया जाधव यांच्या वेदनेची
सुप्रिया जाधव यांच्या वेदनेची नस अचूकपणे श्री.भूषण कटककर यानी आपल्या प्रतिसादात पकडली आहे, जवळपास सर्वच सदस्यांच्या भावना त्यानी तिथे प्रकट केल्या असल्याने मी त्यांनी तिथे व्यक्त केलेल्या प्रार्थनेस मी दुजोरा देतो.
पुनरागमनाचेही स्वागत आहे.
अशोक पाटील
खरच हळहळलो वाचुन... बर्याच
खरच हळहळलो वाचुन...
बर्याच दिवसात तुमची गझल आली नव्हती.. आज कारण कळलय...
बेफीजींशी २०००% सहमत...
अजुन काय बोलु...!!
नानुभाऊ
निशब्द
निशब्द
सुप्रियाजी नि:शब्द केलत.
सुप्रियाजी नि:शब्द केलत.
तुमच्या दु:खात आम्ही सहभागी
माबोवर येत रहा. आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर.
>>सुप्रिया जाधव यांच्या
>>सुप्रिया जाधव यांच्या वेदनेची नस अचूकपणे श्री.भूषण कटककर यानी आपल्या प्रतिसादात पकडली आहे, जवळपास सर्वच सदस्यांच्या भावना त्यानी तिथे प्रकट केल्या असल्याने मी त्यांनी तिथे व्यक्त केलेल्या प्रार्थनेस मी दुजोरा देतो.
अनुमोदन.
इथे येत रहा!
इथे येत रहा!
निशब्द तुमच्या दु:खात सहभागी
निशब्द
तुमच्या दु:खात सहभागी आहोत.
सुप्रियाजी, वेदनेत सर्वजण
सुप्रियाजी,
वेदनेत सर्वजण सहभागी आहोत. माबोवर येत रहा.
(No subject)
काय बोलू? समस्त मायबोलीकरांनी
काय बोलू?
समस्त मायबोलीकरांनी दिलेल्या भावनिक पाठबळाने परत उभी रहाण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन.
आभार...
-सुप्रिया.
बेफींना पुर्ण अनुमोदन.
बेफींना पुर्ण अनुमोदन. सुप्रिया धीर सोडू नका.
सुप्रिया.... तुझ्या कवितेतून
सुप्रिया.... तुझ्या कवितेतून आर्तता पार भिडली गं......!!
काळजी घे...... कविता तुला सावरायला नक्कीच मदत करेल. व्यक्त होत रहा.
जबरदस्त.....!!! बेफ़िकीर...
जबरदस्त.....!!! बेफ़िकीर... यांच्या प्रतिसादाला पूर्ण अनुमोदन..... ही खरी कवितेची सुरुवात आहे....
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
झालं ते मला त्यादिवशी समजलं
झालं ते मला त्यादिवशी समजलं होतं....... त्या वेळी काय बोलायचं ते न सुचाल्यानं मी संपर्क साधला नाही ..............
तुम्हाला पुन्हा आज इथं पाहून जरा बरं वाटतंय...........
ही कविता खूप प्रभावीपणे नेमकेपणे मांडलीत .
बेफेजिंचं बरोबरय.......... 'कविता आता खरी सुरू झाली आहे'!!
तुमच्या या काव्यप्रवासासाठी अनेकानेक शुभेच्छा!
सुप्रियाजी, तुमच्या दु:खात
सुप्रियाजी, तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत !
बेफींचे म्हणण्याला १००% अनुमोदन !
सुप्रियाजी, तुमच्या दु:खात
सुप्रियाजी, तुमच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
वाचून वाईट वाटले.
सांभाळा स्वतःला.