वर्षाराणी

Submitted by हेमंत पुराणिक on 19 June, 2012 - 05:53

काळ्या ढगात लपली वर्षाराणी
वाजत गाजत येई ती वर्षाराणी
ढोल ताशानी ढग हे गर्जती
चमचम चपला नाचे त्रिभुवनी

झरा हासला डोंगरा मधूनी
उन्मत्त नदी हसली रानी
वारा धुंद बेहोश होउनी
सरीं वरती सळसळे पानी

गंध मातीचा मना मोहवी
भिजले अंग मनही भिजुनी
पाय नाचले पाण्यावरती
थुई थुई मोर नाचे वनी

एक बिचारी झरोक्यामधुनी
होती बघत साश्रुनयनी
होती जणु ती घायाळ हरीणी
सरल्या दिवसाना याद करुनी

काळ्या ढगातुनी बरसत येई
कुणा दु:ख आनंद घेऊनी
ज्याच्या त्याच्या मापामधूनी
आनंद दु:ख घ्यावे भरुनी

गुलमोहर: