विनोदी लेखन

नकटीचं लग्न आणि प्रसार माध्यमं

Submitted by एस अजित on 2 April, 2010 - 03:10

बातमी वाहिनीच्या कार्यालयात सगळे कर्मचारी भेदरलेल्या अवस्थेत उभे होते. प्रत्येकाचं लक्ष साहेबाकडे लागले होते. आज सकाळपासुनच साहेबाच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येत होता. नवीन बातमी कुठून आणायची याचा विचार करकरुन साहेबाचे डोके पिकले होते. साहेब जाम भडकला आहे असं शिपायाने बाहेर असलेल्या कर्मचार्‍यांना खुणेनेच सांगितले होते. आज कुणावर संक्रांत उगवणार याचा सगळे जण विचार करित होते.

जरा वेळाने सगळ्या पत्रकारांनी एकत्र जमावे असा साहेबाचा आदेश सुटला. सगळे पत्रकार जीव मुठीत धरुन भेटण्याच्या खोलीत जमा झाले.

'कोण कशावर कामं करतयं' - साहेबाने दरडावणीच्या सुरात विचारले.

गुलमोहर: 

उलट तपासणी

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 March, 2010 - 10:04

स्थळ - न्यायालय
वेळ - कामकाजाची

डॉक्टर - गीतेशपथ खरं बोलेन, खोटं बोलणार नाही.
वकील - गीतेची शपथ घेतल्यावर तुम्ही खरं बोलाल अशी कोर्टाची अपेक्षा आहे.
डॉक्टर - प्रश्नच नाही. मी डॉक्टर आहे.खोट बोलायला मी काही ..
वकील - वकील नाही असं म्हणायचय का तुम्हाला ?
डॉक्टर - असं कुठे म्हटल मी ?
वकील - अस्सं. हा पोस्टमार्टेमचा रिपोर्ट तुम्ही बनवलाय ?
डॉक्टर - नाही.
वकील - (गोंधळून) म्हणजे हा रिपोर्ट तुमचा नाही ?
डोक्टर - रिपोर्ट माझाच आहे.
वकील - तुम्ही आत्ताच म्हणालात की हा तुम्ही बनवला नाही म्हणून.
डॉक्टर - मी खरं तेच बोलतोय.
वकील - मग कोणी बनवला हा रिपोर्ट ?
डॉक्टर - माझ्या असिस्टंटने.

गुलमोहर: 

अमिताभ, अशोक आणि निमंत्रण

Submitted by देवनिनाद on 30 March, 2010 - 01:20

सध्या अमिताभ प्रकरण सी लिकं उदघाटन निमंत्रणावरून गाजतयं त्या निमित्ताने त्याच्याच चित्रपटातील गाजलेल्या संवादावरुन पुढील लिखाण पोस्ट करतोय (अर्थात मेंदुवर जास्त ताण न देता खालील लिखाणात जाणून बूजून ओढून ताणून बदल केले आहेत, हे आवर्जून नमुद करावसं वाटतं)

अग्निपथ : (विजय दिनानाथ चौहान ...)

नाम विजय दिनानाथ चौहान ...पुरा नाम ...हाई ... मुख्यमंत्री का नाम अशोक चौहान ... आधा नाम ... हाई साला |

दिवार : (जाव जाके पहीले उसका साईन लेके आव)

गुलमोहर: 

माझे(ही) खादाडीचे प्रयोग !!

Submitted by हेरंब ओक on 26 March, 2010 - 17:35

http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_26.html

लोकं खादाडी खादाडी करत, नव्या रेसिप्या देत, नवीन नवीन हॉटेल्सची आणि तिथल्या डिशेसची नावं सांगत, नवीन नवीन पोस्ट्स टाकत, असले जळवायला लागले आहेत ना आजकाल की म्या बी ठरिवलं की खादाडीवरची कायतरी लय भारी पोस्ट टाकायची आज. तेवढाच जरा दुर्बळाचा जोरकस सूड ('जोर का झटका' चं सुटसुटीत मराठी भाषांतर) !!

रेसिप्या वाचण्यापूर्वी घ्यायच्या दक्षता आणि आपल्या मनाला द्यायच्या सुचना उर्फ मध्यटीप (तळ झाली, माथा झाली आता हीच राहिली होती) :

गुलमोहर: 

तात्पर्य काय - भाग २

Submitted by ऋयाम on 26 March, 2010 - 11:35

जमल्यास हे आधी वाचा.. Happy
तात्पर्य काय??

--------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रोजेक्ट संपत आल्यानं आजकाल कंपनीमधे विशेष काम नाहीये.
म्हणुन मग 'फुकटच्या' इंटरनेटवर अवांतर शोध चालु झाला.
माफ करा! 'फुकटच्या' नाही.. 'फुल्लपगारी'..
तर, इंटरनेटचा, असा अवांतर वापर सुरु झाला.

त्यातच कधी कधी बसल्या बसल्या 'विडंबनंच' काय करायला बघ....
निरर्थक 'लेखच' काय लिही.... वगैरे वगैरे गोष्टी चालु झाल्या.

गुलमोहर: 

पहिलं प्रेमपत्र

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 March, 2010 - 12:06

आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं.....

मनात खूप धाकधूक वाटत होती....

छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची!

काय करणार? आधी कधी असलं लिखाण केलं नव्हतं ना....
शाळेत कधी कोणी 'प्रेमपत्र असे असे लिहावे' म्हणून मार्गदर्शन पण केले नव्हते!
मायना काय लिहावा??
सप्रेम नमस्कार म्हणावे, 'हाय' 'हॅल्लो' करावे की अजून काही लिहावे?
कसलं झंजट आहे यार हे प्रेमपत्र लिहिणं.....

गुलमोहर: 

यमाबाईंच्या आत्मचरित्रातील काही पानं !!

Submitted by हेरंब ओक on 24 March, 2010 - 00:46

http://harkatnay.blogspot.com/2010/03/blog-post_23.html

पुढील काही महिन्यांत/वर्षांत प्रकाशित होणार्‍या (किंवा न होणार्‍या) रा.रा. बहिणाताई उर्फ भगिनीजी उर्फ यमाबाईंच्या आत्मचरित्रातील ही काही पाने पूर्वप्रसिद्धीस देत आहोत. 'रम्य ते बालपण' या खंडातील हे काही प्रसंग वाचताना बालपणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही (फक्त स्वतःच्याच) उज्ज्वल भवितव्याचा विचार करणार्‍या यमाबाई बघितल्या की त्यांची दूरदृष्टी बघून अभिमानाने उर भरून येतो.

Hatti1.jpg

------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विनोदी लेखन