साडेतीन वर्षांपुर्वी डोंबिवलीचे भाड्याचे घर सोडुन कल्याणला स्वतःच्या घरात रहायला गेलो. मनावर दगड ठेवून डोंबिवली सोडलं. दर ११ महिन्यानीं घर बदलतांना जो मनस्ताप होतो तो टाळण्यासाठी स्वतःचे घर असणे अत्यंत आवश्यक आहे या गरजेपोटी कल्याणला रहायला गेलो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
१) पुर्णतः काल्पनिक आहे.
२) गमतीत लिहीलं आहे, त्यामुळं गमतीमधे घेतलंत तर आनंद आहे.
३) कोणती बाजु चुक, बरोबर असं अजिबात म्हणणं नाही आहे इथं.. त्याबद्दल मतं मांडण्यासाठी कृपया या ठिकाणाचा वापर करु नका.
४) कृपया, कृपया परत एकदा २) वाचा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
"बाबा... लगिन.... " "बाबा... लगिन.... "
देवाच्या कृपेने, असं काही करायची वेळ आली नाही माझ्यावर.
माणसाचं कायै की, ’तुमच्या कुंडलीत अमुक अमुक योग दिसतोय बुवा...’ हे विधान, ’तुमच्या कुंडितल्या अमुक अमुक झाडाला कळी आलेली दिस्तेय...’ ह्या विधानापेक्षा जास्तं सुरस, किंवा आजच्या मराठीत, जास्तं इंट्रेस्टिंग वाटतं.
’तुमच्या ऑफिसात तरुणींची भरती होतेय’ पेक्षा ’सुंदर व्यक्तींचा सहवास संभवतो’ जास्तं पटतं.
’बायकोने शनिवारी उंधियो करायचा घाट घातलाय आणि घर साफ करण्याचा कट केलाय’ पेक्षा ’येत्या दोन दिवसांत अनपेक्षित कार्य उद्भवेल’ अधिक कळतं.
’चाळिशी उलटली की डोळे बिघडतात... चष्मा घ्यावा लागतो’ पेक्षा ’दृष्टी-दोष अटळ आहे’ अधिक वळतं.
मराठी काव्यावरचे विनोद या सदरात देण्याचा प्रयत्न आहे. आपले अभिप्राय पुढील वाटचालीसाठी आवश्यक.
१.
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे....
खरे तर असे म्हणायचे नसेल ना?
अ) माझे मलमली तारुण्य, पहाटे आता तू(सुद्धा) पांघरायला हरकत नाही...:)
आ) रात्रभर होतास कुठे?
इ) त्याची प्रतिक्रिया : अगं, नको गं! आधीच उकाड्यानं जीव हैराण झालाय. त्यात आणखी भर कशाला?
२.
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे
अ) तुझा जीव काळा हाय म्हनं! म्हंजे कलप लावाया नगो.
आ) त्याची प्रतिक्रिया : वा रे वा! म्हंजे आमी र्हायलो बाजूला. आन् हा कोण जिवा ?
नमस्कार,
हा काय प्रश्न? आपल्या महाराष्ट्राच्या बर्थ डे ला ( वाढदिवसाला. जय महाराष्ट्र
) केंद्रिय रेल्वे मोटरमन्सनी जी वाढदिवसाची भेट मुंबईकरांना दिली त्या दिवशी आपण घरी कसे पोहोचलात?
मुंबईकर्स आपल्या प्रत्येक पावसाळ्यातील कमीत कमी एक रम्य संध्याकाळ व नंतरची अर्धी रात्र (क्वचित प्रसंगी उत्तर रात्र देखिल) मध्य रेल्वेच्या (पश्चिम रेल्वे बर्यापैकी धावत असते) चरणी अर्पण करित असतात. उपनगरांमध्ये राहण्याचे घोर पातक करणारे सामान्य जन अशा रात्री ज्या मरणयातनांना सामोरे जातात त्यास उभ्या दुनियेत तोड नाही.
रेडीयो, टेप रिकार्ड का इस्तेमाल करना दंडनिय है! पुर्वी लोकल किंवा रेल्वेच्या ड्ब्यात ही सुचना हमखास वाचावयास मिळत असे, पण मल्टिमेडिया मोबाईल फोन्समुळे रेल्वेने ही सुचना काढुन टाकली असावी. स्वस्त चायनामेड मोबाईल्स सहजपणे उपलब्ध झाल्याने लोकलमधील कानसेनांची खुप सोय झाली आहे. हे कानसेन सेकंड क्लासने प्रवास करणारे आहेत कारण, फर्स्ट क्लासने प्रवास करणारे रसिक इअरफोन लावून गाणी ऐकत असतात.
वटवट सत्यवान यांच्या सुंदर माझं घर या लेखामधील डोंबिवलीबद्दलची माहिती वाचुन हा विचार सुचलाय, काही वर्षे डोंबिवलीत काढल्यानंतर थोडयाफार निरिक्षणांमधुन डोंबिवलीकरांच्या काही सवयी लक्षात आल्या त्या अशा...
१. खरा डोंबिवलीकर तिकीट किंवा पासच्या रांगेत अतिशय शिस्तीत उभा राहतो. जर कुणी मध्येच घुसण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्याजवळ जाऊन आरडाओरड नं करता अशा पद्धतीने समजावतो की समोरचा गारच होतो.
कसलं बायकी नाव वाटतंय ना. लेख मात्र बायकी नाही. पुर्षी आहे. पुर्षाने लिहिला आहे म्हणूनही आणि पुर्षावर लिहिला आहे म्हणूनही....... चला आजचा पांचटपणाचा कोटा संपला. (जास्त जोरात हुश्शकारू नये. तुमच्या हुश्श्कार्यांच्या (सुस्कार्यांच्या चालीवर) आवाजाने आम्हाला अजून पांचट लिहिण्याचा मोह झाल्यास त्याला समस्त पुर्षी मंडळी (म्हणजे सदरहु लेखातली) जवाबदार नाहीत).... जाऊदेत. ऑन अ सेकंड थॉट, सव्वा (कंस धरून सव्वा) वाक्यांपूर्वी सोडलेला संकल्प आम्ही मागे घेत आहोत. कारण लिहीत असताना वेळोवेळी पाउल सांभाळणे (घाबरू नका..
आयशॉट !
सहावी 'ड' मधल्या ‘आयशॉट’ ला सारखे ‘आयशॉट’ म्हणायची सवय (‘आईशप्पथ’ चा झालेला तो अपभ्रंश). जसे जसे त्याच्या वह्यांतून सापडते तसे तसे त्याचे लेखन आम्ही प्रकाशित करत असतो. अगदीच वाचता येणार नाही तिथेच फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारतो.. पण सर्व लिखाण त्याचेच.. त्याच्याच मनातले थेट वहीत उतरलेले.
त्याला स्वत:लाही त्याचे ते टोपण नाव ‘आतिचशय’ आवडते : आयशॉट !
***
बायको जेंव्हा बोलत असते ( ही मुळ कविता)
बायको जेंव्हा बोलत असते तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
भडका असतो उडालेला अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका सारं सारं...स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
शब्दानं शब्द वाढत जातो भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
गरजून बरसून झाल्यानंतर थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं