मी, ते झाड आणि चिमण्या ......

Submitted by मी मी on 7 August, 2013 - 12:30

घराच्या अगदी पुढ्यात एक वाळलेलं झाड आहे …
पानं गळून गेलेलीत सगळी … हिरवा ठीपकाही नाही ….
दाटीने असलेल्या बारीक फांद्या… वाळलेल्या ..पण
एकमेकांच्या आधाराने नेट धरून उभ्या

रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड

ठरलंय आमचं,
'झाडावर जागा त्यांची …त्यांच्यावर नजर माझी'

माझ्या खोलीच्या खिडकीतून रम्य दिसतो हा नजारा

पाऊस आला कि मात्र मी आवर्जून खिडकी बंद करते
मग बंद खिडकीत फडफडत येउन बसतात त्या
कप्प्यां कप्प्यात ……. निवाऱ्याला …. अगदी हक्काने
पावसापासून जपून ……. तरीही जरा जरा भिजतच

ठरलंय आमचं,
'आत खिडकी माझी…. बाहेरून त्यांची'

कसलं सुंदर दृश्य दिसत असेल… नाही ?

नाही बघू शकत मी बंद खिडकीतून

मात्र

त्यांच्या पंखांचा फडफडणारा आवाज,
मंद चिवचिवाट आणि
पंखातून उडालेल्या पावसाच्या थेंबांचा ओघळ
बंद काचेवर जाणवत राहतो.. आत.. !!
आत …पाझरत राहतो !

पाउस ओसरला कि त्या परत झेप घेतात झाडाकडे
अन वाट मोकळी करून देतात माझ्या नजरेला
त्या झाडावर ...त्यांच्यावर ...स्थिरावण्यासाठी !
जणू अलिखित करारच केलाय आम्ही.

कितीतरी वेळ मग आम्ही असेच गुण गात असतो
या अनामिक नात्याचे ,
आपापसात किंवा मग एक-एकट्यात ……….!!!

मी, ते झाड आणि चिमण्या ......

10606_525023134225956_823261039_n.jpg

(फोटो internet वरुन साभार)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज संध्याकाळी
दुरून उडत आलेल्या …
प्रत्येक फांदीवर बसलेल्या चिमण्या दिसतात
गजबजलेल्या… जणू चीमण्यांचेच झाड

>>.>.

बेटीची एक कविता आठवली ह्यावरुन. पहिले कडवे ते असे:

सुगी सरल्या रानात
उतरले अवचित रावे
वठलेला कदंब तरु
आज पंखात पालवे

छान आहे मयी तुझी कविता.

छान.

Thnx Happy

मयी, आश्चर्य आहे !कालची चंद्र-शुक्रतार्‍याची, आजची चिमण्यांची ही कविता मला खूपच जवळची वाटतेय.. मीही पूर्वी कधीतरी या प्रतिमा अगदी याच संदर्भात नाही पण काहीशा समांतर अर्थाने कवितेत आणल्या होत्या.
खूप आवडते तुझे कवितालेखन, जवळचे वाटते.ले.शु.

.

आवडली...