विनोदी लेखन

कथा एका शाळा मास्तराची...

Submitted by विवेक देसाई on 28 August, 2009 - 10:33

आमच्या वडिलांनी संरक्षण खात्याच्या वैमानिकदलातसून १९७४ मधे निवृत्ती स्वीकारल्यानी. तेच्यामुळे आम्ही तीनय भावंडा एकदम पंजाबातसून डायरेक्ट परुळ्यात ईलव. तेव्हा आमचा तिघांचाय शिक्षण चालू होता, तेच्यामुळे आमची बहीण परुळ्याच्या 'विद्यामंदिर हायस्कूलात' आणी आम्ही दोघय (मी आणी माझो मोठो भाव) 'बाळकृष्ण विद्यालय नं. ३' (मराठी शाळा) मधे दाखल झालव. त्या वेळा माझो मोठो भाव सातवीत आणी मी तिसरीत होतव. तेव्हाचे आमचे शिक्षक आमका आज सुद्धा आठावतत - आमचे हेड मास्तर होते श्री.

गुलमोहर: 

माझे विनोदी लेखन

Submitted by tayadeashwin on 23 August, 2009 - 02:16

मला लिहिण्याचा नाद अगदी बाल वयापासून च लागला.नाहिम्हट्ल तरी माझ्या वयाच्या मानाने मी चांगले लिखाण करतो ,असा माझा समज झालेला!!! तो का झाला? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल.

ते काहीही असो पण माझे लिखाण हे अगदी जोरात सुरु होते .प्रेमकविता , शेतकर्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार......माझा सध्याच्या परिस्त्थितिवर असलेला राग की मी स्वतः काहीच करू शकत नाही ही जाणीव, माझे लिखाण मात्र अगदी समृद्ध करीत होती.

वयापरतवे लिखाणात थोडाफार सुधार झाला , शब्दांचा खजिना वाढला अणि अणि माझे लिखाण अजुन जास्त वाचनिय होऊ लागले!!! हा तसा माझा समज (हो पुन्हा एकदा!!!!! )

गुलमोहर: 

स्वयंसेवकगीरी

Submitted by विनायक.रानडे on 21 August, 2009 - 06:29

मी एक स्च्चा पण डोळे, नाक, कान उघडे असणारा स्वयंसेवक आहे.
सुरवातीच्या काळांत डोळे, नाक, कानाचा फारसा वीचार न करता तन मन धन जसे शक्य होते तसे काम केले.
मग काहीं घटनांनी ह्या सगळ्याचा वीचार करायला शिकवले. म्हणूनच की काय स्वयंसेवकगीरी, गांधीगीरी अशा
शब्दांची योग्यता पटली.

एका मंडळात काम करतांना मी बघीतलेले जातीचे स्वयंसेवक असे काहींसे होते.

स्वयंसेवक नावा पुरते - ह्यांचे कपडे, वागणे, बोलणे, हात, पाय, चेहेरा सगळे कसे कपड्याच्या दुकानातल्या पुतळ्या सारखे, कार्यक्रम संपल्या नंतरही स्वच्छ टीकून असते. ही एक कला आहे.

गुलमोहर: 

अर्थ माझा शब्दांचा

Submitted by विनायक.रानडे on 20 August, 2009 - 04:42

मी माझ्या कुवतीनुसार गेल्या ५५ वर्षात जे अनुभवले त्यातुन मला ऊमजलेले शब्दांचे अर्थ, शब्दकोषांतील अर्थ
कोमेजलेले वाटतात.

अर्थ = शब्दांची समज, अर्थकारणातील
अर्थकारण = सगळ्या खटाटोपांचे कारण अर्थ, पैसा गीळण्याची कला
सुख = दूसर्‍याला छळण्याचे, दूसर्‍यांनी माझ्याकडून पळवले, मी अजून चाचपडतो आहे
शांती = समजली तर नाहीतर दूर्मीळ प्रकार, नावाच्या व्यक्ती अशांत व अशांतता देणार्‍या होत्या
लेखक = बरेचसे लेखनिक, कॉपी-पेस्ट प्रावीण्य मीळवलेले
कायदा = तुम्ही काय काय केंव्हा कुठे आणि कीती देणार ह्याची यादी
नियम = कोणीहि स्वत:चे हित शोधण्या करीता केलेला खटाटोप

गुलमोहर: 

ढबू.....!!

Submitted by yeda patil on 16 August, 2009 - 03:26

ढबूची आणि माझी पहिली ओळख झाली ती तिसऱ्या इयत्तेत. दुपारची शाळा होती. 'वाणी' गुरुजी त्यांचे लिखाणाचे काम करण्यात मग्न होते. वर्गात कुणी दुपार-डुलक्या घेत होतं, तर कुणी मस्त्या करत होतं, म्हणजे जो तो आपापल्या 'उद्योगात' गुंतला होता. मी ही पाटीवर ९ उभ्या रेषा काढून, त्यांमध्ये १०१ ते २०० असे आकडे लिहीत बसलो होतो. तोच हेडमास्तर वर्गावर आले, त्यांच्यासोबत एक मुलगा होता. त्याने खूप ढगळा पण इस्त्री केलेला पांढरा सदरा घातला होता, डोक्यावर लाल रंगाची टोपी त्याने घातली होती. गुरुजींशी बोलणं संपल्यावर, हेडमास्तर निघून गेले आणि गुरुजींनी त्या मुलाला बसायला सांगितलं.

गुलमोहर: 

मायबोली नवनीत गाइड

Submitted by अश्विनीमामी on 13 August, 2009 - 17:35

मायबोली नवनीत गाइड:

मायबोलीत प्रवेश करणे तुलनेने सोपे आहे. म्हणजे मुम्बईच्या लोकलमध्ये प्रवेश करण्याच्या तुलनेत किन्वा
लायनीत उभे राहून अग्यातचे तिकिट मिळविण्याच्या तुलनेत. पण एकदा प्रवेश घेतला व रोज कश्यावरही
प्रतिसाद व्यक्त करण्याची सवय लागली, तर मग कठीण आहे. यातून तुम्ही सुटू शकता ती वेळ आहे पहिले पोस्ट
टा़कण्याआधीची. ( एकच प्याला इफेक्ट)

त्यातून तरून जाण्यासाठी हे नवनीत गाइड वाचावे. व प्रश्न सोड्वावे.
हे नवनीत कुम्पणी ने छापलेले नाही तरी नाव वापरल्याबद्दल दावालावी करू नये. लेखिका अद्रुश्य होउन जाइल.

प्र. क्र. १: खालील शब्दांचे पूर्ण अर्थ लिहा:

गुलमोहर: 

मी आनि लेखन

Submitted by Vishal Khapane on 11 August, 2009 - 16:03

येथे फक्त स्वत:च्या मराठीत लिहिलेल्या कलाकृती/ लेखन सादर कराव्यात. कोणि लिहिला असावा हा नियम? आहो मराठि साइट वर मग काय कानडित लेखन करनार?

गुलमोहर: 

चेन्नई ट्रीपा ?

Submitted by सुमेधा आदवडे on 26 July, 2009 - 04:03

कुठलंही ठोस कारण नसताना माझ्या अप्रेझलची अक्षरशः वाट लागल्यानंतर मला मुळात कामातच काही रस उरला नव्हता. मग कंपनीसाठी घरापासुन लांब जाऊन एखादं प्रोजेक्ट करणं तर दूरच राहीलं.

गुलमोहर: 

फिटींग!

Submitted by पूनम on 14 July, 2009 - 02:59

आमचे ’हे’ अलिकडे कपडे शिवून घेत नाहीत.. नाही, शिंप्याचं नाव अली नाहीये, अलिकडे म्हणजे 'आताशा' हे कपडे शिवून घेत नाहीत, सरळ विकतच घेतात..

गुलमोहर: 

रिसेशन - एक काथ्याकूट

Submitted by चिमण on 4 July, 2009 - 14:02

(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन