फुलपाखरा,पाखरा
Submitted by अशोक तेलोरे on 4 June, 2011 - 00:53
फुलपाखरा,पाखरा
नको घालू येरझरा
फुलावरी जा तु बस
चाख फुलाचा तु रस
कशाला उद्याची आस
हा हट्ट नाही बरा !!१!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
आज मिळेल सह्ज रस
उद्या लागेल तुझा कस
नको करु हव्यास
करु नकोस नखरा !!२!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
मन तृप्त करण्यास
घे फुलातील सुवास
तुला मिळेल मधु रस
बघ फुलावरी बसुनी जरा !!३!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
आला छान पाऊस
फुले उमळली गो॑डस
जाऊनी त्या॑च्या आसपास
घे जिवनाचा आन॑ द खरा !!४!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा