असणं!

Submitted by बागेश्री on 19 June, 2012 - 04:36

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!

बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!

ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं-
जगताना पुरून उरावं!
कायमच, सुख मिळालं की दु:ख
मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून......

गुलमोहर: 

कित्ती गोड लिहिलयसं गं.... Happy

आवडली....
आणि पहिलंच वाक्य...
एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?>>> आहा!! Happy

थोडक्यात पण छान लिहिलंस..... आवडली कविता.

एखाद्याच्या असण्यावर आपलंही असणं अवलंबून असतं,
हे अगदी खरं.

छान मांडलय !!!!!!!!
तुझं.............................. असणं!!!!!!!! Happy

चिट्टीच्या हाती सगळी सूत्रं दिलीत आणि मी आरामखुर्ची टाकून बसलोय असं चित्र डोळ्यांपुढं आलं. Proud

अवांतर : कविता आवडली.

चिट्टीच्या हाती सगळी सूत्रं दिलीत आणि मी आरामखुर्ची टाकून बसलोय असं चित्र डोळ्यांपुढं आलं. >>
किरण्या Rofl

कै च्या कै सुचतं तुला!

<<<बेदरकारपणे स्वतःला
आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं,
मिटल्या डोळ्यांनी आता,
ते असणं अनुभवावं!
नव्याने साठवावं!>>>

छान!!! Happy कविता आवडली Happy

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र,
त्या हाती सुपूर्द व्हावीत...
आपण रिक्त होऊन!............... सेम पिंच

एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं?
कसलं मस्तयं गं..आणि शेवट वास्तवाची जाणीव करून देणारा.....

तू खरंच छान छान लिहितेस....(आणि छोटं असतं नं म्हणून माझ्यासारखीला पण पटकन कळतं.. Wink )

पुलेशु... Happy

Pages