Submitted by -शाम on 19 June, 2012 - 08:39
त्याच्या इवल्या हातावरती छडी मारली जेंव्हा
कंठ दाटला, परी मला ना रडता आले तेंव्हा
अत्ता अत्ता हासत होता फुलासारखा गाली
क्षणात एका चर्येवरती रुद्र उदासी आली
जणू अचानक उजाड झाली वासंतीच फुलबाग
भानावरती येता येता लज्जीत झाला राग
शिस्त मोडली नव्हती अथवा गुन्हा न केला काही
एका अंकावरुनी होता चुकला गणित पुन्हाही
गणितच नाही सुटले म्हणुनी जगणे विस्कटते का
आयुष्याचे गणित कुणाचे गणिताने सुटते का
मला आठवे माझ्यामधले अवली मूल शहाणे
गणित जमले तरीही कोठे जमले अचूक जगणे
खिन्न मनाने त्याचा मग मी हात घेतला हाती
थरथरणार्या हातामध्ये सोपविली 'ती' काठी
बांध फुटावा तसेच उत्कट खळाळ हसला जेंव्हा
कंठ दाटला, परी मला ना रडता आले तेंव्हा
..............................................शाम
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे कविता.
छान आहे कविता.
सुंदर!
सुंदर!
गणितच नाही सुटले म्हणुनी जगणे
गणितच नाही सुटले म्हणुनी जगणे विस्कटते का
आयुष्याचे गणित कुणाचे गणिताने सुटते का
मला आठवे माझ्यामधले अवली मूल शहाणे
गणित जमले तरीही कोठे जमले अचूक जगणे
खिन्न मनाने त्याचा मग मी हात घेतला हाती
थरथरणार्या हातामध्ये सोपविली 'ती' काठी
बांध फुटावा तसेच उत्कट खळाळ हसला जेंव्हा
कंठ दाटला, परी मला ना रडता आले तेंव्हा>>
वा वा वा
आवडली कविता. शेवटची ४ कडवी
आवडली कविता.
शेवटची ४ कडवी ..... मस्तच.
व्वाह!!
व्वाह!!
अत्ता अत्ता हासत होता
अत्ता अत्ता हासत होता फुलासारखा गाली
क्षणात एका चर्येवरती रुद्र उदासी आली......
..........................इथे रुद्र हा शब्द जरा खटकतो (कारण तुम्ही एका इवल्याश्या कुणाची तरी गोष्ट सांगत आहात.)
रुद्र आहे पण उदास आहे. की, .. उदास आहे पण रुद्र आहे.?
आणि....
जणू अचानक उजाड झाली वासंतीच फुलबाग......... इथे हा वासंतीच बरोबर आहे का?
-शामजी कृपया गैरसमज नसावा, तुमची ही कविता मनापासुन अतिशय आवडली म्हणुनच हे सारं.
अतिशय उत्तम. अजून येऊद्या.
अतिशय उत्तम.
अजून येऊद्या.
तुझ्या आवडलेल्या लेखनापैकी
तुझ्या आवडलेल्या लेखनापैकी एक.
वेदना थेट पोहोचतेय...!
जियो..
धन्यवाद प्रिय
धन्यवाद प्रिय दोस्तांनो...!
@ऑर्फिअस.. रुद्र= भयानक/ प्रचंड... रुद्र उदासी= भयानक / प्रचंड उदासी
वासंतीच= वसंतामधेच.... एका मात्रेसाठी दीर्घ सूट घेतेली आहे इतकेच ... बाकी शब्द मला योग्य वाटतोय..
धन्यवाद
शाम, क्या बात है....... फार
शाम, क्या बात है....... फार म्हणजे फारच सुरेख.....
वा ! आवडली ! थेट भिडली.
वा ! आवडली ! थेट भिडली.
छान वाटली. नाहीतरी रडकाचेस...
छान वाटली.
नाहीतरी रडकाचेस... मेल चेक कर
डोळे भरुन आले ! आवडली
डोळे भरुन आले !
आवडली
धन्यवाद दोस्त
धन्यवाद दोस्त हो!
......................................