स्थळ - न्यायालय
वेळ - कामकाजाची
डॉक्टर - गीतेशपथ खरं बोलेन, खोटं बोलणार नाही.
वकील - गीतेची शपथ घेतल्यावर तुम्ही खरं बोलाल अशी कोर्टाची अपेक्षा आहे.
डॉक्टर - प्रश्नच नाही. मी डॉक्टर आहे.खोट बोलायला मी काही ..
वकील - वकील नाही असं म्हणायचय का तुम्हाला ?
डॉक्टर - असं कुठे म्हटल मी ?
वकील - अस्सं. हा पोस्टमार्टेमचा रिपोर्ट तुम्ही बनवलाय ?
डॉक्टर - नाही.
वकील - (गोंधळून) म्हणजे हा रिपोर्ट तुमचा नाही ?
डोक्टर - रिपोर्ट माझाच आहे.
वकील - तुम्ही आत्ताच म्हणालात की हा तुम्ही बनवला नाही म्हणून.
डॉक्टर - मी खरं तेच बोलतोय.
वकील - मग कोणी बनवला हा रिपोर्ट ?
डॉक्टर - माझ्या असिस्टंटने.
वकील - आयसी. यात जे लिहिलय त्यावर तुमची सही आहे...
डॉक्टर - त्याखाली...
वकील - बरं खाली.. तुमची सही आहे म्हणजे हा रिपोर्ट जसाच्या तसा तुम्हाला मान्य आहे ?
डॉक्टर - जो रिपोर्ट वाचून मी सही केली होती, तोच रिपोर्ट जसाच्या तसा असेल तर मला हा रिपोर्ट मान्य आहे.
वकील - तुम्ही डॉक्टरच आहात ना ?
डॉक्टर - मला तरी शंका नाही.
वकील - ठिक आहे. स.दा.वाघमारेला तुमच्याकडे कोणत्या दिवशी आणण्यात आल ?
डॉक्टर - ते दुसर्या पानावर सहाव्या मुद्द्यात नमुद केलय.
वकील - किती वाजता आणण्यात आल ?
डॉक्टर - ते त्याच मुद्द्यात पुढच्या ओळीत नमूद केलय.
वकील - सकाळ की दुपार ?
डॉक्टर - ते त्याच पानावर..
वकील - (चिडून) मी रिपोर्ट वाचलाय. कुठे काय नमूद केलय ते मला माहीत आहे. कोर्टाला नाही. तेव्हा नीट उत्तर द्या.
डॉक्टर - तुम्ही म्हणाल तसं.
वकील - मयत स.दा. वाघमारेला तुमच्याकडे आणलं तेव्हा तुम्ही सर्वात आधी काय केलं ?
डॉक्टर - शिव्या हासडल्या.
वकील - (दचकून) कुणाला ?
डॉक्टर - मयत स. दा. वाघमारेला.
वकील - म्हणजे तुम्ही त्याला ओळखत होता तर.
डॉक्टर - नाही.
वकील - मग प्रत्येक मयत माणसाला शिव्या घालण्याची तुमच्याकडे प्रथा आहे का ?
न्यायधीश - हा उल्लेख जातीवाचक होतोय. कोर्टाने याची नोंद घेतलीय.
वकील - मी दिलगिरी व्यक्त करतो. मग प्रत्येक मयत माणसाला शिव्या घालण्याची तुमची प्रथा आहे का ?
डॉक्टर - नाही.
वकील - मग तुम्ही त्याला शिव्या का घातल्यात ?
डॉक्टर - माझी ड्युटी संपली होती. मला लवकर घरी जायचं होतं. स्वत:च्या बायकोबरोबर शॉपिंगला जायचं होतं.....
वकील - म्हणजे इतर लोक दुसर्यांच्या बायकांबरोबर जातात असं म्हणाचय का तुम्हाला ?
डॉक्टर - मी डॉक्टर आहे. मी दुसर्याच्या दुखण्यात नाक खुपसतो. भानगडीत वा लफड्यात नाही. ते काम...
वकील - वकीलांच... असं म्हणायचय का तुम्हाला ?
डॉक्टर - असं कुठे म्हटल मी ? नेमक्या नको त्या वेळी कडमडला म्हणून मी स.दा. वाघमारेला शिव्या हासडल्या.
वकील - म्हणजे एखाद्याने मरण्यापुर्वी तुमच्या ड्युटीच्या वेळा सांभाळायला हव्यात असं तुमचं म्हणणं आहे का ?
न्यायधीश - हे विषयांतर होतय. कोर्टाने याची नोंद घेतलीय.
वकील - ओ.के. मयत स.दा.वाघमारे हे एक नामांकित वकील होते. त्यात एका मयत माणसाला तुम्ही शिव्या घातल्यात. हे तुमच्यासारख्या सभ्य नागरिकाला शोभेसे नाही असं नाही वाटत तुम्हाला डॉक्टर ?
डॉक्टर - माझं चुकलच. मी दिलगिरी व्यक्त करतो.
वकील - ओ.के. पोस्टमार्टेमपुर्वी तुम्ही मयत स.दा. वाघमारेची नाडी तपासलीत ?
डॉक्टर - नाही.
वकील - त्याचा श्वासोच्छवास सुरु आहे की नाही ते पाहीलत का ?
डॉक्टर - नाही.
वकील - ब्लडप्रेशर चेक केलत ?
डॉक्टर - नाही.
वकील - कमाल आहे तुमची. काहीही चेक न करता तुम्ही मयत स.दा. वाघमारेचे सरळ पोस्टमार्टेम केले ?
डॉक्टर - मी कोणतेही काम सरळच करतो.
वकील - म्हणजे आम्ही उलट करतो असं म्हणायचय का तुम्हाला ?
डॉक्टर - हो.
वकील - तुम्ही आमचा अपमान करताय.
डॉक्टर - मी सिद्ध करू शकतो.
वकील - ते कसं ?
डॉक्टर - आम्ही जेव्हा तपासणी करतो तेव्हा ती सरळ असते. तुम्ही मात्र उलट तपासणी करता.
वकील - कळलं. मयत स.दा.वाघमारे जिवंत असण्याची शक्यता होती का नाही ?
डॉक्टर - तो मेलेलाच होता.
वकील - हे तुम्ही खात्रीने कसे सांगू शकता ?
डॉक्टर - कारण त्याच्या फुटलेल्या कवटीतला मेंदू त्याच्या हातात होता.
वकील - त्यावरून तुम्ही अंदाज बांधलात की तो मेलाय म्हणून ?
डॉक्टर - माझं चुकलच.
वकील - तेच मी म्हणतोय. तुम्ही पोस्टमार्टेम केलत तेव्हा मयत स.दा.वाघमारे खात्रीने मयत होता असं तुम्हाला म्हणायचय का ?
डॉक्टर - ऑबजेक्शन मायलॉर्ड, मी मयत वकील श्री. स.दा. वाघमारे यांचे पोस्टमार्टेम करत असताना ते त्यांच्या हातातल्या मेंदूबरोबर कॅच कॅच खेळत होते. आय.पी.एल.चे संभाव्य अंदाज सांगत होते. मुंबई इंडीयन्स यंदा कप नेईल हे त्यानी शेवटचा कॅच सोडताना मला सांगितलं. मरणारा माणूस खोटं बोलत नाही असं मी चित्रपटात पाहीलय. त्यामुळेच मी मुंबई इडीयन्सवर यंदा पैसे लावलेत.
वकील - (वैतागून) तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला कळतय का ?
डॉक्टर - गीतेशपथ खरं सांगतो, वकीलाचा मेंदू डोक्यात असला काय आणि कवटी फुटून हातात असला काय ? वकीलीचे सल्ले कुठेही, कधीही, केव्हाही देता येतात.
न्यायधीश - डॉक्टर, विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे द्या. सध्या मुंबई इंडीयन्सचा भाव काय चाललाय ?
(No subject)
बास
बास रे~~~~~~~~~~~~~~~~~~
हहाहहा
मस्त झालंय हो! षटकारच बघा.
मस्त
मस्त
कै च्या कै
कै च्या कै
वा वा मस्त मस्त
वा वा मस्त मस्त
(No subject)
आवडल
आवडल
(No subject)
(No subject)
शेवटचा वाक्य डबल सिक्सर
शेवटचा वाक्य डबल सिक्सर

(No subject)
(No subject)
जबरीच
जबरीच
(No subject)
(No subject)
चांगलं लिहिलंय रे कौतुक..
मस्तयं..
मस्त! सुरुवातीपासून
मस्त! सुरुवातीपासून शेवटपर्यंत!
मस्तयं..
मस्तयं..
ते डोम्या म्हणे पुन्हा लिहित
ते डोम्या म्हणे पुन्हा लिहित जा कि......
छानच....
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
सुपर्हिट्ट
सुपर्हिट्ट
मस्त.
मस्त.
(No subject)
हा हा हा हा हा........ ..
हा हा हा हा हा........
:).. मजा आली....
शिरोडकर, तुमचा भाव काय सध्या?
शिरोडकर, तुमचा भाव काय सध्या?
Pages