Submitted by अनाहक on 20 June, 2012 - 01:49
अशीही कधी कविता करावी
मन भरकटत कल्पित होईल
येईल जोवर भानावर असे
लेखणीही प्रवास तो लिहूनी ठेवील
अशीही कधी कविता करावी
सौन्दर्यही मी अचूक टिपावे
बाहुत आलेल्या स्वप्न्परीने
कागदावरही अस्तित्वाचे दाखले द्यावे
अशीही कधी कविता करावी
कागद ग्रीष्म दिवसालाही थकवा
शाईमध्ये मिसळावे थेंब शीतळ
अन प्रत्येक शब्दामागून पाऊस यावा
अशीही कधी कविता करावी
विना यमकाचे म्हणावे गाणे
व्हावा लिलाव माझ्या कल्पनेचा
खावे मी ही चार-दोन आणे
अशीही कधी कविता करावी
अश्रू शब्दांचे उपकृत व्हावे
माझ्या रडण्याला सीमा जिथे
तेथुनी पुढे मी लिहित जावे
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान