मायबोली गणेशोत्सव २०१०

किलबिल - लेगो गणेश

Submitted by पन्ना on 11 September, 2010 - 16:30

लेगो गणेश

नाव : हर्ष
वय : साडेनऊ वर्षे
माध्यम : लेगो ब्लॉक्स
मदत : मॉडेल म्हणून गणपतीचा फोटो शोधून देणे.

आज सकाळी मायबोली गणेशोत्सवाबद्दल घरी सांगत होते तेव्हा त्याला एकदम मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवात दिलेल्या चित्राची आठवण झाली. ह्या वर्षी चित्राऐवजी दुसरं काहीतरी म्हणून मग लेगोचा गणपती करायचा ठरवला. आणि अवघ्या १/२ तासात हा बाप्पा तयार झाला Happy

विषय: 

किलबिल : सानिकाचे बाल गणेश!

Submitted by maitreyee on 11 September, 2010 - 07:41

बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" Happy )
sanika-bal-ganesh pic.jpg

स्वरचित आरत्या

Submitted by संयोजक on 9 September, 2010 - 22:31

2010_MB_Swarachit_Aratya.jpg

शालनवहिनी : काय वहिनी, हल्ली तुम्ही बाहेर गॅलरीत उभ्या राहिलेल्या दिसत नाही, अचानक झाले काय म्हणून चौकशी करायला आले? (बाईला जगाच्या पंचायती करायच्या सोडून दुसरे काम असलेले दिसत तर नाही)
मालनवहिनी : (मनातल्या मनात यांना कशाला हव्यात चांभारचौकशा?) छे हो, काहीही झालेले नाही बरी आहे की मी.
शालनवहिनी : हे कागदाचे बोळे कसले हो सगळ्या हॉलभर?

गण गण गणात गणपती - निघाली बाप्पांची पालखी - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:50
2010_MB_Ganesha2_small.jpg
निघाली बाप्पांची पालखी (गणेश निरोप)
गीत, संगीत : योग
गायक : योग, सारीका व समूह


निघाली निघाली निघाली बाप्पांची पालखी
लाट लाट ही भक्तांची सागरासारखी
चला चला रे गाऊया बाप्पांची आरती
एकमुखाने बोला बोला गण गण गणात गणपती ||

देहभान हे गुलाल झाले उधळू तुमच्या पायी
निरोपास ही उभे ठाकले विठ्ठल रखुमाई
बोला जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल रखमाई ||

निरोपाच्या वेळी बाप्पा करू नका हो घाई

गण गण गणात गणपती-देवा तुझा ॐकार - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:48
2010_MB_Ganesha3_small.jpg

देवा तुझा ॐकार (भजन)
गीत, संगीत : योग
गायक : योग

देवा तुझा ॐकार होवूदे साधन होवूदे साधन
देहाशी ऊरे काजळी आत्मा निरंजन ||

संसार डोह भरीला मिटे ना तरंग
दान द्यावे देवा आता निर्गुणाचा संग ||

दाटे काळोख दिशांनी दिसे नाही वाट
सिद्ध द्यावी देवा आता अंतरी पहाट ||

पाप पुण्य दैव काही नुरावे गहाण
ऊद्धार करावा देवा रचावे निर्वाण ||

गण गण गणात गणपती - चराचरांतून अशी माजली - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:42

गण गण गणात गणपती - आज बाप्पा घरी आले - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:40
2010_MB_Ganesha2_small.jpg
आज बाप्पा घरी आले (गणेश स्थापना)
गीत, संगीत : योग
गायक : योग, सारीका व समूह

गण गण गणात गणपती - गजानना तुज वंदन करितो - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:38

2010_MB_Ganesha3_small.jpg

गजानना तुज वंदन करितो (गणेश वंदना)
गीत : जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत : योग
गायक : सारीका, योग व समूह

गण गण गणात गणपती - गणा गणा - योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:35
2010_MB_Ganesha2_small.jpg

गीत २ : गणा गणा (गणेश गजर)
गीत : पेशवा
संगीत : योग
गायक : योग व समूह

गण गण गणात गणपती - अनादी तू अनंत तू (गणेश स्तवन)- योग

Submitted by संयोजक on 8 September, 2010 - 20:00

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१०