कविता

पाऊस हा वेगळा....

Submitted by क्रितिका on 8 June, 2011 - 14:56

मनात वारे दाटलेला
हृदयाच्या कोपऱ्यात साचलेला
पापणीच्या मिठीत बांधलेला..
………… पाऊस हा वेगळा!!

विनाकारण हि बरसलेला

अलगद गालावर तरंगलेला
आठवणीच्या पुरात वाहलेला
…………. पाऊस हा वेगळा!!

कुणाला नकळत भिजवलेला
कधी खोडकर रुसलेला
डोळ्यातून नाजूक हसलेला
…………. पाऊस हा वेगळा!!

भरपूर काही बोललेला
अगदी अबोला धरलेला
हातानं मोती टिपलेला
…………. पाऊस हा वेगळा!!

गुलमोहर: 

रिमझिम...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 8 June, 2011 - 13:47

रिमझिम रिमझिम पाउस यावा,मन आनंदावे ।
अलगद नवथर सूर फुलावा,मी गाणे गावे ।

अविरत पडत्या जलधारांचा गगनी ओलावा,
शब्द तयांचा सर्वस्वाच्या कानी झेलावा ।

झऱ्यास यावा तारुण्याचा फिरुनि नवा जोष ।
धरेस गात्रा-गात्रांमधुनी व्हावा संतोष ।

श्याम घनांची भरून जत्रा, गडगड कल्लोळ,
निसर्गदेवा आर्तिक्याचा तडित्प्रभालोळ ।

कुणी नसावे रिते, पोरके, एकाकी कोणी
सनाथ व्हावे धरा, वने, खग, अन् सारे प्राणी ।

उत्साहाचा होवो उत्सव, आंदण सौख्य मिळो,
नसोत चिंता-क्लेश कुणाला, सकलहि दुःख जळो ।

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आठवतंय आता

Submitted by zaad on 8 June, 2011 - 13:18

तुझ्या प्रेमात
पडलो होतो
त्या एका
सूक्ष्म क्षणी
(आठवतंय आता)
असं वाटलेलं की
मनाला माझ्या
लागू नये
नजर कुणाचीच...
पुढे विलगताना
पर्यायच नव्हता
लावण्यावाचून
तीट मनाला...
आठवतंय आता..!

गुलमोहर: 

मैफील...

Submitted by हर्षल_चव्हाण on 8 June, 2011 - 10:30

भैरवी अजून संपलेली नाही,
मी ही तुझ्या रसात आकंठ बुडालेला...
तसं पहाटेपर्यंत जागणं मला नवीन नाही,
पण तुझे सूर उतरतांना पाहून मलाही अस्वस्थ व्हायला लागलं...
हातात हात घेऊन, सगळी मैफील कशी जमवली आपण दोघांनीच आतापर्यंत
याचा विचार करत पडून राहीलो मग...
अलगद तुझं कानातलं किणकिणलं निखळून पडल्यासारखं,
आणि डोळे उघडून पाहतो तो,
जाणीव झाली होती; मैफील संपल्याची...
आणि बाहेर दारावर खबरही आली होती...
'उजाडल्याची'...
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

नाद घुमु दे

Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2011 - 06:15

नाद घुमु दे

तडतम तडतम नाद घुमु दे
उच्च रवाने जल बरसु दे

गंध मातीचा त्यात मिसळुदे
मातीला पाण्यात घुसळुदे

तरुणाईला जोश मिळुदे
प्रेमाचे नवअंकुर फुटुदे

केसात तिच्या मोती चमकुदे
बेभान होऊनी तो ते पकडुदे

भिजल्या धारा घोंगत वारा
नवप्रणया नवज्वार चढुदे

आठव सखये ते दिस रुपेरी
नवथर लज्जा तव गाली दिसुदे

गुलमोहर: 

नीलमयी!!

Submitted by स्वर्णिमसखी on 8 June, 2011 - 06:02

निळी सांज आणि निळा देह सारा
निळ्या गोकुळाशी हे नाते जडे ..!!

निळ्या पापणीतून निळे स्वप्न झरते
निळाईत पाऊल पुरते बुडे .. !!

निळ्या आसमंती निळे जलद झुलती
निळी रेघ जैसा नील पक्षी उडे ..!!

निळ्या बासरीची निळी धून वाहे
निळी जादू ऐसी ही कैसी घडे .. !!

निळाईत आता पुरते बुडावे
निळे श्वास आभास चोहीकडे ..!!

निळ्या अंतरंगी निळा शाम संगी
निळ्याची अशी भूल मजला पडे .. !!

- स्वर्णिम् सखी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

करंटा

Submitted by manisht on 8 June, 2011 - 01:18

तुला द्यावया नाही उरले
एकहि फूल माझीयाकडे
विखुरली सारी पुष्पे
झाले हातही माझे रीते

चौफेर वाजले नगारे
माझ्या भीम पराक्रमाचे
वर्षाव फूलांचा तरी
तुझे ते एकच फूल नीराळे

दैदिप्यमान प्रकाशात माझ्या
अवकाश उजळून नीघाले
दूर कुठेतरी कोपर्‍यात
तुझे रोपटे सुकून गेले

सूर्य मी नभीचा
असे पणती जरी तू
नीराशेच्या काळोखात
साथ मला तूच दिलीस

फूले सारी विखूरली गेली
त्या धूंदीच्या क्षणात
उरले नाही एकही फूल
प्रिये तुला द्यावयास

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस पर्वणी..

Submitted by सूर्यकिरण on 8 June, 2011 - 00:41

कालची ती भेट आपली,
काहिशी वेगळीच होती ना?
तुझं ते पैंजण तालावर
बेभान होऊन नाचणं पाहून
आभाळभर जमलेली मेघांची गर्दी,
हळूच तुला मोहक स्पर्शातुन,
लाजवणारी ती झुळूक,
आणि तुझ्या माझ्यातून
हळूवार ओघळू पाहणार्‍या,
त्या हलक्या सरी..

गुलमोहर: 

टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

Submitted by सत्यजित on 7 June, 2011 - 13:04

छपरावरुन गळणारं पाणी
आकाश ढवळत होतं
मला सुकं ठेवण्यासाठी
माझं छप्पर भिजत होतं

छपरावरुन पाणी खाली बादली भरत होतं
त्या बादलीत पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तो आडोश्याला उभा
छत्री बंद करुन
भीजलेली पॅंट
वर गुढघ्यात धरुन

ओल्या भाळी आठ्या पावसाला बघून
त्याच्या छत्रीतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तिच्या केसातलं पाणी
टप टप गालावर
कानाच्या पाळीवरून
ट्प टप खांद्यावर

अंग चोरून तिने ओढला पदर
तिच्या पदरातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

त्याचं लक्ष तिथे
ओघळणार्‍या थेंबावर
त्याचं लक्ष तिथे
ओल्याचिंब वक्षावर

गुलमोहर: 

घरापासून दूर

Submitted by hitendra_29 on 7 June, 2011 - 09:58

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता