स्फुट

मी, ते झाड आणि चिमण्या ......

Submitted by मी मी on 7 August, 2013 - 12:30

घराच्या अगदी पुढ्यात एक वाळलेलं झाड आहे …
पानं गळून गेलेलीत सगळी … हिरवा ठीपकाही नाही ….
दाटीने असलेल्या बारीक फांद्या… वाळलेल्या ..पण
एकमेकांच्या आधाराने नेट धरून उभ्या

रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड

ठरलंय आमचं,
'झाडावर जागा त्यांची …त्यांच्यावर नजर माझी'

माझ्या खोलीच्या खिडकीतून रम्य दिसतो हा नजारा

पाऊस आला कि मात्र मी आवर्जून खिडकी बंद करते
मग बंद खिडकीत फडफडत येउन बसतात त्या
कप्प्यां कप्प्यात ……. निवाऱ्याला …. अगदी हक्काने
पावसापासून जपून ……. तरीही जरा जरा भिजतच

ठरलंय आमचं,

विषय: 
शब्दखुणा: 

अशी कशी ग तू ?

Submitted by मी मी on 2 July, 2013 - 11:41

ते म्हणायचे तिला,

"अशी कशी ग तू ?

पावसाची सर, वाऱ्याचा झोत, समुद्राची लाट, सांजवात, पहाट, पक्ष्यांचा किलकिलाट, झाडांचा सळसळाट...
सगळं सगळं तू अंतरातून अनुभवतेस, आत आत शोषून घेतेस.....

पण,,,उन्हाची झळ सोसवत नाही तुला......
सगळंच तर निसर्गाच देणं ना ?....
तू पारशालिटी करतेस बुवा....खरेपणा नाही या वागण्यात ........"

ती हसली, म्हणाली ...

" अस कोणी सांगितलय पण ...निसर्गान दिलेलं सगळंच 'आनंद' हि एकच भावना अनुभवायला दिलेलं आहे.....
सुख सुख मिळालं कि आनंदी व्हायचं, हसायचं आणि
दुखरी, खुपरी झळ आली तरीही आनंदी राहायचं?... हसायचं ?

दुःखावर अन्याय नाहीये का हा ?

विषय: 
शब्दखुणा: 

मोह...

Submitted by बागेश्री on 17 January, 2013 - 08:41

एखाद्या भावनेने उच्चांक गाठला,
की मेंदूवरची पकड सुटण्याचीच भिती जास्त!

ते क्षणच मोहक.
कधी आनंदाचे, कधी निराशेचे..

कधी हा मोह इतका लोभसवाणा की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून आनंदाने त्यापुढे शरण जावं..

तर कधी,
काळवंडलेली उदासीनता व्यापून उरते...
तिचा गडदपणा घेरून टाकतो,
अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!

मात्र हा 'मोह' आपल्यापासून वेगळा होताना काहीतरी घेऊन जातो... काहीतरी खूप जपलेलं!

मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..

शब्दखुणा: 

ओढ...!

Submitted by बागेश्री on 26 December, 2012 - 07:55

पावलांना कुठलीच आणि कशाचीच ओढ नसली की,
जगण्याचे संदर्भ बदलतात..!

स्वतःतच रमण्याची ही संधी मानावी की सर्व काही गमावल्याचं द्योतक,
ह्या प्रश्नांत गुरफटून जायला होतं!

ओढीनं ओढलं जाणारं आयुष्य, आपल्यासकट वेळेला घेऊन धावत असतं,
काळाच्या चक्राची पाती भराभर फिरतात....

ओढ सरली, की मग मात्र
घरातून चोरी गेलेल्या सामानानंतरची भकास पोकळी दाटते...

ह्या पोकळीतच उदास श्वास घुटमळू द्यायचे की स्वतःचा, स्वतःपुरता नवा डाव मांडायचा -
हे ठरवायला हवंच!

---------------------------------------------------------------

शब्दखुणा: 

परंतू

Submitted by बागेश्री on 5 November, 2012 - 06:21

तुमच्या विचारांवर,
असण्यावर,
असूनही नसण्यावर,
कुणा एकाची व्याप्ती भरून राहते..
इतकी, की- स्वतःचं वेगळं आस्तित्त्व जाणवण्याइतपत जागाच नसते!

त्या व्याप्तीचं रूपांतर कधी अचानक, भरून न येणार्‍या पोकळीत झालं की मग मात्र हादरा बसतो...

जगणं थांबवता येत नाही,
मोकळं आयुष्य कातर होतं!

परंतू, पावलं उचलावीच लागतात!

हा 'परंतूच' सामर्थ्यवान आहे, जगणं रेटून नेण्याची ताकद त्यात आहे......!!

शब्दखुणा: 

फसवणूक

Submitted by बागेश्री on 31 October, 2012 - 06:09

तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...

आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...

मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..

थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...

पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...

शब्दखुणा: 

गंध...

Submitted by rar on 25 April, 2012 - 11:34

गेल्या दोन महिन्यात घडलेल्या असंख्य घडामोडी आणि धावपळीनंतर आत्ता कुठे तिला जरा शांतता, फुरसत मिळाली होती. म्हणजे अजून तसा प्रवास संपलेला नाहीच आहे. पण तरीही सकाळपासून रेल्वेचा प्रवास, मग एअरपोर्टवर सिक्युरिटी वगैरे नाटकं संपवून पॅरिसच्या 'चार्ल्स डे गॉल' विमानतळावर ती पुढच्या विमानाची वाट पाहात थांबली होती. दगदग, गडबड होती तरी हातात घेतलेली सगळी काम यथायोग्य पार पडली या विचारानीच तिला शांत वाटत होतं. असं दमून-भागून शांत, स्वस्थ झाली की कायम बसल्या बसल्या 'काय काय घडून गेलं' याची उजळणी, त्यावर विचार करायची तिची नेहेमीची सवय.

गुलमोहर: 

चांदणस्पर्श

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

उम्मीद पे दुनिया कायम है... ?!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज ३० नोव्हेंबर २०१०... आज तिची आठवण अधिकच गडद झाली...मलाच नाही तर तिच्या जवळच्या, तिला ओळखणा-या सगळ्यांच्याच मनात.
तसं पाहिला गेलं तर तिचा आणि माझा सहवास काही दिवसांचा (काही तासांचा खरं तर !). पण तरीही मला तिचं प्रसन्न व्यक्तीमत्व, चेह-यावरचं मुक्त पण निरागस हसू, डोळ्यातली चमक, मुख्य म्हणजे तिचं full of life असणं आवडायचं. का माहित नाही, जास्त कधी बोलायची संधी (असून) मिळाली नाही तरीही मला ती आवडायची... जवळची वाटायची !

विषय: 
प्रकार: 

पत्त्यांची डायरी

Submitted by रेव्यु on 24 September, 2010 - 08:11

पत्त्यांची डायरी
काल रात्री सहज समोर पडलेल्या पत्त्यांच्या डायरीत कुठला तरी टेलिफोन नम्बर "वाचत" होतो.खरे तर त्याला काही अर्थ नव्हता कारण मला मनोमन माह्ईत होते की हा नम्बर नक्की बदलला असणार्.पण मी नंबर शोधत नव्हतो,मी ती डायरी अन त्यातील नंबर अन त्यांच्याशी निगडित आठ्वणी जागवण्याचे प्रयत्न त्या "वाचण्यातून" करीत होतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - स्फुट