गुलाम

Submitted by दत्तात्रय साळुंके on 24 August, 2023 - 02:29

गुलामानं धन्यासाठी आजन्म राबायचं असतं
नसतो अधिकार कसला, काहीही मागायचं नसतं

वाहतो हा गुलाम रस्ता जरी ऐसपैस
भावनांना डांबरट बांधायच असतं

कुणी पच्चकन थुकला अथवा मुतला
धन्याला मान वर करुन बोलायचं नसतं

मैलाचे दगड, दिग्दर्शन खूणा, पांढरे पट्टे चमचे सारे
वर, खाली,सरळ,वाकडं नेतील तसं जायचं असतं

अंगावर मणा मणाचं ओझं दिवसरात्र
घेऊन मालकासाठी धावायचं असतं

कुजबुजतात मालक लोक आपसात काही
ऐकलेलं कधीच कोणालाही सांगायचं नसतं

भेटला रस्त्यात दुसरा गुलाम रस्ता
डोळा मिचकावत पुढे वाहयचं असतं

नदीनाले, ऊनपाऊस तमा न बाळगता
डांबर, खडी, सिंमेटनं पोट भरायचे असतं

पांढरे, पिवळे, काळे पट्टे अंगाखांद्यावर
कधी नवं वस्रप्रावन चढवून नाचायचं असतं

कधीतरी आक्रंदतो आक्रोश खड्ड्यातून
तप्त डांबर, खडी दाबून मूग गिळून बसायचं असतं

ध्येय मालकाचं असतं, गुलामाच नसतं
तेच गाठायला नेईल तिथं जायचं असतं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो सहमत
पण मला कोणी विचारलं गुलामाचं‌ चित्र काढ...मी रस्ता काढला.

केशवजी
धन्यवाद...
आपण सारेच देह, बुध्दी, मनाचे गुलाम....
लक्ष्मीधर सुध्दा लक्ष्मीचे गुलाम. ती मिळविण्यासाठी तडजोडी आल्या.
देह, मन, बुध्दी या पलीकडे मुक्ती... आणि ती ये-या गबाळ्याचे काम नोहे.