हम को कापूस नै बोलने का
"नारळाच्या आत पाणी" म्हैतंय. पण ससा पण?
"नारळाच्या आत पाणी" म्हैतंय. पण ससा पण?
कुजबुज
२७ मे २०११
नमस्कार वाचकहो,
२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.
"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.
काल येथुन जवळच असलेल्या लेग (Legg) लेक्सना नवी लेन्स (Olympus Zuiko four/thirds 70-300 35mm equivalent 140-600) अजमावयला म्हणुन गेलो होतो. ६० नंबरचा फ्रीवे बनवतांना माती करता खणलेले भल्यामोठ्या गड्ड्यांचे स्वरुप बदलवुन हे तीन कृत्रीम तलाव बनवण्यात आले आहेत. सप्ताहांताला थोडीफार गर्दी असते, खास करुन हिस्पॅनीक लोकांची. काही ठिकाणी बरळणारे रेडीओ पण ऐकु येतात. मास्यांसाठी गळ लाऊन खूप लोक बसले असतात.
पाणी म्हणजे पक्षी असे माझे साधे समीकरण होते. निराशा झाली नाही.
ह्या खेपेच्या भारतभेटीत ओरीसाची ट्रीप केली. केवढं पहाण्यासारख आहे नाही आपल्या देशात?. पुरी, कोणार्क, चिलका लेक, भुवनेश्वर - प्राचीन शील्पांपासून निसर्गाचं सौंदर्य - सगळ्याचीच भरपूर रेलचेल. ह्या खेपेला सगळीकडेच ट्रेंड गाईडस घेतले होते त्यामुळे ट्रीप एकदम माहितीपूर्ण आणि मस्त झाली.
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं.
नुकतीच केरळ - अष्टमुदी येथे trip झाली. माझ्या नजरेतून ती देवभूमी मला अशी दिसली -
१. अष्टमुदी lake
२. अष्टमुदी lake
३. अष्टमुदी lake
४. अष्टमुदी lake
५. अष्टमुदी lake
SLR फोकस व फ्रेमींग चे हे काही प्रयोग - आमच्या बिल्डींगच्या कोर्ट्यार्ड मधील.
एखादा फोटो आवडल्यास वा नावडल्यास कारणमिमांसा पहायला आवडेल. तेंव्हा खुश्शाल क्रिटीसाईज करा.
४ क्रॉप केलेल्या फोटोंच्या खाली तसे नमुद केले आहे. बाकी फ्रेम्स जशा घेतल्या तशाच आहेत.
(१)
(हा क्रॉप केला आहे)
(२)
(३)
(४)