Submitted by अनिल तापकीर on 19 June, 2012 - 09:20
अरे अरे बळीराजा ||
तू नावाचाच राजा ||
तुझं भांडवल करून |
पुढारी मारतात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
तुझ्या राज्यामध्ये असतो दुष्काळ ||
ओला असो वा सुका ||
तुझ्यासाठी तो फक्त काळ ||
तुझी स्वप्ने होत जाती वजा ||
अरे अरे बळीराजा ||
महागाईने कहर केला ||
भाव मिळेना शेत मालाला ||
तुझा कर्जाचा डोंगर वाढतच गेला ||
दलाल बघत्यात मजा ||
अरे अरे बळीराजा ||
कर्ज फिटता फिटेना ||
मदत मिळता मिळेना ||
निसर्ग बी साथ देईना ||
सतत कर्जाचा तो बोजा ||
अरे अरे बळीराजा ||
शेतामध्ये गाळतो तू घाम ||
मुखी तुझ्या हरीनाम ||
शेत हेच तुझे चारीधाम ||
मिळत नाही कधी रजा ||
अरे अरे बळीराजा
देवाला बी दया येईना ||
सपनं तुझी पुरी होईना ||
कष्ट करणे कधी थांबेना ||
म्हणूनच होशील एक दिवस,
तू खरा बळीराजा ||
अरे अरे बळीराजा ||
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
बळीराजाची व्यथा छान मांडलीय.
बळीराजाची व्यथा छान मांडलीय.
धन्यवाद, विभाग्रजजी
धन्यवाद, विभाग्रजजी
खुप छान आहे कविता, सध्या
खुप छान आहे कविता, सध्या दुष्काळ पडण्ञाची चिन्हे आहेत. बळिराजास ईश्वर परस्थितिशी झगडण्याचे बळ देवो.
धन्यवाद, कौतुक.
धन्यवाद, कौतुक.
छान मांडलय ! परंतु भाषेची
छान मांडलय !
परंतु भाषेची निवड वेगवेगळी झाली कुठे गावंढळ्(अडाणी) तर कुठे सर्वसामान्य !
धन्यवाद, मुक्तेश्वरजी, आमचे
धन्यवाद, मुक्तेश्वरजी, आमचे खेडेगाव शहराच्या जवळ असल्यामुळे आमच्या बोली भाषेत अशी सरमिसळ आढळते.
शेतकर्याची व्यथा कळ्ते पण
शेतकर्याची व्यथा कळ्ते पण आजच्या परिस्थितीत त्यावर उतारा काय?
व्यथा मांडायचा चांगला
व्यथा मांडायचा चांगला प्रयत्न.
मोहन वैद्द व उल्हासजी
मोहन वैद्द व उल्हासजी धन्यवाद,
मोहनजी याच्यावरील ऊतारा प्रत्येक शेतकरी सागेन परन्तु तो राजकारन्यांना पटणार नाही.