कृपया आपल्या चपला बूट प्रोफाइल मध्ये enter करण्या आगोदर बाहेर काढाव्यात!!!!!!!
1. ही आमची खासगी जागा आहे. आत पाहण्यासारखे काही नाही.
2. स्क्रॅपबुक वर विनाकारण स्क्रॅप टाकु नयेत. उत्तरे मिळणार नाहीत.
3. स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.
4. स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
5. ह्या प्रोफाइल ला वारंवार भेट देऊ नये. बॅंड विड्थ मर्यादित आहे. आम्ही बॅंड विड्थ चे पैसे भरतो.
6. या प्रोफाइल वरचा मजकूर इतरत्र कोपी पेस्ट केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
काल मला एक ईमेल आलं. कोणा अनोळखी माणसाकडुन होतं. "काय माहित?" म्हणुन दुर्लक्ष केलं काल, पण आज त्यावर हे उत्तरही आलेलं दिसलं म्हणुन इथं पेस्टतोय....
ईमेल १ : ---------------------------------------------------------------------------------------------
Subject : नमस्कार. लाँटानोसी. 
Text :
काय रे नार्या? कसा आहेस? 
लाँगटाईमनोसी रे... 
कसा चाल्लाय जॉब? कसं आहे शेड्युल?
आणि तुझ्या 'ट्रॅव्हल कंपनी सुरु करायचं' कुठपर्यंत आलं?
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात तुझा 'फिरण्याचा छंद, पार बंद' झालं असेल नाही!?
मी खरंच वैतागलोय रे.
आम्हाला लहानपणापासुन वाचनाची भयंकर आवड. ( आणि लेखनाची खाज ). त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही विविध विषयावरिल (शब्दशः) जड जड पुस्तके आणतो आणि वेळ मिळेल तसे ते (शब्दश:) पाहतो. मग कंटाळा आला कि विरंगुळा म्हणुन आम्ही साप्ताहिके आणि व्रुत्तपत्रीय लिखाण चघळत बसतो. हे करत असताना काहि ठिकाणी आम्हास निम्नलिखित वाक्ये प्रचंड प्रमाणात आणि नेमके कंसात आढळून आली.
उदाहरणार्थ : १. सुज्ञांनी हे ध्यानी घ्यावे
२. सुज्ञांच्या हे लक्षात आले असेलचं.
३. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
४. सुज्ञ याकडे लक्ष देतिल का?
इत्यादि इत्यादि....!
एक फेरफटका पुण्यातील पुलांचा आणि मोबाईल
म्हनतात सर्वे एकदा तरी प्रेम करावे
रम्य ते जीवन जगावे
पन मी म्हनतो चांगल्या आयुष्याचे वाट्टोळे का करावे ?
कधी रुसने त्यांचे कधी फुगने त्यांचे
आणी त्यांचे रुसने दुर करत खीशे खाली होत आमचे
ख्वाईश्या एक एक त्यांच्या आमचा घाम काढी
चल सिनेमा बघायला जाउया , कधी घेनार तु गाडी ?
सारखा i love you बोलना , call कधी करनार
मोबाईल मध्ये बॅलेन्स तुझा बाप भरतोना , ऑफीस मध्ये काम कोन करनार ?
'अहो, नाव काय ठेवायचं?’
’कोणाला नावं ठेवायचीयेत आत्ता, या वेळी?’, जागृती आणि सुषुप्ती यांच्या सीमारेषेवर घोटाळणार्या नवर्याकडून उत्तर नाही पण प्रश्न. अशावेळी ’इश्श्यsss हे काय?’ वगैरे चालत नाही. नवरा प्रेमाच्या तळ्यात नाहीये, झोपेच्या मळ्यात आहे हे ध्यानात घेऊन, हा देवाघरचा जीव वगैरे मनात न आणता, पुन्हा समाधीत जाण्यापूर्वीच गदागदा हलवून माणसांत आणावा लागतो.
’काय गं झोपूही देत नाहीस. आजच्या अख्ख्या दिवसात काय चुकलो असेन तर माफ कर, आणि तू एक सर्वांगसुंदर, सद्गुणी बायको आहेस... आता झो....घुर्रर्र’
शेवटच्या झोपू? मधला ’पू’ सुद्धा न म्हणता एकदम डायरेक्ट घोरण्याचा खर्ज.
तो काळ १९८५ च्या आसपास चा होता. मी दिल्ली मुंबई प्रवासासाठी दिल्ली स्टेशनवर आलो. आणि आच्शर्य म्हणजे कम्फंर्ड तिकिट मिळाले. कारणही तसेच होते. काम्प्युटरायझेशन नुकतेच झाल्याने ते अजुन दिल्लीकरांच्या पचनी पड्ले नव्हते. त्यामुळे गोलमाल करायला वाव नव्ह्ता. संध्याकाळी स्टेशनवर आलो आणि एसी कम्पार्ट्मेंट मधे सुखावलो. एवढ्यात शेजारी एक गोरे जोड्पे बसले.
संध्याकाळी चहा झाला आणि थोड्या वेळाने वेटर डिनर बुकिंग साठी आला.
मी गप्प.
शेजारचे गोरे जोड्पे - ' तो वेटर काय म्हणतोय?'
'जेवण हवे का?' मी
गोरे जोड्पे 'त्याचे वेगळे पेसे असतात का ?'
बातम्या: २१ फेब्रुवारी २०५०
मुंबई (दि. २०): सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर प्रथमच आलेल्या जर्मनीच्या उद्योगमंत्री कुमारी मार्गारेट गुटेनबर्ग ह्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
"काही नाही. निदान महाराष्ट्रात तरी सगळं शिक्षण मराठीतूनच द्यायला पाहीजे. तरच मराठी जगेल. नाही तर पाली, संस्कृत सारखी मराठी पण नामशेष होईल." दिल्यानं साप्ताहिक सभेत आणलेला नवीन प्राणी.. उत्तम बापट.. मुठी आपटून आपटून पोटतिडिकेनं बोलत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून मराठीचा जाज्वल्य अभिमान मायक्रोवेव्हमधल्या पॉपकॉर्न सारखा उसळत होता. त्याच्या युवराजसिंगी धडाक्यामुळे माझ्यातही पोटतिडिक निर्माण झाली.. पण तिच्या उत्पत्तिचं मूळ भुकेमधे होतं हे नंतर उमजलं. मी हळूच मक्या आणि दिल्याकडे पाहिलं. ते बिअर पिऊन थंडावले होते, तिकडे उत्तम उत्तम (उत्तमोत्तम म्हणावे का?) पेटला होता.
मान्सून केरळच्या किनार्यावर आला. पुणेकरांना पावसाने चिंब केले. या वर्षी पाऊस समाधानकारक होण्याची चिन्हे.
वगेरे बातम्या वाचल्या की मला खूप हसू येते. कारण की गेली कित्येक वर्षे मी रेनकोट वापरू शकत नाही. कारण पुरेसा पाऊसच नाही.
शिवाय पावसावरील कविता मंगूआण्णा पापडावर लिहित नाहीत.
त्यामुळे लिज्जतचा सेल पावसासारखाच कमी कमी होत चालला आहे.
पेपर वाले मात्र दरवर्षी त्याच बातम्या वेळापत्रकाप्रमाणे त्याच हेडिंग मधे जुने पाने फोटो छापून शिळ्या कढीला उतू जाउ देतात.
व्यापारी जुना माल म्हणून तोच न खपलेला माल जंगी डिस्काऊंट दाखवून खपवतात.