मालक

गुलाम

Submitted by दत्तात्रय साळुंके on 24 August, 2023 - 02:29

गुलामानं धन्यासाठी आजन्म राबायचं असतं
नसतो अधिकार कसला, काहीही मागायचं नसतं

वाहतो हा गुलाम रस्ता जरी ऐसपैस
भावनांना डांबरट बांधायच असतं

कुणी पच्चकन थुकला अथवा मुतला
धन्याला मान वर करुन बोलायचं नसतं

मैलाचे दगड, दिग्दर्शन खूणा, पांढरे पट्टे चमचे सारे
वर, खाली,सरळ,वाकडं नेतील तसं जायचं असतं

अंगावर मणा मणाचं ओझं दिवसरात्र
घेऊन मालकासाठी धावायचं असतं

कुजबुजतात मालक लोक आपसात काही
ऐकलेलं कधीच कोणालाही सांगायचं नसतं

भेटला रस्त्यात दुसरा गुलाम रस्ता
डोळा मिचकावत पुढे वाहयचं असतं

शब्दखुणा: 

मा. ल. क. - १०

Submitted by हरिहर. on 29 August, 2018 - 11:13

नजर पोहचेल तिथपर्यंत वाळवंटच दिसे. सोनेरी वाळूंच्या लहान लहान टेकड्या खुप सुरेख दिसत. दिवसा अंग जाळणारे लख्ख उन असे तर रात्री शरीर गोठवणारा गारठा असे. मात्र हे सुंदर दिसणारे विस्तीर्ण आणि लहरी वाळवंट वाट चुकलेल्यांचे हमखास जीव घ्यायचे. रस्ते तसेही नसतच वाळवंटात. जे असत ते रात्रीतुन बदलून जात. रस्तेच काय पण वाळूच्या वादळाने टेकड्याही आपल्या जागा बदलत असत. आकाशवाचन करणारा, ताऱ्यांची आणि वाळवंटातील सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती असलेलाच माणूस हे रण पार करु शके. एकदा का दिशा हरवली की मग प्रवास करणाऱ्याला ती परत सापडने अवघड असे. अर्थात सावल्यांचा जाणकार मात्र क्षणात दिशा सांगू शके.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मालक